मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
ईयोब 23

Notes

No Verse Added

ईयोब 23

1
नंतर ईयोबने उत्तर दिले:
2
“तरीही मी आज कडवटणे तक्रार करीन. का? कारण मी अजूनही दु:खी आहे.
3
देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असेत तर किती बरे झाले असते. देवाकडे कसे जावे ते मला कळते तर किती बरे झाले असते.
4
मी देवाला माझी कथा सांगितली असती. माझा निरपराधीपणा सिध्द करण्यासाठी मी सतत वाद घातला असता.
5
देवाने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते तर किती बरे झाले असते. मला देवाची उत्तरे समजून घ्यायची आहेत.
6
देव माझ्याविरुध्द त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करेल का? नाही. तो मी काय म्हणतो ते ऐकेल.
7
मी सत्यप्रिय माणूस आहे. देव मला माझी गोष्ट सांगू देईल. नंतर माझा न्यायाधीश मला मुक्त करील.
8
“पण मी जर पूर्वेकडे गेलो, तर देव तेथे नसतो. मी पश्र्चिमेकडे गेलो तर तिथेही मला देव दिसत नाही.
9
देव दक्षिणेत कार्यमग्र असला तरी मला तो दिसत नाही. देव जेव्हा उत्तरेकडे वळतो तेव्हाही तो मला दिसत नाही.
10
परंतु देवाला मी माहीत आहे. तो माझी परीक्षा घेत आहे. आणि मी सोन्यासारखा शुध्द असेन याकडे तो लक्ष पुरवेल.
11
मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.
12
मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो.
13
“परंतु देव कधी बदलत नाही. देवासमोर कुणीही उभा राहू शकणार नाही. देव त्याला हवे ते करु शकतो.
14
माझ्या बाबतीत देवाने जे योजिले आहे तेच तो करेल. माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.
15
म्हणूनच मी देवाला भितो. मी या गोष्टी समजू शकतो आणि म्हणून मला देवाची भीती वाटते.
16
देव माझे हृदय कमजोर बनवतो आणि मी माझे धैर्य गमावून बसतो. सर्वशक्तिमान देव मला घाबरवतो.
17
माझ्या बाबतीत ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या माझ्या चेहऱ्यावरच्या काळ्या ढगाप्रमाणे आहेत. परंतु तो काळोख मला गप्प बसवू शकणार नाही.
×

Alert

×

marathi Letters Keypad References