मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यशया 20:1

Notes

No Verse Added

यशया 20:1

1
सर्गोन अश्शूरचा राजा होता. त्याने तर्तानला अश्दोदवर स्वारी करायला पाठविले. तर्तानने चढाई करून ते शहर जिंकून घेतले.
2
त्या वेळेला आमोजचा मुलगा यशया याला परमेश्वर म्हणाला, “जा तुझ्या अंगावरील शोकप्रदर्शक कपडे जोडे काढ.” यशयाने परमेश्वराच्या आज्ञेच पालन केले आणि तो उघडा अनवाणी चालला.
3
तेव्हा परमेश्वर म्हणाला, “यशया तीन वर्षे उघडा अनवाणी फिरला. हा मिसर कूशयाला संकेत आहे.
4
अश्शूरचा राजा त्यांना कैद करील त्यांच्या देशापासून त्यांना दूर घेऊन जाईल. आबालवृध्दांना वस्त्रे जोडे काढून नेले जाईल त्यांना संपूर्ण नग्न केले जाईल. मिसरचें लोक लज्जित होतील.
5
जे कुशकडे मदतीची अपेक्षा करीत होते. त्यांचा अपेक्षाभंग होईल. मिसरच्या वैभवाने लोक आश्चर्यचकीत झाले होते परंतु ते लज्जित होतील.”
6
समुद्रकाठी राहणारे लोक म्हणतील, “त्या देशांवर आम्ही मदतीसाठी विश्वास टाकला, अश्शूरच्या राजापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली पण त्यांचाच पराभव झाला, मग आता आमचा निभाव कसा लागणार?”
×

Alert

×

marathi Letters Keypad References