जखऱ्या 6 : 1 (MRV)
मग मी वळून बघितले तेव्हा दोन जस्ताच्या पर्वतांतून चार रथ जाताना दिसले.
जखऱ्या 6 : 2 (MRV)
लाल रंगाचे घोडे पहिला रथ ओढत होते. काळ्या रंगाचे घोडे दुसरा रथ ओढत होते.
जखऱ्या 6 : 3 (MRV)
पांढऱ्या रंगाचे घोडे तिसरा रथ ओढत होते. तर लाल ठिपके असलेले घोडे तिसरा रथ ओढत होते. तर लाल ठिपके असलेले घोडे चौथा रथ ओढत होते.
जखऱ्या 6 : 4 (MRV)
माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, ह्या गोष्टींचा अर्थ काय?”
जखऱ्या 6 : 5 (MRV)
देवदूत म्हणाला, “ते चार प्रकारचे वारेआहेत. जगन्नियंत्याससोरुन ते आत्ताच आलेत.
जखऱ्या 6 : 6 (MRV)
काळे घोडे उत्तरेला, लाल घोडे पूर्वेला, पांढरे घोडे पश्चिमेला व तांबडे ठिपके असलेले घोडे दक्षिणेला जातील.”
जखऱ्या 6 : 7 (MRV)
तांबडे ठिपके असलेले घोडे, त्यांच्या भागात जाण्यास, उत्सुक दिसत होते. म्हणून देवदूताने त्यांना भूमीमधून संचार करण्यास सांगितले मग ते त्यांच्या भागांतून गेले.
जखऱ्या 6 : 8 (MRV)
मग परमेश्वराने मला मोठ्याने हाक मारुन सांगितले, “बघ, उत्तरेकडे गेलेल्या घोड्यांनी बाबेलमध्ये आपले काम पूर्ण केले आहे. त्यांनी माझा आत्मा शांत केला आहे. मी आता रागावलेलो नाही.”
जखऱ्या 6 : 9 (MRV)
मग मला परमेश्वराचा आणखी एक संदेश मिळाला. तो म्हणाला,
जखऱ्या 6 : 10 (MRV)
“हेल्दय, तोबीया व यदया हे बाबेलच्या बंद्यांकडून आले आहेत. त्याच्याकडून सोने आणि चांदी घेऊन, सफन्याचा मुलगा, यहोशवाकडे जा.
जखऱ्या 6 : 11 (MRV)
त्या सोन्या - चांदीपासून मुकुट कर. तो योशीयाच्या डोक्यावर ठेव. (यहोशवा मुख्याजक होता. तो यहोसादाकचा मुलगा होता.) मग त्याला पुढील गोष्टी सांग:
जखऱ्या 6 : 12 (MRV)
सर्व शक्तिमान परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: ‘कोंब’ नावाचा एक माणूस आहे. तो सामर्थ्यवान बनेल. तो परमेश्वराचे मंदिर बांधील.
जखऱ्या 6 : 13 (MRV)
तो परमेश्वराचे मंदिर बांधून गौरव प्राप्त करील. स्वत:च्या सिंहासनावर बसून तो राज्य करील. त्याच्या सिंहासनाजवळ याजक उभे राहतील. ते दोघे एकत्रितपणे, शांतपणे काम करतील.’
जखऱ्या 6 : 14 (MRV)
“लोकांना आठवण राहावी म्हणून ते मुकुट मंदिरात ठेवतील. तो मुकुट हेल्दय, तोबीया, यदया व सफन्याचा मुलगा योशिया यांना राजाचे सामर्थ्य देवाकडून येते याची आठवण करुन देईल.
जखऱ्या 6 : 15 (MRV)
दूरवर राहणारे लोक येतील आणि मंदिर बांधतील मग तुमची खात्री पटेल की परमेश्वरानेच मला तुमच्याकडे पाठविले. जर तुम्ही परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागलात, तरच ह्या गोष्टी घडून येतील.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: