मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1 करिंथकरांस 16

Notes

No Verse Added

1 करिंथकरांस 16

1
आता, देवाच्या लोकांकरीता वर्गाणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे.
2
प्रत्येक रविवारी तुम्हांतील प्रत्येकाने आपल्या घरी, जो काही त्याला नफा मिळाला असेल त्यातून काढून ठेवावे आणि बचत करावी.
3
मी येईन तेव्हा ज्या माणसांना तुम्ही मान्यता द्याल त्यांना मी ओळखपत्रे देऊन तुमच्या देणग्या यरुशलेमला नेण्यासाठी पाठवीन.
4
आणि जर माझेसुद्धा जाणे योग्य असेल तर ते माइयाबरोबर येतील.पौलाच्या योजना
5
मी मासेदोनियातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे.
6
परंतु कदाचित शक्यतो मी तुमच्याबरोबर काही काळ घालवीन किंवा हिवाळासुद्धा तुमच्यात घालवीन. यासाठी की मी जिकडे जाणार आहे तिकडे तुम्ही मला पाठवावे.
7
जाता जाता तुम्हांला भेटण्याची माझी इच्छा नाही. कारण जर देवाची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी इच्छा मी धरतो.
8
पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन
9
कारण माइयासाठी मोठे आणि परिणामकारक दार उघडले आहे. आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात.
10
जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या. कारण तोही माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे.
11
यास्तव कोणीही त्याला तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला शांतीने पाठवा. कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.
12
आता आपला बंधु अपुल्लोविषयी, इतर बंधूंबरोबर त्याने तुमच्याकडे यावे म्हणून मी त्याला भरपूर उत्तेजन दिले. परंतु आताच त्याने तुमच्याकडे यावे अशी देवाची इच्छा नव्हती. त्याला संधी मिळाल्यावर तो येईल.
13
सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा.
14
धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा.
15
बंधूंनो, मी तुम्हांला बोध करतो तुम्हांला स्तेफनच्या घराची माहिती आहे आणि जाणीवही आहे की ते अखयाचे प्रथम फळ आहे. त्यांनी स्वत: संतांची सेवा करण्याचे ठरविले आहे.
16
प्रत्येक जण जो या कार्यात सामील होतो प्रभुसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा.
17
स्तेफन, फर्तुतात आणि अखायिक हे आल्याने मला आनंद झाला. कारण तुम्ही माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करु शकला नसता.
18
कारण त्यांनी माझा तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांना मान्यता द्या.
19
आशियातील मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात. अक्विला, प्रिस्कील्ला जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हांला फार सलाम सांगतात,
20
सर्व बंधु तुम्हांला सलाम सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.
21
मी, पौल स्वत: माइया स्वत:च्या हाताने हा सलाम लिहीत आहे.
22
जर कोणी प्रभूवर प्रीति करीत नाही, तर तो शापित होवो. “मारानाथा; हे प्रभु य”
23
प्रभु येशूची कृपा तुम्हांबरोबर असो!
24
ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीति तुम्हां सर्वांबरोबर असो.
×

Alert

×

marathi Letters Keypad References