मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
उपदेशक

Notes

No Verse Added

उपदेशक धडा 3

1. सगव्व्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ असते. आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी योग्य वेळेलाच होतील. 2. जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते. रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते. 3. ठर मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते. सगव्व्याचा नाश करण्याची आणि पुन्हा परत सर्व उभारायचीही वेळ असते. 4. रडण्याची आणि हसण्याचीही वेळ असते. दु:खी होण्याची आणि आनंदाने नाचायचीही वेळ असते. 5. हातातली शस्त्रे खाली टाकण्याची वेळ असते आणि ती पुन्हा उचलण्याची ही वेळ असते.कुणाला तरी मिठी मारण्याचीही वेळ असते आणि ती मिठी सैल करण्याचीही योग्य वेळ असते. 6. काहीतरी शोधण्याचीही वेळ यावी लागते आणि ते हरवले आहे हे जाणण्याचीही वेळ असते. गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते. 7. वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते. गप्प बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते. 8. प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते. युध्द करण्याची वेळ असते आणि शांतीचीही वेळ असते. 9. खूप कष्ट केल्यानंतर माणसाला खरोखरच काही मिळते का? नाही. 10. देवाने आपल्याला जे कष्ट करायला लावले ते सगळे मी पाहिले. 11. देवाने आपल्याला या जगाबद्दलविचार करण्याची शक्ती दिली. पण देव जे काही करतो ते आपण पूर्णपणे कधीही समजून घेऊ शकणार नाही. आणि तरीही देव सारे काही अगदी योग्य वेळी करीत असतो. 12. मला समजलेली आणि लोकांनी करण्यासारखी अशी योग्य गोष्ट म्हणजे सुखी असणे, आणि आयुष्य असे पर्यंत आनंद लुटणे. 13. प्रत्येक माणसाने खावे. प्यावे आणि कामाचा आनंद लुटावा असे देवाला वाटते. या देवाने दिलेल्या भेटी आहेत. 14. देव जे काही करतो ते सदैव राहणार आहे असे मी समजतो. देवाच्या कामात लेक आणखी काही मिळवू शकणार नाहीत आणि ते देवाच्या कामातून काही वजाही करू शकणार नाहीत. लोकांनी त्याला मान द्यावा म्हणून देवाने हे सारे केले आहे. 15. पूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या. आपण त्या आता बदलू शकत नाही. आणि पुढेही जे काही घडणार आहे ते आपण बदलू शकणार नाही. पण ज्या लोकांना वाईट वागणूक मिळते त्यांना मदत करायची देवाची इच्छा आहे. 16. मीही आयुष्यात या गोष्टी बघितल्या. मी पाहिले की न्यायालये न्यायाने आणि चांगुलपणाने भरलेली पाहिजेत. पण आता तेथे दुष्ट प्रवृत्ती आहेत. 17. म्हणून मी स्वत:शीच म्हटले, “देवाने सगव्व्या गोष्टींची वेळ ठरवली आहे आणि त्याने लोक ज्या गोष्टी करतात त्यांचा न्याय करण्यासाठी ही योग्य वेळ ठरवली आहे. देव चांगल्या आणि वाईट लोकांचा न्याय करील.” 18. लोक एकमेकांना ज्या गोष्टी करतात त्यांचा मी विचार केला आणि मी स्वत:शीच म्हणालो, “आपण पशूंसारखे आहोत, हे लोकांना कळावे असे देवाला वाटते. 19. माणूस पशूपेक्षा चांगला आहे का? नाही! का? कारण सर्वच निरर्थक आहे. पशूंच्या आणि माणसांच्या बाबतीत सारख्याच गोष्टी घडतात. ते दोघे ही मरतात. माणूस आणि पशू यांचा श्वास सारखाच आहे. मेलेला पशू मेलेल्या माणसापेक्षा वेगळा आहे का? 20. माणसांच्या आणि पशूंच्या शरीराचा नाश सारख्याच प्रकारे होतो. ते जमीनीतून आले आणि शेवटी ते तिथेच जातील. 21. माणसाच्या आत्म्याचे काय होते हे कोणाला माहीत आहे? माणसाचा आत्मा वर देवाकडे जातो की पशूचा आत्मा खाली जमिनीत जातो हे कुणाला माहीत आहे? 22. म्हणून मी पाहिले की माणूस जे काही करतो ते त्याने आनंदाने करावे हे उत्तम. त्याच्याकडे फक्त तेच आहे. माणसाने भविष्याची मुळीच चिंता करू नये. का? कारण भविष्यात काय घडणार आहे ते पहाण्यासाठी माणसाला कुणीही मदत करू शकणार नाही.
1. सगव्व्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ असते. आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी योग्य वेळेलाच होतील. .::. 2. जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते. रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते. .::. 3. ठर मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते. सगव्व्याचा नाश करण्याची आणि पुन्हा परत सर्व उभारायचीही वेळ असते. .::. 4. रडण्याची आणि हसण्याचीही वेळ असते. दु:खी होण्याची आणि आनंदाने नाचायचीही वेळ असते. .::. 5. हातातली शस्त्रे खाली टाकण्याची वेळ असते आणि ती पुन्हा उचलण्याची ही वेळ असते.कुणाला तरी मिठी मारण्याचीही वेळ असते आणि ती मिठी सैल करण्याचीही योग्य वेळ असते. .::. 6. काहीतरी शोधण्याचीही वेळ यावी लागते आणि ते हरवले आहे हे जाणण्याचीही वेळ असते. गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते. .::. 7. वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते. गप्प बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते. .::. 8. प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते. युध्द करण्याची वेळ असते आणि शांतीचीही वेळ असते. .::. 9. खूप कष्ट केल्यानंतर माणसाला खरोखरच काही मिळते का? नाही. .::. 10. देवाने आपल्याला जे कष्ट करायला लावले ते सगळे मी पाहिले. .::. 11. देवाने आपल्याला या जगाबद्दलविचार करण्याची शक्ती दिली. पण देव जे काही करतो ते आपण पूर्णपणे कधीही समजून घेऊ शकणार नाही. आणि तरीही देव सारे काही अगदी योग्य वेळी करीत असतो. .::. 12. मला समजलेली आणि लोकांनी करण्यासारखी अशी योग्य गोष्ट म्हणजे सुखी असणे, आणि आयुष्य असे पर्यंत आनंद लुटणे. .::. 13. प्रत्येक माणसाने खावे. प्यावे आणि कामाचा आनंद लुटावा असे देवाला वाटते. या देवाने दिलेल्या भेटी आहेत. .::. 14. देव जे काही करतो ते सदैव राहणार आहे असे मी समजतो. देवाच्या कामात लेक आणखी काही मिळवू शकणार नाहीत आणि ते देवाच्या कामातून काही वजाही करू शकणार नाहीत. लोकांनी त्याला मान द्यावा म्हणून देवाने हे सारे केले आहे. .::. 15. पूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या. आपण त्या आता बदलू शकत नाही. आणि पुढेही जे काही घडणार आहे ते आपण बदलू शकणार नाही. पण ज्या लोकांना वाईट वागणूक मिळते त्यांना मदत करायची देवाची इच्छा आहे. .::. 16. मीही आयुष्यात या गोष्टी बघितल्या. मी पाहिले की न्यायालये न्यायाने आणि चांगुलपणाने भरलेली पाहिजेत. पण आता तेथे दुष्ट प्रवृत्ती आहेत. .::. 17. म्हणून मी स्वत:शीच म्हटले, “देवाने सगव्व्या गोष्टींची वेळ ठरवली आहे आणि त्याने लोक ज्या गोष्टी करतात त्यांचा न्याय करण्यासाठी ही योग्य वेळ ठरवली आहे. देव चांगल्या आणि वाईट लोकांचा न्याय करील.” .::. 18. लोक एकमेकांना ज्या गोष्टी करतात त्यांचा मी विचार केला आणि मी स्वत:शीच म्हणालो, “आपण पशूंसारखे आहोत, हे लोकांना कळावे असे देवाला वाटते. .::. 19. माणूस पशूपेक्षा चांगला आहे का? नाही! का? कारण सर्वच निरर्थक आहे. पशूंच्या आणि माणसांच्या बाबतीत सारख्याच गोष्टी घडतात. ते दोघे ही मरतात. माणूस आणि पशू यांचा श्वास सारखाच आहे. मेलेला पशू मेलेल्या माणसापेक्षा वेगळा आहे का? .::. 20. माणसांच्या आणि पशूंच्या शरीराचा नाश सारख्याच प्रकारे होतो. ते जमीनीतून आले आणि शेवटी ते तिथेच जातील. .::. 21. माणसाच्या आत्म्याचे काय होते हे कोणाला माहीत आहे? माणसाचा आत्मा वर देवाकडे जातो की पशूचा आत्मा खाली जमिनीत जातो हे कुणाला माहीत आहे? .::. 22. म्हणून मी पाहिले की माणूस जे काही करतो ते त्याने आनंदाने करावे हे उत्तम. त्याच्याकडे फक्त तेच आहे. माणसाने भविष्याची मुळीच चिंता करू नये. का? कारण भविष्यात काय घडणार आहे ते पहाण्यासाठी माणसाला कुणीही मदत करू शकणार नाही.
  • उपदेशक धडा 1  
  • उपदेशक धडा 2  
  • उपदेशक धडा 3  
  • उपदेशक धडा 4  
  • उपदेशक धडा 5  
  • उपदेशक धडा 6  
  • उपदेशक धडा 7  
  • उपदेशक धडा 8  
  • उपदेशक धडा 9  
  • उपदेशक धडा 10  
  • उपदेशक धडा 11  
  • उपदेशक धडा 12  
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References