मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
1 इतिहास

1 इतिहास धडा 11

1 सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे जमले. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुझे भाऊबंद आहोत, तुझ्याच रक्तामांसाचे आहोत. 2 पूर्वी लढाईत तू आमचे नेतृत्व केले आहेस. शौल राजा असतानाही तू ते केले आहेस. परमेश्वर तुला म्हणाला, ‘दावीदा, तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील. माझ्या लोकांचे नेतृत्व करशील.”‘ 3 इस्राएल लोकांमधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाकडे हेब्रोन येथे आली. परमेश्वरासमोर दावीदाने त्यांच्याशी करार केला. तेव्हा त्या पुढाऱ्यांनी दावीदास अभिषेक केला. आता दावीद इस्राएलाचा राजा झाला. शमुवेल मार्फत परमेश्वराने असे होणार असे वचन दिले होते. 4 सर्व इस्राएल लोकांबरोबर दावीद यरुशलेम नगराकडे गेला. यरुशलेमला त्याकाळी यबूस असे म्हणत असत; आणि तेथे राहणाऱ्यांना यबूसी. ते नगरवासी 5 दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात पाऊल टाकू शकणार नाहीस.” तरीही दावीदाने त्यांचा पाडाव केलाच. दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. यालाच दावीदानगर हे नाव पडले. 6 दावीद म्हणाला, “यबूसी लोकांवरील हल्ल्याचे जो नेतृत्व करील तो माझा सेनापती होईल.” यवाबने हे नेतृत्व केले. हा सरुवेचा मुलगा. यवाब सेनापती झाला. 7 दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याला दावीद नगर नाव पडले. 8 या किल्ल्याभोवती दावीदाने नगराची उभारणी केली. मिल्लो पासून नगराच्या तटबंदीपर्यंत त्याने ते बांधले. जेथे पडझड झाली होती तिथे दुरुस्ती केली. 9 दावीदाच्या मोठेपणात भर पडत गेली. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता. 10 दावीदाच्या, खास सैनिकांच्या पुढाऱ्यांची नावे या यादीत आहेत. दावीदाच्या राज्यात त्यांचेही बळ वाढले. त्यांनी आणि समस्त इस्राएल लोकांनी दावीदाला पाठिंबा दिला आणि त्याला राजा केले. देवाने कबूल केल्याप्रमाणेच हे घडले. 11 दावीदाकडील खास सैनिकांची नावे अशी : याशबाम हखमोनी. हा रथचालकांचा प्रमुख होता. याशबाम एकावेळी तीनशे जणांना आपल्या भाल्याने ठार करु शकत असे. 12 त्यानंतर दोदय अहोही याचा मुलगा एलाजार. एलाजार तिघा पराक्रमींपैकी एक होता. 13 पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे त्या ठिकाणी लढायला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक उभे होते. इस्राएल लोक तेव्हा पळून गेले. 14 पण तीन शूर वीर तिथेच पाय रोवून उभे राहिले आणि त्यांनी बचाव करायचा प्रयत्न केला. पलिष्ट्यांचा त्यांनी पराभव केला. परमेवराने इस्राएल लोकांना मोठा विजय मिळवून दिला. 15 एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तिथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरापैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे जायला जमिनीवरुन सरपटत रांगत निघाले. 16 आणखी एकदा दावीद किल्ल्यांत असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलहेममध्ये होते. 17 तेव्हा आपल्या गावचे पाणी प्यावे असे दावीदाला फार वाटले. तो म्हणाला, “बेथलहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल.” त्याला पाणी हवे होते असे नाही पण तरी तो हे म्हणाला. 18 यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिकमतीने वाट काढली, बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्या तिघांनी दावीदाला आणून दिले. दावीदाने ते पाणी प्यायला नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वराला अर्पण केले. 19 दावीद म्हणाला, “देवा, हे पाणी मी कसे पिऊ? हे मी प्यायलो तर ते इथपर्यंत आणायला ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचे रक्तच प्यायल्यासारखे होईल.” त्याने ते पाणी न प्यायचे कारण हे होय. त्या तीन शूरांनी असे बरेच पराक्रम केले. 20 यवाबचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. अबीशय त्या तिघांएवढाच प्रसिध्द होता. 21 त्या तीन शूरांपेक्षा जास्त याने नाव कमावले. तो त्या तिघामधला नसला तरी त्यांचा नायक झाला. 22 यहोयादा हा एका बलाढ्य माणसाचा मुलगा होता. यहोयादाचा मुलगा बनाया. हा कबसेल येथला होता. बनायाने खूप पराक्रम केले. मवाबातील दोन अग्रगण्य माणसांना त्याने ठार केले. एकदा बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला. 23 मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसर सैनिकाला ठार केले. 24 यहोयादाचा मुलगा बनाया याने असे बरेच पराक्रम केले. तीन शूरांप्रमाणेच त्याने नाव मिळवले. 25 तीस शूरांपेक्षा बनायाचा बोलबाला जास्त झाला. पण तो त्या तिघांपैकी नव्हता. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचे प्रमुख म्हणून नेमले. 26 सैन्यातील शूर सैनिक (तीस वीर) पुढीलप्रमाणे: यवाबचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा मुलगा एलहानान, 27 हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी, 28 तकोइच्या इक्केशचा मुलगा ईरा, अनाथोथचा अबियेजेर 29 शिब्बखाय हूशाथी, ईलाय अहोही, 30 महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेद, 31 बन्यामीनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा मुलगा इत्तय, बनाया पिराथोनी, 32 गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी, 33 अजमावेथ बहरुमी, अलीहबा शालबोनी, 34 हामेश गिजोनी याचे मुलगे, शागे हरारी याचा मुलगा योनाथान, 35 साखार हरारी याचा मुलगा अहीयाम, ऊरचा मुलगा अलीफल, 36 हेफेर मखेराथी, अहीया पलोनी, 37 हेस्त्री कर्मेली, एजबयचा मुलगा नारय, 38 नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा मुलगा मिभार, 39 सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, 40 ईरा, इथ्री, गारेब, इथ्री, 41 उरीया हित्ती, अहलयाचा मुलगा जाबाद, 42 शीजा रउबेनी याचा मुलगा अदीना हा रउबेन्यांचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक, 43 माकाचा मुलगा हानान आणि योशाफाट मिथनी, 44 उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे मुलगे शामा ईयेल 45 शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा 46 अलीएल महवी व एलानामचे मुलगे यरीबय आणि योशव्या व इथ्मा मवाबी, 47 अलीएल, ओबेद न यासीएल मसोबायी.
1. सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे जमले. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुझे भाऊबंद आहोत, तुझ्याच रक्तामांसाचे आहोत. 2. पूर्वी लढाईत तू आमचे नेतृत्व केले आहेस. शौल राजा असतानाही तू ते केले आहेस. परमेश्वर तुला म्हणाला, ‘दावीदा, तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील. माझ्या लोकांचे नेतृत्व करशील.”‘ 3. इस्राएल लोकांमधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाकडे हेब्रोन येथे आली. परमेश्वरासमोर दावीदाने त्यांच्याशी करार केला. तेव्हा त्या पुढाऱ्यांनी दावीदास अभिषेक केला. आता दावीद इस्राएलाचा राजा झाला. शमुवेल मार्फत परमेश्वराने असे होणार असे वचन दिले होते. 4. सर्व इस्राएल लोकांबरोबर दावीद यरुशलेम नगराकडे गेला. यरुशलेमला त्याकाळी यबूस असे म्हणत असत; आणि तेथे राहणाऱ्यांना यबूसी. ते नगरवासी 5. दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात पाऊल टाकू शकणार नाहीस.” तरीही दावीदाने त्यांचा पाडाव केलाच. दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. यालाच दावीदानगर हे नाव पडले. 6. दावीद म्हणाला, “यबूसी लोकांवरील हल्ल्याचे जो नेतृत्व करील तो माझा सेनापती होईल.” यवाबने हे नेतृत्व केले. हा सरुवेचा मुलगा. यवाब सेनापती झाला. 7. दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याला दावीद नगर नाव पडले. 8. या किल्ल्याभोवती दावीदाने नगराची उभारणी केली. मिल्लो पासून नगराच्या तटबंदीपर्यंत त्याने ते बांधले. जेथे पडझड झाली होती तिथे दुरुस्ती केली. 9. दावीदाच्या मोठेपणात भर पडत गेली. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता. 10. दावीदाच्या, खास सैनिकांच्या पुढाऱ्यांची नावे या यादीत आहेत. दावीदाच्या राज्यात त्यांचेही बळ वाढले. त्यांनी आणि समस्त इस्राएल लोकांनी दावीदाला पाठिंबा दिला आणि त्याला राजा केले. देवाने कबूल केल्याप्रमाणेच हे घडले. 11. दावीदाकडील खास सैनिकांची नावे अशी : याशबाम हखमोनी. हा रथचालकांचा प्रमुख होता. याशबाम एकावेळी तीनशे जणांना आपल्या भाल्याने ठार करु शकत असे. 12. त्यानंतर दोदय अहोही याचा मुलगा एलाजार. एलाजार तिघा पराक्रमींपैकी एक होता. 13. पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे त्या ठिकाणी लढायला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक उभे होते. इस्राएल लोक तेव्हा पळून गेले. 14. पण तीन शूर वीर तिथेच पाय रोवून उभे राहिले आणि त्यांनी बचाव करायचा प्रयत्न केला. पलिष्ट्यांचा त्यांनी पराभव केला. परमेवराने इस्राएल लोकांना मोठा विजय मिळवून दिला. 15. एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तिथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरापैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे जायला जमिनीवरुन सरपटत रांगत निघाले. 16. आणखी एकदा दावीद किल्ल्यांत असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलहेममध्ये होते. 17. तेव्हा आपल्या गावचे पाणी प्यावे असे दावीदाला फार वाटले. तो म्हणाला, “बेथलहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल.” त्याला पाणी हवे होते असे नाही पण तरी तो हे म्हणाला. 18. यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिकमतीने वाट काढली, बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्या तिघांनी दावीदाला आणून दिले. दावीदाने ते पाणी प्यायला नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वराला अर्पण केले. 19. दावीद म्हणाला, “देवा, हे पाणी मी कसे पिऊ? हे मी प्यायलो तर ते इथपर्यंत आणायला ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचे रक्तच प्यायल्यासारखे होईल.” त्याने ते पाणी न प्यायचे कारण हे होय. त्या तीन शूरांनी असे बरेच पराक्रम केले. 20. यवाबचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. अबीशय त्या तिघांएवढाच प्रसिध्द होता. 21. त्या तीन शूरांपेक्षा जास्त याने नाव कमावले. तो त्या तिघामधला नसला तरी त्यांचा नायक झाला. 22. यहोयादा हा एका बलाढ्य माणसाचा मुलगा होता. यहोयादाचा मुलगा बनाया. हा कबसेल येथला होता. बनायाने खूप पराक्रम केले. मवाबातील दोन अग्रगण्य माणसांना त्याने ठार केले. एकदा बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला. 23. मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसर सैनिकाला ठार केले. 24. यहोयादाचा मुलगा बनाया याने असे बरेच पराक्रम केले. तीन शूरांप्रमाणेच त्याने नाव मिळवले. 25. तीस शूरांपेक्षा बनायाचा बोलबाला जास्त झाला. पण तो त्या तिघांपैकी नव्हता. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचे प्रमुख म्हणून नेमले. 26. सैन्यातील शूर सैनिक (तीस वीर) पुढीलप्रमाणे: यवाबचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा मुलगा एलहानान, 27. हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी, 28. तकोइच्या इक्केशचा मुलगा ईरा, अनाथोथचा अबियेजेर 29. शिब्बखाय हूशाथी, ईलाय अहोही, 30. महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेद, 31. बन्यामीनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा मुलगा इत्तय, बनाया पिराथोनी, 32. गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी, 33. अजमावेथ बहरुमी, अलीहबा शालबोनी, 34. हामेश गिजोनी याचे मुलगे, शागे हरारी याचा मुलगा योनाथान, 35. साखार हरारी याचा मुलगा अहीयाम, ऊरचा मुलगा अलीफल, 36. हेफेर मखेराथी, अहीया पलोनी, 37. हेस्त्री कर्मेली, एजबयचा मुलगा नारय, 38. नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा मुलगा मिभार, 39. सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, 40. ईरा, इथ्री, गारेब, इथ्री, 41. उरीया हित्ती, अहलयाचा मुलगा जाबाद, 42. शीजा रउबेनी याचा मुलगा अदीना हा रउबेन्यांचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक, 43. माकाचा मुलगा हानान आणि योशाफाट मिथनी, 44. उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे मुलगे शामा ईयेल 45. शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा 46. अलीएल महवी व एलानामचे मुलगे यरीबय आणि योशव्या व इथ्मा मवाबी, 47. अलीएल, ओबेद न यासीएल मसोबायी.
  • 1 इतिहास धडा 1  
  • 1 इतिहास धडा 2  
  • 1 इतिहास धडा 3  
  • 1 इतिहास धडा 4  
  • 1 इतिहास धडा 5  
  • 1 इतिहास धडा 6  
  • 1 इतिहास धडा 7  
  • 1 इतिहास धडा 8  
  • 1 इतिहास धडा 9  
  • 1 इतिहास धडा 10  
  • 1 इतिहास धडा 11  
  • 1 इतिहास धडा 12  
  • 1 इतिहास धडा 13  
  • 1 इतिहास धडा 14  
  • 1 इतिहास धडा 15  
  • 1 इतिहास धडा 16  
  • 1 इतिहास धडा 17  
  • 1 इतिहास धडा 18  
  • 1 इतिहास धडा 19  
  • 1 इतिहास धडा 20  
  • 1 इतिहास धडा 21  
  • 1 इतिहास धडा 22  
  • 1 इतिहास धडा 23  
  • 1 इतिहास धडा 24  
  • 1 इतिहास धडा 25  
  • 1 इतिहास धडा 26  
  • 1 इतिहास धडा 27  
  • 1 इतिहास धडा 28  
  • 1 इतिहास धडा 29  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References