मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
उत्पत्ति 5:1

Notes

No Verse Added

उत्पत्ति 5:1

1
आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला.
2
देवाने त्यांस नर नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले.
3
आदाम एकशेतीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
4
शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या.
5
अशा रीतीने आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
6
शेथ एकशेंपाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश नांवाचा मुलगा झाला.
7
अनोशच्या जन्मानंतर शेथ आठशेंसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
8
शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
9
अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान नावाचा मुलगा झाला;
10
केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
11
अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
12
केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल नावाचा मुलगा झाला;
13
महललेल झाल्यावर केनान आठशेंचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
14
केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
15
महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद नावाचा मुलगा झाला;
16
यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेंतीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
17
महललेल एकंदर आठशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
18
यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख नावाचा मुलगा झाला;
19
हनोख झाल्यावर यारेद आठशें वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
20
यारेद एकंदर नऊशे बासष्ट वर्षे जगला; त्या नंतर तो मरण पावला.
21
हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला;
22
मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशें वर्षे देवाबरोबर चालला त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
23
हनोख एकंदर तीनशें पासष्ट वर्षे जगला;
24
एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले.
25
मथुशलह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख नावांचा मुलगा झाला;
26
लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेंब्याऐंशी वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
27
मथुशलह एकंदर नऊशें एकुणसत्तर वर्षे जगला; त्यानांतर तो मरण पावला.
28
लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला;
29
त्याने त्याचे नाव नोहा (म्हणजे विसावा) असे ठेवले. लामेख म्हाणाला, “देवाने भूमिला शाप दिल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप काष्ट करावे लागतात; परंतु नोहा आपल्याला विसावा देईल.”
30
नोहा झाल्यावर लामेख पाचशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे मुली झाल्या;
31
लामेख एकंदर सातशें सत्याहत्तर वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
32
नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम याफेथ नावाचे मुलगे झाले.
×

Alert

×

marathi Letters Keypad References