6 |
प्रभू, माझा परमेश्वर, असे म्हणतो. “यरुशलेमचे वाईट होईल. खुनी लोकांच्या नगरीला वाईट काळ येईल. यरुशलेम गंज चढलेल्या भांड्याप्रमाणे आहे. ते गंजाचे डाग निघू शकत नाहीत. ते भांडे स्वच्छ नसल्याने, तुम्ही प्रत्येक मांसाचा तुकडा बाहेर काढा ते मांस खाऊ नका आणि त्या खाराब झालेल्या मांसातून काहीही याजकांना निवडू देऊ नका.
|
20 |
मग मी त्यांना म्हणालो, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला. त्याने मला इस्राएलच्या लोकांशी बोलायला सांगितले आहे. परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, ‘असे पाहा, मी माझ्या पवित्र स्थानाचा नाश करीन. तुम्हाला त्या स्थानाचा अभिमान वाटतो व तुम्ही त्याची स्तुतिस्तोत्रे गाता. तुम्हाला ते स्थान पाहायला फार आवडते. पण मी त्या स्थानाचा नाश करीन आणि तुम्ही मागे ठेवलेली तुमची मुले लढाईत मारली जातील.
|