मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
मत्तय

मत्तय धडा 12

1 त्या दिवशी म्हणजे शब्बाथदिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता. शेतात पीक उभे होते. येशूच्या शिष्याना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. 2 जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.” 3 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही वाचले आहे काय? 4 देवाच्या मंदिरात तो गेला आणि त्याने व त्याच्या बरोबर असलेल्या लोकांनी समर्पित केलेल्या भाकरी खाल्ल्या. असे करणे नियमशास्त्रच्या विरूद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवागी होती. 5 आणि तुम्ही नियमशास्त्र वाचले आहे की, प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी मंदिरातील याजक मंदिरात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत परंतु ते तसे करू शकत असत. 6 मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे. 7 पवित्र शास्त्र म्हणते, मला यज्ञपशूची अर्पणे नकोत, तर मला दया हवी.याचा खरा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांना दोष लावला नसता. 8 कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभु आहे.” 9 येशूने ते ठिकाण सोडले व यहुद्यांच्या सभास्थानात तो गेला. 10 सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्याला विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” 11 येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्याला वर काढणार नाही काय? 12 तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांना शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते.” 13 मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला. 14 नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याला कसे मारावे याविषयी मसलत केली. 15 परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वाना बरे केले. 16 आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका. 17 यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले. 18 “हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीति करतो, आणि त्याच्याविषयी मला संतोष वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो यहूदीतरांसाठी योग्य न्यायाची घोषणा करील. 19 तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत. 20 वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझविणार नाही. योग्य निर्णयाचा विजय होईपर्यंत तो असे करील. 21 सर्व लोक त्याच्यावर आशा ठेवतील. यशया 42:1-4 22 मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. 23 सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, ‘हा दाविदाचा पुत्र असेल काय?’ 24 परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, ‘भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामार्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भुतांचा प्रमुख आहे.’ 25 परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, ‘आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. 26 आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल? 27 आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भुते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भुते काढतात. म्हणून तुमचे स्वत:चे लोक तुम्हांला चूक ठरवितील. 28 परंतु मी जर देवाच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्र्चित समजा. 29 “किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधून टाकील व मग तो चोरी करील. 30 एखादा मनुष्य जर माझे समर्थन करीत नसेल, तर तो माझ्याविरुद्ध आहे. जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध काम करीत आहे. 31 म्हणून मी तुम्हांला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल. ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही. 32 एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही. त्याला या काळीही क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही. 33 “जर तुम्हांला चांगले फळ हवे असले, तर झाड चांगले करा. जर तुम्ही झाड चांगले करणार नाही. तर फळही चांगले येणार नाही. कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. 34 अहो सापाच्या पिल्लांनो. तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंत:करणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते. 35 चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. 36 आणखी मी तुम्हांस सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशेब ते न्यायाच्या दिवशी देतील. 37 कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.” 38 काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.” 39 येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी प्रामाणीक नाहीत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हांला मिळणार नाही. 40 कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. 41 जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवेचे लोक उभे राहतील, तुमच्याविरूद्ध साक्ष देतील आणि तुम्हांला दोष देतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक येथे आहे. 42 न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणीया पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील. कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली. आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे. 43 “जेव्हा अशुद्ध आत्मा माणसाला सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्याला मिळत नाही. 44 तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्याला दिसते. 45 नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्याला झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या माणसाची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या ह्या पापी पिढीचे होईल.” 46 तो लोकांशी बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहट उभे होते. 47 तेव्हा कोणी तरी त्याला म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.” 48 त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?” 49 मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हाणाला, “पाहा हे माझे आई व माझे भाऊ आहेत. 50 कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत.”
1 त्या दिवशी म्हणजे शब्बाथदिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता. शेतात पीक उभे होते. येशूच्या शिष्याना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. .::. 2 जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.” .::. 3 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही वाचले आहे काय? .::. 4 देवाच्या मंदिरात तो गेला आणि त्याने व त्याच्या बरोबर असलेल्या लोकांनी समर्पित केलेल्या भाकरी खाल्ल्या. असे करणे नियमशास्त्रच्या विरूद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवागी होती. .::. 5 आणि तुम्ही नियमशास्त्र वाचले आहे की, प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी मंदिरातील याजक मंदिरात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत परंतु ते तसे करू शकत असत. .::. 6 मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे. .::. 7 पवित्र शास्त्र म्हणते, मला यज्ञपशूची अर्पणे नकोत, तर मला दया हवी.याचा खरा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांना दोष लावला नसता. .::. 8 कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभु आहे.” .::. 9 येशूने ते ठिकाण सोडले व यहुद्यांच्या सभास्थानात तो गेला. .::. 10 सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्याला विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” .::. 11 येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्याला वर काढणार नाही काय? .::. 12 तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांना शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते.” .::. 13 मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला. .::. 14 नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याला कसे मारावे याविषयी मसलत केली. .::. 15 परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वाना बरे केले. .::. 16 आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका. .::. 17 यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले. .::. 18 “हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीति करतो, आणि त्याच्याविषयी मला संतोष वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो यहूदीतरांसाठी योग्य न्यायाची घोषणा करील. .::. 19 तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत. .::. 20 वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझविणार नाही. योग्य निर्णयाचा विजय होईपर्यंत तो असे करील. .::. 21 सर्व लोक त्याच्यावर आशा ठेवतील. यशया 42:1-4 .::. 22 मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. .::. 23 सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, ‘हा दाविदाचा पुत्र असेल काय?’ .::. 24 परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, ‘भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामार्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भुतांचा प्रमुख आहे.’ .::. 25 परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, ‘आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. .::. 26 आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल? .::. 27 आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भुते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भुते काढतात. म्हणून तुमचे स्वत:चे लोक तुम्हांला चूक ठरवितील. .::. 28 परंतु मी जर देवाच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्र्चित समजा. .::. 29 “किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधून टाकील व मग तो चोरी करील. .::. 30 एखादा मनुष्य जर माझे समर्थन करीत नसेल, तर तो माझ्याविरुद्ध आहे. जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध काम करीत आहे. .::. 31 म्हणून मी तुम्हांला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल. ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही. .::. 32 एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही. त्याला या काळीही क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही. .::. 33 “जर तुम्हांला चांगले फळ हवे असले, तर झाड चांगले करा. जर तुम्ही झाड चांगले करणार नाही. तर फळही चांगले येणार नाही. कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. .::. 34 अहो सापाच्या पिल्लांनो. तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंत:करणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते. .::. 35 चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. .::. 36 आणखी मी तुम्हांस सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशेब ते न्यायाच्या दिवशी देतील. .::. 37 कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.” .::. 38 काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.” .::. 39 येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी प्रामाणीक नाहीत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हांला मिळणार नाही. .::. 40 कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. .::. 41 जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवेचे लोक उभे राहतील, तुमच्याविरूद्ध साक्ष देतील आणि तुम्हांला दोष देतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक येथे आहे. .::. 42 न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणीया पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील. कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली. आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे. .::. 43 “जेव्हा अशुद्ध आत्मा माणसाला सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्याला मिळत नाही. .::. 44 तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्याला दिसते. .::. 45 नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्याला झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या माणसाची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या ह्या पापी पिढीचे होईल.” .::. 46 तो लोकांशी बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहट उभे होते. .::. 47 तेव्हा कोणी तरी त्याला म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.” .::. 48 त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?” .::. 49 मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हाणाला, “पाहा हे माझे आई व माझे भाऊ आहेत. .::. 50 कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत.”
  • मत्तय धडा 1  
  • मत्तय धडा 2  
  • मत्तय धडा 3  
  • मत्तय धडा 4  
  • मत्तय धडा 5  
  • मत्तय धडा 6  
  • मत्तय धडा 7  
  • मत्तय धडा 8  
  • मत्तय धडा 9  
  • मत्तय धडा 10  
  • मत्तय धडा 11  
  • मत्तय धडा 12  
  • मत्तय धडा 13  
  • मत्तय धडा 14  
  • मत्तय धडा 15  
  • मत्तय धडा 16  
  • मत्तय धडा 17  
  • मत्तय धडा 18  
  • मत्तय धडा 19  
  • मत्तय धडा 20  
  • मत्तय धडा 21  
  • मत्तय धडा 22  
  • मत्तय धडा 23  
  • मत्तय धडा 24  
  • मत्तय धडा 25  
  • मत्तय धडा 26  
  • मत्तय धडा 27  
  • मत्तय धडा 28  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References