मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
नहूम 3:1

Notes

No Verse Added

नहूम 3:1

1
खुन्यांच्या गावाचे वाईट होईल निनवे खोट्यानाट्यांनी भरलेले आहे दुसऱ्या देशांतून लूटलेल्या गोष्टींनी ते भरले आहे ते शहर ठार मारणे आणि लुटणे या गोष्टी कधीच थांबवत नाही.
2
चाबकांच्या फटकाऱ्यांचे चाकांच्या खडखडाटाचे घोड्यांच्या टापांचे आणि रथांच्या घडघडाटाचे आवाज तुम्ही ऐक शकता.
3
घोडदळ हल्ला करीत आहे त्यांच्या तलवारी तळपत आहेत भाले चमकत आहेत खूप माणसे मेली आहेत. प्रेतांचे ढीग लागलेत इतकी माणसे मेली आहेत की त्यांची गणना करणे कठीण आहे लोक प्रेतांना अडखळून पडत आहेत.
4
हे सर्व निनवेमुळे झाले निनवे अतिशय हाव असलेल्या वेश्येप्रमाणे आहे तिला आणखी हवे होते तिने स्वत:ला पुष्कळ राष्ट्रांना विकळे आणि आपल्या जादने त्यांना गुलाम बनविले.
5
सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो निनवे मी तुझ्याविरुध्द आहे मी तुझी वस्त्रे तोंडापर्यत वर खेचीनमी तुझे नग्न शरीर राष्ट्रांना पाहू देईन ती राज्ये तुझी बेअब्रू झालेली पाहतील.
6
मी तुझ्यावर चिखल फेक करीन मी तुला तिरस्कार पूर्वक वागवीन लोक तुझ्याकडे पाहून हसतील.
7
तुला पाहून प्रत्येकाला धक्का बसेल ते म्हणतील निनवेचा नाश झाला तिच्यासाठी कोण रडणार? निनवे तुझे सांत्वन करणारा कोणीही मला भेटणार नाही हे मला माहीत आहे.
8
निनवे तू नील नदीकाठच्या थेब्जपेक्षा (नो-आमोनपेक्षा) चांगली आहेस का? नाही थेब्जच्या सभोवती पाणी होते शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग होई ती पाण्याचा उपयोग भिंतीप्रमाणेही करी.
9
कूश मिसर यांनी तिला खूप बळ दिले पूट लूब ह्यांनी तिला मदत केली.
10
तरी थेब्जचा पराभव झाला तिच्या लोकांना कैद करून परदेशात नेले गेले. रस्त्यांच्या प्रत्येक चौकात तिच्या लहान मुलांना सैनिकांनी मेर पर्यत मारले. प्रतिष्ठित लोकांना, गुलाम म्हणून कोणी ठेवायचे, हे ठरविण्यासाठी सैनिकांनी चिठ्या टाकल्या त्यांनी थेब्जच्या प्रतिष्ठितांना बेड्या ठोकल्या.
11
तेव्हा निनवे, तु सुध्दा दारुड्याप्रमाणे पडशील. तू लपायचा प्रयत्न करशील. शत्रूपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित जागा तू सोधशील.
12
पण, निनवे, तुझ्या सर्व मजबूत जागा अंजिराच्या झाडांप्रमाणे होतील अंजिरे पिकताच, कोणीही येऊन झाड हलविते आणि अंजिरे त्याच्या तोंडात पडतात. तो ती खातो आणि निघून जातो.
13
निनवे, तुझे सर्वलोक स्त्रियांप्रमाणे आहेत. आणि शत्रुसैनिक त्यांना नेण्यासाठी टपले आहेत. तुझ्या देशआची दारे, शत्रुंसाठी, सताड डघडली आहेत. दारांचे लाकडी अडसर आगीत जळले आहेत.
14
पाणी आणून साठवून ठेव. का? कारण शत्रुसैन्य शहराला घेराव घालणार आहे. ते कोणालाही अन्न-पाणी आत नेऊ देणार नाहीत. तुझ्या बचावाच्या जागा भक्कम कर. विटा तयार करण्यासाठी माती मिळव. चुना कालब! विटा बनविण्याचे साचे मिळव!
15
तू हे सर्व करु शकशील, पण आग तुझा संपूर्ण नाश करील, तलवार तुला कापून काढील. तुझा देश, येऊन सर्व फस्त करणार्या टोळधाडीप्रमाणे दिसेल.निनवे, तुझा विस्तार वाढत राहिला. तू टोळधाडीप्रमाणे झालीस. तू कुसरुडांच्या थव्याप्रमाणे झालीस.
16
तुझ्याकडे, निरनिराव्व्या ठिकाणी जाऊन, वस्तू विकत आणणारे, पुष्कळ व्यापारी आहेत. आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत तेवढे ते आहेत. ते टोळासारखे सर्व फस्त करुन निघून जाणारे आहेत.
17
तुझे सरकारी अधिकारीही असेच आहेत. टोळ थंड वेळी दगडी भिंतीवर बसतात. पण ऊन तापताच भिंत गरम होते, तेव्हा ते डडून जातात कोठे जातात, ते कोणालाच माहीत नसते. तुझे अधिकारी अगदी असेच असतील.
18
अश्शूराच्या राजा आणि तुझे मेढपाळ (नेते) गाढ झोपले आहेत. ते सत्ताधारी लोक डुलक्या घेत आहेत. त्यामुळे तुझ्या मेंढ्या पर्वतांत भटकल्या आहेत. त्यांना परत आणायला कोणीही नाही.
19
निनवे, तुला खूप मार लागला आणि तुझी जखम कशानेही भरून येऊ शकत नाही. तुझ्या नाशाची बातमी एकताच प्रत्येकजण टाव्व्या वाजवितो सर्वानाच त्यामुळे आनंद वाटतो. का? कारण तू त्यांना नेहमी ज्या यातना दिल्यास, त्या ते विसरले नाहीत.
×

Alert

×

marathi Letters Keypad References