मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता 100:1

Notes

No Verse Added

स्तोत्रसंहिता 100:1

1
हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
2
परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा. परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.
3
परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत.
4
त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जयजयकार करा.
5
परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.
×

Alert

×

marathi Letters Keypad References