मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
प्रकटीकरण 15:1

Notes

No Verse Added

प्रकटीकरण 15:1

1
मग मी आणखी एक अदभुत चिन्ह स्वर्गात पाहिले. ते महान आणि चकित करणारे होते. तेथे सात देवदूतांनी सात पीडाआणल्या होत्या. या शेवटच्या पीडा होत्या कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे.
2
मी अग्नि काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला, सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्यानावाच्या संख्येवर विजय मिळविला होता ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती.
3
त्यांनीदेवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गाईले:“प्रभु देवा, सर्वसमर्था तू महान आणि अदभुत गोष्टी करतोस. राष्ट्रांच्या राजा, तुझे मार्ग योग्य खरे आहेत
4
हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील. फक्त तूच पवित्र आहेस सर्व लोक येऊन तुझीउपासना करतील कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”
5
त्यानंतर मी स्वर्गामध्ये मंदिर (साक्षीचा मंडप)पाहिले. मंदिर उघडे होते.
6
आणि सात पीडा आणणारे सात देवदूतमंदिराबाहेर आले. त्यांनी स्वच्छ चमकदार तागाचे कपडे घातले होते. त्यानी त्यांच्या छातीवर सोन्याच्या पटृ्या बांधल्याहोत्या.
7
मग सात देवदूतांना चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने सात सोनेरी वाट्या दिल्या जो देव अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्या रागानेत्या वाट्या भरल्या.
8
आणि देवाच्या तेजामधून पराक्रमामधून निघालेल्या धुराने मंदिर भरले. आणि कोणीही सातदेवदूतांच्या सात पीडा पूर्ण होईपर्यंत मंदिरात प्रवेश करु शकले नाही.देवाच्या रागने वाट्या भरल्या
×

Alert

×

marathi Letters Keypad References