मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
प्रेषितांचीं कृत्यें

प्रेषितांचीं कृत्यें धडा 23

1 पौल यहूदी धर्मसभेच्या सभासदांकडे रोखून पाहत म्हणाला, “माझ्या बंधूलो, मी आजपर्यंत चांगला विवेकभाव बाळगून देवासमोर माझे जीवन जगत आलो आहे.” 2 तेव्हा मुख्य याजक हनन्या याने पौलाच्या जवळ उभे राहिलेल्यांना पौलाच्या थोबाडीत मारण्यास सांगितले. 3 पौल हनन्याला म्हणाला, “सफेती लावलेल्या भिंतीसारख्या माणसा, देव तुला मारील! त्या ठिकाणी बसून नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो आणि तरीही नियमशास्त्राच्या विरुद्ध मला थोबडीत मारण्याचा आदेश देतोस?” 4 जे लोक पौलाच्या जवळ उभे होते ते म्हणाल, “देवाच्या मुख्य याजकाविरुद्ध तू असे बोलू शकत नाहीस, तू त्याचा अपमान करतोस काय?” 5 पौल म्हणाल, “बंधूनो, तो मनुष्य याजक आहे हे मला माहीत नव्हते, कारण असे लिहिले आहे की, ‘तू आपल्या शासन करणाऱ्याविरुद्ध बोलू नकोस”‘ 6 जेव्हा पौलाच्या लक्षात आले की, धर्मसभेतील एक गट सदूकी आहे तर दुसरा परुशी. तेव्हा पौल मोठ्याने ओरडून सर्व धर्मसभेपुढे म्हणाला, “बंधूनो, मी एक परुशी आहे, परुश्याचा मुलगा आहे! मेलेल्यांच्या पुन्हा उठण्यासंबंधी माझी जी आशा आहे, त्यामुळे माइयावर हा चौकशीचा प्रसंग आला आहे.” 7 पौलाने असे म्हणताच, परुशी व सदूकी या दोन गटांमध्ये कलह सुरु झाला. आणि धर्मसभेत फूट पडली. 8 (सदूकी असे म्हणतात की, मृतांचे पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्मे नसतात, परुशी दोन्हीवर विश्वास ठेवतात.) 9 सर्व यहूदी मोठमोठ्याने ओरडून बोलू लागले. तेव्हा नियमशास्त्राचे काही शिक्षक उभे राहिले व जोरदारपणे आपले म्हणणे मांडू लागले. ते म्हणाले, “या मनुष्यात आम्हांला काहीच दोष आढळत नाही. कदाचित एखादा देवदूत किंवा आत्मा त्याच्याशी बोलला असेल!” 10 वादविवादाला हिंसक रुप येऊ लागले. तेव्हा लोक पौलाचे कदाचित तुकडे तुकडे करतील, अशी सरदाराला भीति वाटू लागली, म्हणून त्याने शिपायांना पौलाला तेथून घेऊन जाण्याची आज्ञा केली. व त्याला किल्ल्यात घेऊन जाण्यास सांगितले. 11 त्या रात्री प्रभु पौलाजवळ उभा राहिला. आणि म्हणाला, “धीर धर! कारण जशी तू माइयाविषयी यरुशलेममध्ये साक्ष दिलीस तशी तुला माइयाविषयी रोम येथे साक्ष द्यावी लागेल.” 12 दुसऱ्या सकाळी काही यहूदी लोकांनी एकजूट करुन कट रचला, त्याना पौलाला जिवे मारायचे होते. यहूदी लोकांनी अशा प्रकारची शपथ वाहिली की, पौलाला ठार मारेपर्यंत अन्नपाणी सेवन करायचे नाही. 13 अशा प्रकारे कट करणान्यांची संख्या चाळीस होती. 14 या यहूदी पुढाऱ्यांनी जाऊन मुख्य याजक क वडिलजनांशी बोलणी केली. यहूदी म्हणाले, “आम्ही एक गंभीर शपथ घेतली आहे. पौलाला मारेपर्यंत आम्ही काही खाणार वा पिणार नाही! 15 म्हणून तुम्ही आता असे करा: तुम्ही (मुख्य याजक) व धर्मसभेने अशा प्रकारचा विनंति अर्ज सरदाराला लिहा की, पौलासंबंधी अधिक बारकाईने चौकशी करायची असल्याने पौलाला आमच्याकडे घेऊन यावे. तो येथे येण्याअगोदरच आम्ही त्याला ठार मारण्याच्या तयारीत असू.” 16 पण पौलाच्या बहिणीच्या मुलाने या सर्व गोष्टी ऐकल्या व तो किल्ल्यात गेला. त्याने पौलाला सर्व काही सांगितले, 17 पौलाने एका शताधिपतीला बोलाविले आणि सांगितले या तरुणाला सरदारकडे घेऊन जा. कारण सरदाराला सांगण्यासारखे याच्याकडे काहीतरी आहे. 18 मग त्याने त्या मुलाला घेतले व सरदाराकडे गेला व त्याला म्हणाला, “कैदेत असलेल्या पौलाने मला बोलावून या तरुणाला तुमच्याकडे घेऊन जायला सांगितले. कारण हा तुम्हांला काही तरी सांगणार आहे.” 19 सरदाराने त्या तरुणाचा हात धरुन बाजूला नेले आणि तो त्याला म्हणाला, “तू मला काय सांगणार आहेस?” 20 तो मुलगा म्हणाला, “यहूदी लोकांनी असे ठरविले आहे की, पौलाला घेऊन तुम्हांला उद्या धर्मसभेपुढे यायला सांगायचे, व अशा बहाण्याने त्याला आणायचे की, जणू काय त्यांना पौलाची अधिक बारकाईने चौकाशी करायची आहे. 21 पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका! कारण चाळीस लोकांडून अधिक लोक लपून बसणार आहेत व पौलाला गाठून मारणार आहेत. त्यांनी अशा प्रकारची शपथ वाहिली आहे की, जोपर्यंत ते पौलाला मारणार नाहीत तोपर्यंत कोणीही काहीही खाणार वा पिणार नाही, म्हणून ते आता तुमच्या होकाराची वाट पाहत अगदी तयारीत आहेत.” 22 “तू मला ह्यांविषयी सांगितले आहेस, हे कोणाला सांगू नको!” असे म्हणून सरदारने त्याला जाण्याची आज्ञा केली. 23 मग सरदाराने दोघा शाताधिपतींना बोलाविले, आणि म्हणाला, “दोनशे शिपाई कैसरीयाला जाण्यासाठी तयार ठेवा. तसेच सत्तर घोडेस्वार व दोनशे भालेदार रात्री नऊ वाजता येथून जाण्यासाठी तयार ठेवा! 24 खोगीर घातलेला घोडा पौलासाठी तयार ठेवा. आणि त्याला राज्यपाल फेलीक्स यांच्याकडे सुखरुप न्या.” 25 सरदाराने एक पत्र लिहिले. त्यात असे लिहिलेले होते: 26 क्लौद्य लुसिया याजकडून, राज्यपाल फेलिक्स महाराज यांस, सलाम. 27 या मनुष्याला यहूदी लोकांनी धरले होते. ते त्याला ठार मारण्याच्या बेतात होते. पण तेवढ्यात माझ्या शिपायांसह मी तेथे गेलो व त्याला सोडविले. तो रोमी नागारिक आहे हे समजल्यावरुन मी त्याची सुटका केली. 28 यहूदी लोक त्याच्यावर का दोषारोप करीत आहेत हे कळावे म्हणून मी त्याला धर्मसभेपुढे घेऊन गेलो. 29 यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या प्रश्नावरुन त्यांनी त्याला दोषी ठरविले हे मला दिसून आले. पण त्याच्यावर असा कोणताही आरोप नव्हता, ज्याची शिक्षा मरणदंड किंवा तुरुंगवास होईल. 30 जेव्हा या मनुष्याला जिवे मारण्याचा कट रचला गेल्याचे मला कळले तेव्हा मी त्याला ताबडतोब आपल्याकडे पाठविले. 31 शिपायांनी त्यांना मिळालेल्या हुकुमाचे पालन केले. ते पौलाला घेऊन रात्रीच अंतिपत्रिसास गेले. 32 दुसऱ्या दिवशी घोडेस्वर पौलासोबत कैसरियास गेले. व शिपाई किल्ल्यात परतले. 33 जेव्हा पौल व घोडेस्वार कैसरियास पोहोंचले, तेव्हा त्यांनी राज्यपालाला पत्र दिले. व पौलाला त्याच्या स्वाधीन केले. 34 राज्यपालाने ने पत्र वाचले, व पौल कोणत्या प्रांताचा आहे हे विचारले. जेव्हा त्याला समजले की, तो किलिकीयाचा आहे, तेव्हा तो म्हणाला, 35 “तुझ्यावर दोष ठेवणारे आले म्हणजे तुझे ऐकेन.” पौलाला हेरोदाच्या राजवड्यात पहाऱ्यात ठेवावे असा हुकूमराज्यपालाने दिला.
1. पौल यहूदी धर्मसभेच्या सभासदांकडे रोखून पाहत म्हणाला, “माझ्या बंधूलो, मी आजपर्यंत चांगला विवेकभाव बाळगून देवासमोर माझे जीवन जगत आलो आहे.” 2. तेव्हा मुख्य याजक हनन्या याने पौलाच्या जवळ उभे राहिलेल्यांना पौलाच्या थोबाडीत मारण्यास सांगितले. 3. पौल हनन्याला म्हणाला, “सफेती लावलेल्या भिंतीसारख्या माणसा, देव तुला मारील! त्या ठिकाणी बसून नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो आणि तरीही नियमशास्त्राच्या विरुद्ध मला थोबडीत मारण्याचा आदेश देतोस?” 4. जे लोक पौलाच्या जवळ उभे होते ते म्हणाल, “देवाच्या मुख्य याजकाविरुद्ध तू असे बोलू शकत नाहीस, तू त्याचा अपमान करतोस काय?” 5. पौल म्हणाल, “बंधूनो, तो मनुष्य याजक आहे हे मला माहीत नव्हते, कारण असे लिहिले आहे की, ‘तू आपल्या शासन करणाऱ्याविरुद्ध बोलू नकोस”‘ 6. जेव्हा पौलाच्या लक्षात आले की, धर्मसभेतील एक गट सदूकी आहे तर दुसरा परुशी. तेव्हा पौल मोठ्याने ओरडून सर्व धर्मसभेपुढे म्हणाला, “बंधूनो, मी एक परुशी आहे, परुश्याचा मुलगा आहे! मेलेल्यांच्या पुन्हा उठण्यासंबंधी माझी जी आशा आहे, त्यामुळे माइयावर हा चौकशीचा प्रसंग आला आहे.” 7. पौलाने असे म्हणताच, परुशी व सदूकी या दोन गटांमध्ये कलह सुरु झाला. आणि धर्मसभेत फूट पडली. 8. (सदूकी असे म्हणतात की, मृतांचे पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्मे नसतात, परुशी दोन्हीवर विश्वास ठेवतात.) 9. सर्व यहूदी मोठमोठ्याने ओरडून बोलू लागले. तेव्हा नियमशास्त्राचे काही शिक्षक उभे राहिले व जोरदारपणे आपले म्हणणे मांडू लागले. ते म्हणाले, “या मनुष्यात आम्हांला काहीच दोष आढळत नाही. कदाचित एखादा देवदूत किंवा आत्मा त्याच्याशी बोलला असेल!” 10. वादविवादाला हिंसक रुप येऊ लागले. तेव्हा लोक पौलाचे कदाचित तुकडे तुकडे करतील, अशी सरदाराला भीति वाटू लागली, म्हणून त्याने शिपायांना पौलाला तेथून घेऊन जाण्याची आज्ञा केली. व त्याला किल्ल्यात घेऊन जाण्यास सांगितले. 11. त्या रात्री प्रभु पौलाजवळ उभा राहिला. आणि म्हणाला, “धीर धर! कारण जशी तू माइयाविषयी यरुशलेममध्ये साक्ष दिलीस तशी तुला माइयाविषयी रोम येथे साक्ष द्यावी लागेल.” 12. दुसऱ्या सकाळी काही यहूदी लोकांनी एकजूट करुन कट रचला, त्याना पौलाला जिवे मारायचे होते. यहूदी लोकांनी अशा प्रकारची शपथ वाहिली की, पौलाला ठार मारेपर्यंत अन्नपाणी सेवन करायचे नाही. 13. अशा प्रकारे कट करणान्यांची संख्या चाळीस होती. 14. या यहूदी पुढाऱ्यांनी जाऊन मुख्य याजक क वडिलजनांशी बोलणी केली. यहूदी म्हणाले, “आम्ही एक गंभीर शपथ घेतली आहे. पौलाला मारेपर्यंत आम्ही काही खाणार वा पिणार नाही! 15. म्हणून तुम्ही आता असे करा: तुम्ही (मुख्य याजक) व धर्मसभेने अशा प्रकारचा विनंति अर्ज सरदाराला लिहा की, पौलासंबंधी अधिक बारकाईने चौकशी करायची असल्याने पौलाला आमच्याकडे घेऊन यावे. तो येथे येण्याअगोदरच आम्ही त्याला ठार मारण्याच्या तयारीत असू.” 16. पण पौलाच्या बहिणीच्या मुलाने या सर्व गोष्टी ऐकल्या व तो किल्ल्यात गेला. त्याने पौलाला सर्व काही सांगितले, 17. पौलाने एका शताधिपतीला बोलाविले आणि सांगितले या तरुणाला सरदारकडे घेऊन जा. कारण सरदाराला सांगण्यासारखे याच्याकडे काहीतरी आहे. 18. मग त्याने त्या मुलाला घेतले व सरदाराकडे गेला व त्याला म्हणाला, “कैदेत असलेल्या पौलाने मला बोलावून या तरुणाला तुमच्याकडे घेऊन जायला सांगितले. कारण हा तुम्हांला काही तरी सांगणार आहे.” 19. सरदाराने त्या तरुणाचा हात धरुन बाजूला नेले आणि तो त्याला म्हणाला, “तू मला काय सांगणार आहेस?” 20. तो मुलगा म्हणाला, “यहूदी लोकांनी असे ठरविले आहे की, पौलाला घेऊन तुम्हांला उद्या धर्मसभेपुढे यायला सांगायचे, व अशा बहाण्याने त्याला आणायचे की, जणू काय त्यांना पौलाची अधिक बारकाईने चौकाशी करायची आहे. 21. पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका! कारण चाळीस लोकांडून अधिक लोक लपून बसणार आहेत व पौलाला गाठून मारणार आहेत. त्यांनी अशा प्रकारची शपथ वाहिली आहे की, जोपर्यंत ते पौलाला मारणार नाहीत तोपर्यंत कोणीही काहीही खाणार वा पिणार नाही, म्हणून ते आता तुमच्या होकाराची वाट पाहत अगदी तयारीत आहेत.” 22. “तू मला ह्यांविषयी सांगितले आहेस, हे कोणाला सांगू नको!” असे म्हणून सरदारने त्याला जाण्याची आज्ञा केली. 23. मग सरदाराने दोघा शाताधिपतींना बोलाविले, आणि म्हणाला, “दोनशे शिपाई कैसरीयाला जाण्यासाठी तयार ठेवा. तसेच सत्तर घोडेस्वार व दोनशे भालेदार रात्री नऊ वाजता येथून जाण्यासाठी तयार ठेवा! 24. खोगीर घातलेला घोडा पौलासाठी तयार ठेवा. आणि त्याला राज्यपाल फेलीक्स यांच्याकडे सुखरुप न्या.” 25. सरदाराने एक पत्र लिहिले. त्यात असे लिहिलेले होते: 26. क्लौद्य लुसिया याजकडून, राज्यपाल फेलिक्स महाराज यांस, सलाम. 27. या मनुष्याला यहूदी लोकांनी धरले होते. ते त्याला ठार मारण्याच्या बेतात होते. पण तेवढ्यात माझ्या शिपायांसह मी तेथे गेलो व त्याला सोडविले. तो रोमी नागारिक आहे हे समजल्यावरुन मी त्याची सुटका केली. 28. यहूदी लोक त्याच्यावर का दोषारोप करीत आहेत हे कळावे म्हणून मी त्याला धर्मसभेपुढे घेऊन गेलो. 29. यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या प्रश्नावरुन त्यांनी त्याला दोषी ठरविले हे मला दिसून आले. पण त्याच्यावर असा कोणताही आरोप नव्हता, ज्याची शिक्षा मरणदंड किंवा तुरुंगवास होईल. 30. जेव्हा या मनुष्याला जिवे मारण्याचा कट रचला गेल्याचे मला कळले तेव्हा मी त्याला ताबडतोब आपल्याकडे पाठविले. 31. शिपायांनी त्यांना मिळालेल्या हुकुमाचे पालन केले. ते पौलाला घेऊन रात्रीच अंतिपत्रिसास गेले. 32. दुसऱ्या दिवशी घोडेस्वर पौलासोबत कैसरियास गेले. व शिपाई किल्ल्यात परतले. 33. जेव्हा पौल व घोडेस्वार कैसरियास पोहोंचले, तेव्हा त्यांनी राज्यपालाला पत्र दिले. व पौलाला त्याच्या स्वाधीन केले. 34. राज्यपालाने ने पत्र वाचले, व पौल कोणत्या प्रांताचा आहे हे विचारले. जेव्हा त्याला समजले की, तो किलिकीयाचा आहे, तेव्हा तो म्हणाला, 35. “तुझ्यावर दोष ठेवणारे आले म्हणजे तुझे ऐकेन.” पौलाला हेरोदाच्या राजवड्यात पहाऱ्यात ठेवावे असा हुकूमराज्यपालाने दिला.
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 1  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 2  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 3  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 4  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 5  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 6  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 7  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 8  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 9  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 10  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 11  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 12  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 13  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 14  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 15  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 16  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 17  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 18  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 19  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 20  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 21  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 22  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 23  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 24  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 25  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 26  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 27  
  • प्रेषितांचीं कृत्यें धडा 28  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References