मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
ईयोब

ईयोब धडा 9

1 मग ईयोब उत्तरा दाखल म्हणाला: 2 “तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे माणूस कसा बरोबर ठरेल? 3 मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्र्न विचारु शकतो आणि माणसाला त्याच्या एकाही प्रश्र्नाचे उत्तर देता येत नाही. 4 देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाशी युध्द करु शकणारा माणूस जखमी झाल्याशिवाय कसा राहील? 5 देव क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांना ते कळत देखील नाही. 6 पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी देव भूकंप पाठवतो. देव पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो. 7 देव सूर्याशी बोलू शकतो आणि त्याला उगवू देत नाही. ताऱ्यांनी चमकू नये म्हणून देव त्यांना लपवू शकतो. 8 देवाने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो. 9 देवाने सप्तर्षि, मृगशील व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाशओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले. 10 लोकांना न कळणाऱ्या आश्र्चर्यकारक गोष्टीही देवानेच निर्मिल्या. देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही. 11 देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्याला बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता माझ्या लक्षात येत नाही. 12 देवाने जरी काही घेतले तरी त्याला कोणीही अडवू शकत नाही. ‘तू काय करीत आहेस?’ असे त्याला कुणी विचारु शकत नाही. 13 देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा देवाला घाबरतात.” 14 म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही. 15 मी निष्याप आहे, पण मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो. 16 मी हाक मारल्यानंतर त्याने ओ दिली तरी तो माझे ऐकतो यावर मी विश्वास ठेवणार नाही. 17 देव मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. काहीही कारण नसताना तो मला जखमा देईल. 18 देव मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. तो मला अधिक कष्ट देईल. 19 मी देवाचा पराभव करु शकत नाही. तो सर्वशक्तिमान आहे. मी त्याला न्यायालयात खेचू शकत नाही आणि त्याला माझ्या बाबतीत न्यायी बनवू शकत नाही. देवाला न्यायालयात नेण्यासाठी बळांचा वापर कोण करेल? 20 मी निष्पाप असलो तरी, माझे बोलणेच मला अपराधी बनवते. मी निष्पाप आहे, पण मी बोलल्यावर माझे तोंडच मला अपराधी शाबीत करते. 21 मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो. 22 मी स्वत:शीच म्हणतो: ‘सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.’ 23 काही तरी भयानक घडते आणि निष्पाप माणूस मरतो तेव्हा देव त्याला फक्त हसतो का? 24 एखादा वाईट माणूस सत्ता बळकावतो तेव्हा देव पुढाऱ्यांना जे घडते आहे ते बघण्यापासून दूर ठेवतो का? हे जर खरे असेल तर देव म्हणजे आहे तरी कोण? 25 “माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात आणि त्यात सुखाचा लवलेशही नसतो. 26 भूर्जपत्रापासून बनवलेली जहाज जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्या प्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात. 27 “मी जरी म्हणालो, ‘की मी तक्रार करणार नाही, माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन. 28 तरी त्यामुळे काहीही बदल होणार नाही. दु:खाचे मला अजूनही भय वाटते. 29 मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे? मी म्हणतो, ‘विसरुन जा सारे!’ 30 मी माझे अंग बफर्ाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले. 31 तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील. 32 देव माझ्यासारखा माणूस नाही. म्हणूनच मी त्याला उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही. 33 दोन्ही बाजूऐकून घेणारा कुणी मध्यस्थ असावा असे मला वाटते. मध्यस्थ आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलणारा असावा. 34 देवाच्या शिक्षेची छडी दूर करणारा कुणी असावा असे मला वाटते. त्यामुळे देव मला भीती घालू शकणार नाही. 35 नंतर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.
1. मग ईयोब उत्तरा दाखल म्हणाला: 2. “तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे माणूस कसा बरोबर ठरेल? 3. मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्र्न विचारु शकतो आणि माणसाला त्याच्या एकाही प्रश्र्नाचे उत्तर देता येत नाही. 4. देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाशी युध्द करु शकणारा माणूस जखमी झाल्याशिवाय कसा राहील? 5. देव क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांना ते कळत देखील नाही. 6. पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी देव भूकंप पाठवतो. देव पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो. 7. देव सूर्याशी बोलू शकतो आणि त्याला उगवू देत नाही. ताऱ्यांनी चमकू नये म्हणून देव त्यांना लपवू शकतो. 8. देवाने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो. 9. देवाने सप्तर्षि, मृगशील व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाशओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले. 10. लोकांना न कळणाऱ्या आश्र्चर्यकारक गोष्टीही देवानेच निर्मिल्या. देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही. 11. देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्याला बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता माझ्या लक्षात येत नाही. 12. देवाने जरी काही घेतले तरी त्याला कोणीही अडवू शकत नाही. ‘तू काय करीत आहेस?’ असे त्याला कुणी विचारु शकत नाही. 13. देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा देवाला घाबरतात.” 14. म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही. 15. मी निष्याप आहे, पण मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो. 16. मी हाक मारल्यानंतर त्याने ओ दिली तरी तो माझे ऐकतो यावर मी विश्वास ठेवणार नाही. 17. देव मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. काहीही कारण नसताना तो मला जखमा देईल. 18. देव मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. तो मला अधिक कष्ट देईल. 19. मी देवाचा पराभव करु शकत नाही. तो सर्वशक्तिमान आहे. मी त्याला न्यायालयात खेचू शकत नाही आणि त्याला माझ्या बाबतीत न्यायी बनवू शकत नाही. देवाला न्यायालयात नेण्यासाठी बळांचा वापर कोण करेल? 20. मी निष्पाप असलो तरी, माझे बोलणेच मला अपराधी बनवते. मी निष्पाप आहे, पण मी बोलल्यावर माझे तोंडच मला अपराधी शाबीत करते. 21. मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो. 22. मी स्वत:शीच म्हणतो: ‘सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.’ 23. काही तरी भयानक घडते आणि निष्पाप माणूस मरतो तेव्हा देव त्याला फक्त हसतो का? 24. एखादा वाईट माणूस सत्ता बळकावतो तेव्हा देव पुढाऱ्यांना जे घडते आहे ते बघण्यापासून दूर ठेवतो का? हे जर खरे असेल तर देव म्हणजे आहे तरी कोण? 25. “माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात आणि त्यात सुखाचा लवलेशही नसतो. 26. भूर्जपत्रापासून बनवलेली जहाज जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्या प्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात. 27. “मी जरी म्हणालो, ‘की मी तक्रार करणार नाही, माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन. 28. तरी त्यामुळे काहीही बदल होणार नाही. दु:खाचे मला अजूनही भय वाटते. 29. मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे? मी म्हणतो, ‘विसरुन जा सारे!’ 30. मी माझे अंग बफर्ाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले. 31. तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील. 32. देव माझ्यासारखा माणूस नाही. म्हणूनच मी त्याला उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही. 33. दोन्ही बाजूऐकून घेणारा कुणी मध्यस्थ असावा असे मला वाटते. मध्यस्थ आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलणारा असावा. 34. देवाच्या शिक्षेची छडी दूर करणारा कुणी असावा असे मला वाटते. त्यामुळे देव मला भीती घालू शकणार नाही. 35. नंतर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.
  • स्तोत्रसंहिता धडा 1  
  • स्तोत्रसंहिता धडा 2  
  • स्तोत्रसंहिता धडा 3  
  • स्तोत्रसंहिता धडा 4  
  • स्तोत्रसंहिता धडा 5  
  • स्तोत्रसंहिता धडा 6  
  • स्तोत्रसंहिता धडा 7  
  • स्तोत्रसंहिता धडा 8  
  • स्तोत्रसंहिता धडा 9  
  • स्तोत्रसंहिता धडा 10  
  • स्तोत्रसंहिता धडा 11  
  • स्तोत्रसंहिता धडा 12  
  • स्तोत्रसंहिता धडा 13  
  • स्तोत्रसंहिता धडा 14  
  • स्तोत्रसंहिता धडा 15  
  • स्तोत्रसंहिता धडा 16  
  • स्तोत्रसंहिता धडा 17  
  • स्तोत्रसंहिता धडा 18  
  • स्तोत्रसंहिता धडा 19  
  • स्तोत्रसंहिता धडा 20  
  • स्तोत्रसंहिता धडा 21  
  • स्तोत्रसंहिता धडा 22  
  • स्तोत्रसंहिता धडा 23  
  • स्तोत्रसंहिता धडा 24  
  • स्तोत्रसंहिता धडा 25  
  • स्तोत्रसंहिता धडा 26  
  • स्तोत्रसंहिता धडा 27  
  • स्तोत्रसंहिता धडा 28  
  • स्तोत्रसंहिता धडा 29  
  • स्तोत्रसंहिता धडा 30  
  • स्तोत्रसंहिता धडा 31  
  • स्तोत्रसंहिता धडा 32  
  • स्तोत्रसंहिता धडा 33  
  • स्तोत्रसंहिता धडा 34  
  • स्तोत्रसंहिता धडा 35  
  • स्तोत्रसंहिता धडा 36  
  • स्तोत्रसंहिता धडा 37  
  • स्तोत्रसंहिता धडा 38  
  • स्तोत्रसंहिता धडा 39  
  • स्तोत्रसंहिता धडा 40  
  • स्तोत्रसंहिता धडा 41  
  • स्तोत्रसंहिता धडा 42  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References