मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
प्रकटीकरण

प्रकटीकरण धडा 13

1 मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुटहोते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिले होते. 2 हा पशू चित्त्यासारखा दिसत होता. त्याचे पाय अस्वलाच्यापायासारखे होते. त्याला सिंहाच्या तोंडासारखे तोंड होते. त्या प्रचंड सापाने त्या प्राण्याला त्याची शक्ति, त्याचे शिंहासनआणि मोठा अधिकार दिला. 3 त्या प्राण्याच्या डोक्यांपैकी एक डोके जबर जखमी झालेले दिसत होते. पण ती जखम बरी झाली. जगातील सर्व लोकचकित झाले आणि ते सर्व त्या श्र्वापदाच्या मागे गेले. 4 लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली कारण त्याने त्याचीशक्ति त्या श्र्वापदाला दिली होती. लोकांनी त्या प्राण्याची उपासना केली. त्यांनी विचारले, “या प्राण्याइतका सामर्थ्यशालीकोण आहे? त्याच्याविरुद्ध कोण लढाई करु शकेल?” 5 त्या श्र्वापदाला मोठ्या अवास्तव गोष्टी बोलण्याची मुभा देण्यात आली व देवाविरुद्ध अनेक दुर्भाषणयुक्त गोष्टी तो बोलला.त्या प्राण्याला बेचाळीस महिने त्याचे सामर्थ्य वापरण्यास सांगण्यात आले. 6 त्या प्राण्याने देवाविरुद्ध वाईट गोष्टीबोलण्यासाठी तोंड उघडले. त्या प्राण्याने देवाच्या नावाविरुद्धसुद्धा वाईट गोष्टी बोलण्यास कमी केले नाही. व देव राहतो त्याठिकाणाबद्दल सुध्दा वाईट गोष्टी तो बोलला. व जे सर्व स्वर्गात राहतात त्यांच्याविषयी वाईट गोष्टी बोलल्या. 7 देवाच्या पवित्रलोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली. त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात,भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे. 8 आणि जगाच्या निर्मितीपासून ज्यांची नावे वधलेल्याकोकऱ्याच्या जीनवाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, ते सर्व त्या पशूची भक्ति करतील. 9 “ज्याला कान आहेत तो ऐको. 10 जर एखादा मनुष्य दुसऱ्यास कैदी बनवतो तर तो मनुष्यही कैदी बनविण्यात येतो. जर एखादा मनुष्य तलवारीने मरतोतर त्या मनुष्याला तलवारीनेच मारण्यात येते.याचा अर्य असा की देवाच्या पवित्र लोकांनी धीर व विश्वास धरला पाहिजे.” 11 मग मी एक दुसरे श्र्वापद पृथ्वीतून वर येताना पाहिले. त्याला कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती. पण ते प्रचंड सापासारखेबोलत होते. 12 हा प्राणी पहिल्या प्राण्यासमोर उभा राहतो व पहिल्या प्राण्याकडे जी शक्ति होती तीच तो वापरतो. पृथ्वीवरराहणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या प्राण्याची उपासना करावी यासाठी तो आपली शक्ति वापरतो. पहिला प्राणी असा होता कीत्याला प्राणघातक अशी जखम होती जी बरी झाली होती. 13 हे दुसरे श्र्वापद मोठी चिन्हे करते. लोक पाहत असताना तोस्वर्गातून पृथ्वीवर अग्नीसुद्धा येईल असे करतो 14 आणि त्याला पहिल्या श्वापदासमोर चिन्हे करण्याचा अधिकार दिला होताम्हणून ते म्हणजे जे श्र्वापद जखमी होऊनही वाचले, त्याची मूर्ति बनवून त्याची भक्ति करावी अशी पृथ्वीवर राहणाऱ्यालोकांना आज्ञा करतो. 15 दुसऱ्या प्राण्याला पहिल्या प्राण्याच्या मूर्तीला जीवन देण्यासाठी शक्ति देण्यात आली. मग ती मूर्तीबोलेल व जे लोक तिची भक्ति करीत नाहीत त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईल. 16 दुसऱ्या प्राण्याने सर्व लोकांना - लहानमोठ्या, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र व दास - बळजबरी केली की, त्यांनी त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपळावर चिन्हकरुन घ्यावे. 17 यासाठी की, चिन्ह असल्याशिवाय कोणीही व्यक्तीने विकू नये किंवा विकत घेऊ नये. हे चिन्ह म्हणजे त्याप्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे. 18 ज्या माणसाला समजबुद्धी आहे, त्याने त्या प्राण्याच्या संख्ये अर्थशोधावा. ही संख्या मनुष्यांची संख्या आहे. त्यांची संख्या आहे 666.
1. मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुटहोते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिले होते. 2. हा पशू चित्त्यासारखा दिसत होता. त्याचे पाय अस्वलाच्यापायासारखे होते. त्याला सिंहाच्या तोंडासारखे तोंड होते. त्या प्रचंड सापाने त्या प्राण्याला त्याची शक्ति, त्याचे शिंहासनआणि मोठा अधिकार दिला. 3. त्या प्राण्याच्या डोक्यांपैकी एक डोके जबर जखमी झालेले दिसत होते. पण ती जखम बरी झाली. जगातील सर्व लोकचकित झाले आणि ते सर्व त्या श्र्वापदाच्या मागे गेले. 4. लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली कारण त्याने त्याचीशक्ति त्या श्र्वापदाला दिली होती. लोकांनी त्या प्राण्याची उपासना केली. त्यांनी विचारले, “या प्राण्याइतका सामर्थ्यशालीकोण आहे? त्याच्याविरुद्ध कोण लढाई करु शकेल?” 5. त्या श्र्वापदाला मोठ्या अवास्तव गोष्टी बोलण्याची मुभा देण्यात आली व देवाविरुद्ध अनेक दुर्भाषणयुक्त गोष्टी तो बोलला.त्या प्राण्याला बेचाळीस महिने त्याचे सामर्थ्य वापरण्यास सांगण्यात आले. 6. त्या प्राण्याने देवाविरुद्ध वाईट गोष्टीबोलण्यासाठी तोंड उघडले. त्या प्राण्याने देवाच्या नावाविरुद्धसुद्धा वाईट गोष्टी बोलण्यास कमी केले नाही. व देव राहतो त्याठिकाणाबद्दल सुध्दा वाईट गोष्टी तो बोलला. व जे सर्व स्वर्गात राहतात त्यांच्याविषयी वाईट गोष्टी बोलल्या. 7. देवाच्या पवित्रलोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली. त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात,भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे. 8. आणि जगाच्या निर्मितीपासून ज्यांची नावे वधलेल्याकोकऱ्याच्या जीनवाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, ते सर्व त्या पशूची भक्ति करतील. 9. “ज्याला कान आहेत तो ऐको. 10. जर एखादा मनुष्य दुसऱ्यास कैदी बनवतो तर तो मनुष्यही कैदी बनविण्यात येतो. जर एखादा मनुष्य तलवारीने मरतोतर त्या मनुष्याला तलवारीनेच मारण्यात येते.याचा अर्य असा की देवाच्या पवित्र लोकांनी धीर व विश्वास धरला पाहिजे.” 11. मग मी एक दुसरे श्र्वापद पृथ्वीतून वर येताना पाहिले. त्याला कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती. पण ते प्रचंड सापासारखेबोलत होते. 12. हा प्राणी पहिल्या प्राण्यासमोर उभा राहतो व पहिल्या प्राण्याकडे जी शक्ति होती तीच तो वापरतो. पृथ्वीवरराहणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या प्राण्याची उपासना करावी यासाठी तो आपली शक्ति वापरतो. पहिला प्राणी असा होता कीत्याला प्राणघातक अशी जखम होती जी बरी झाली होती. 13. हे दुसरे श्र्वापद मोठी चिन्हे करते. लोक पाहत असताना तोस्वर्गातून पृथ्वीवर अग्नीसुद्धा येईल असे करतो 14. आणि त्याला पहिल्या श्वापदासमोर चिन्हे करण्याचा अधिकार दिला होताम्हणून ते म्हणजे जे श्र्वापद जखमी होऊनही वाचले, त्याची मूर्ति बनवून त्याची भक्ति करावी अशी पृथ्वीवर राहणाऱ्यालोकांना आज्ञा करतो. 15. दुसऱ्या प्राण्याला पहिल्या प्राण्याच्या मूर्तीला जीवन देण्यासाठी शक्ति देण्यात आली. मग ती मूर्तीबोलेल व जे लोक तिची भक्ति करीत नाहीत त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईल. 16. दुसऱ्या प्राण्याने सर्व लोकांना - लहानमोठ्या, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र व दास - बळजबरी केली की, त्यांनी त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपळावर चिन्हकरुन घ्यावे. 17. यासाठी की, चिन्ह असल्याशिवाय कोणीही व्यक्तीने विकू नये किंवा विकत घेऊ नये. हे चिन्ह म्हणजे त्याप्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे. 18. ज्या माणसाला समजबुद्धी आहे, त्याने त्या प्राण्याच्या संख्ये अर्थशोधावा. ही संख्या मनुष्यांची संख्या आहे. त्यांची संख्या आहे 666.
  • प्रकटीकरण धडा 1  
  • प्रकटीकरण धडा 2  
  • प्रकटीकरण धडा 3  
  • प्रकटीकरण धडा 4  
  • प्रकटीकरण धडा 5  
  • प्रकटीकरण धडा 6  
  • प्रकटीकरण धडा 7  
  • प्रकटीकरण धडा 8  
  • प्रकटीकरण धडा 9  
  • प्रकटीकरण धडा 10  
  • प्रकटीकरण धडा 11  
  • प्रकटीकरण धडा 12  
  • प्रकटीकरण धडा 13  
  • प्रकटीकरण धडा 14  
  • प्रकटीकरण धडा 15  
  • प्रकटीकरण धडा 16  
  • प्रकटीकरण धडा 17  
  • प्रकटीकरण धडा 18  
  • प्रकटीकरण धडा 19  
  • प्रकटीकरण धडा 20  
  • प्रकटीकरण धडा 21  
  • प्रकटीकरण धडा 22  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References