मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
लूक

लूक धडा 7

1 ज्या बोधकथा लोकांनी ऐकाव्यात असे त्याला वाटत होते त्या सांगण्याचे संपविल्यावर तो कफर्णहूमास गेला. 2 तेथे एक रोमी शताधिपती होता. त्याचा गुलाम इतका आजारी होता की, तो मरावयास टेकला होता. हा गुलाम त्या शताधिपतीचा फार आवडता होता. 3 जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले, व अशी विनंति केली की, त्याने येऊन त्याच्या गुलामाला वाचवावे. 4 जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी मन:पूर्वक विनंति केली, ते म्हणाले, “तू त्याच्यासाठी हे करावेस कारण तो त्या योग्यतेचा आहे. 5 कारण तो आमच्या लोकांवर प्रेम करतो, त्याने आमचे सभास्थान आम्हांला बाधून दिले.” 6 म्हणून येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घरापासून दूर नव्हता, तोच शताधिपतीने मित्रांना असे सांगण्यासाठी पाठविले की, “प्रभु, आपण त्रास करुन घेऊ नका, कारण आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. 7 यासाठी मी स्वत: आपणाकडे येऊ नये असा विचार केला होता. परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. 8 कारण मीही ताबेदार असून माझ्या अधिपत्याखाली शिपाई आहेत. मी एखाद्याला “जा’ असे म्हणतो, आणि तो जातो, दुसऱ्याला “ये’ म्हणतो आणि तो येतो. मी माझ्या गुलामाला म्हणतो, “हे कर!’ आणि तो ते करतो.” 9 जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी (शताधिपतीविषयी) आश्चर्य वाटले. तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.” 10 ज्यांना पाठविले होते, ते घराकडे परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे. 11 नंतर असे झाले की, येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता. 12 तो गावाच्या वेशीजवळ आला असता, एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरीता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. आणि ती विधवा होती. आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. 13 जेव्हा प्रभुने तिला पाहिले, त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तीला म्हणाला, “रडू नकोस.” 14 नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते, ते थांबले. 15 तेव्हा येशू म्हणाला, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!” आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले. 16 ते सर्व भयचकित झाले, त्यांनी देवाचे गौरव केले; ते म्हणाले, “आमच्यामध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे.” आणि म्हणाले, “देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे!” 17 येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीयात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली. 18 योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्व सांगितले, नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलाविले 19 आणि त्याने त्यांना प्रभुकडे हे विचारण्यासाठी पाठविले की, “जो येणारा तो तूच आहेस की, आम्ही दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा करावी?”‘ 20 जेव्हा लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हांला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, “जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्या कोणाची अपेक्षा करावी?”‘ 21 त्यावेळी येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील भुते काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. 22 येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा: आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात. 23 जो मला अनमान न करता स्वीकारतो, तो धन्य.” 24 योहानाचे निरोपे गेल्यावर येशू समुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला: “वाळवंटात तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता? वाऱ्याने वाकलेल बोरु? 25 नाही, मग काय पाहण्यासाठी तुम्ही गेला होता? कपडे घातलेला मनुष्य? नाही. तलम कपडे घालणारे आणि ऐषारामात राहणारे लोक राजवाड्यात राहतात. 26 पण तुम्ही बाहेर काय पाहण्यासाठी गोला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही संदेष्ट्यापेक्षा काही तरी अधिक पाहिले आहे! 27 हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे,“पाहा, मी माझ्या संदेशवहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे. तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ मलाखी. 3:1 28 मी तुम्हांला सांगतो, जे स्त्रियांपासून जन्मले त्यात योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीही देवाच्या राज्यातील अगदी सामान्य माणूस सुध्दा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. 29 “जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी मान्य केले की, देवाची शिकवण चांगली आहे. जकातदारसुद्धा सहमत झाले. या लोकांना योहानाने अगोदरच बाप्तिस्मा दिला होता. 30 पण परुशी व नियमाशास्त्राच्या शिक्षकांनी देवाची त्यांच्याविषयी असलेली योजना नाकारली. त्यांनी योहानाला त्यांचा बाप्तिस्मा करु दिला नाही. 31 मग मी या पिढीची कोणाशी तुलना करु? ते कोणासारखे आहेत? 32 ते उनाड मुलांसारखे आहेत, ते बाजारात बसतात, ते एकमेकाला म्हणतात,“आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला पण तुम्ही नाचला नाही. आम्ही तुमच्यासाठी शोकगीत गाईले पण तुम्ही रडला नाही.’ 33 बाप्तिस्मा करणारा योहान हा भाकर किंवा द्राक्षारस खात किंवा पीत आला नाही. पण तुम्ही म्हणता, “त्याला भूत लागले आहे.’ 34 मनुष्याचा पुत्र खात पीत आला आणि तुम्ही म्हणता; “पाहा, तो खादाड, मद्यपी, जकातदारंचा आणि पाप्यांचा मित्र आहे.’ 35 ज्ञान तेव्हा योग्य ठरते, जेव्हा त्याचा वापर केल्याने झालेल्या गोष्टी योग्य असतात.” 36 कोणा एका परुश्याने येशूला त्याच्याबरोबर जेवणाचे आमंत्रण दिले, म्हणून तो परुश्याच्या घरी गेला व मेजासभोवती आपल्या जागेवर बसला. 37 तेथे त्या गावात एक स्त्री होती, ती पापी होती, जेव्हा तिला समजले की, येशू परुश्याच्या घरी जेवत आहे, तेव्हा तिने सुगंधी तेलाचे एक अलावास्त्र भांडे आणले. 38 ती त्याच्या पाठीमागे पायाशी उभी राहून रडत होती, ती आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. नंतर तिने ते आपल्या केसांनी पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले व त्यावर सुगंधी तेल ओतले. 39 ज्या परुश्याने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वत:शी म्हणाला, “जर हा मनुष्य संदेष्टा असता, तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे, हे त्याला कळले असते!” 40 येशू त्याला म्हणाला, “शिमोना, मला तुला काही सांगायचे आहे.” त्याने उत्तर दिले, “सांगा गुरुजी.” 41 येशू म्हणाला, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाकडे पाचशे चांदीची नाणी आणि दुसऱ्याकडे पन्नास चांदीची नाणी असे कर्ज होते. 42 ते कर्ज फेडू शकत नसल्याने सावकाराने दोघांचीही कर्ज माफ केली, आता त्यांच्यापैकी कोण त्याच्यावर अधिक प्रेम करील?” 43 शिमोनाने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.”येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर ओळखलेस.” 44 तो स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हणाला, “तू ही स्त्री पाहतोस काय? मी तुझ्या घरी आलो तेव्हा माझे पाय धुण्यास तू मला पाणी दिले नाहीस. परंतु हिने माझे पाय अंश्रूंनी ओले केले. ते तिने केसांनी पुसले. 45 तू मला साधे शुभेच्छालिंगन सुध्दा दिले नाहीस, पण मी आत आल्यापासून तिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. 46 तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु होने माझ्या पायावर सुगंधी तेल ओतले. 47 यासाठी मी तुला सांगतो की तिच्या अनेक पापांची क्षमा झाली आहे. हे स्पष्ट आहे कारण तिने विपुल प्रेम दाखविले आहे. परंतु ज्याला कमी माफ केले आहे तो कमी प्रेम करतो.” 48 तेव्हा तो तिला म्हणाला, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” 49 नंतर जे त्यांच्याबरोबर जेवत होते ते स्वत:शीच म्हणू लागले, “हा कोण आहे, जो पापांचीसुद्धा क्षमा करतो?” 50 पण तो स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला वाचविले आहे, शांतिने जा.”
1. ज्या बोधकथा लोकांनी ऐकाव्यात असे त्याला वाटत होते त्या सांगण्याचे संपविल्यावर तो कफर्णहूमास गेला. 2. तेथे एक रोमी शताधिपती होता. त्याचा गुलाम इतका आजारी होता की, तो मरावयास टेकला होता. हा गुलाम त्या शताधिपतीचा फार आवडता होता. 3. जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले, व अशी विनंति केली की, त्याने येऊन त्याच्या गुलामाला वाचवावे. 4. जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी मन:पूर्वक विनंति केली, ते म्हणाले, “तू त्याच्यासाठी हे करावेस कारण तो त्या योग्यतेचा आहे. 5. कारण तो आमच्या लोकांवर प्रेम करतो, त्याने आमचे सभास्थान आम्हांला बाधून दिले.” 6. म्हणून येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घरापासून दूर नव्हता, तोच शताधिपतीने मित्रांना असे सांगण्यासाठी पाठविले की, “प्रभु, आपण त्रास करुन घेऊ नका, कारण आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. 7. यासाठी मी स्वत: आपणाकडे येऊ नये असा विचार केला होता. परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. 8. कारण मीही ताबेदार असून माझ्या अधिपत्याखाली शिपाई आहेत. मी एखाद्याला “जा’ असे म्हणतो, आणि तो जातो, दुसऱ्याला “ये’ म्हणतो आणि तो येतो. मी माझ्या गुलामाला म्हणतो, “हे कर!’ आणि तो ते करतो.” 9. जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी (शताधिपतीविषयी) आश्चर्य वाटले. तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.” 10. ज्यांना पाठविले होते, ते घराकडे परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे. 11. नंतर असे झाले की, येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता. 12. तो गावाच्या वेशीजवळ आला असता, एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरीता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. आणि ती विधवा होती. आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. 13. जेव्हा प्रभुने तिला पाहिले, त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तीला म्हणाला, “रडू नकोस.” 14. नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते, ते थांबले. 15. तेव्हा येशू म्हणाला, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!” आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले. 16. ते सर्व भयचकित झाले, त्यांनी देवाचे गौरव केले; ते म्हणाले, “आमच्यामध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे.” आणि म्हणाले, “देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे!” 17. येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीयात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली. 18. योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्व सांगितले, नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलाविले 19. आणि त्याने त्यांना प्रभुकडे हे विचारण्यासाठी पाठविले की, “जो येणारा तो तूच आहेस की, आम्ही दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा करावी?”‘ 20. जेव्हा लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हांला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, “जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्या कोणाची अपेक्षा करावी?”‘ 21. त्यावेळी येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील भुते काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. 22. येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा: आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात. 23. जो मला अनमान न करता स्वीकारतो, तो धन्य.” 24. योहानाचे निरोपे गेल्यावर येशू समुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला: “वाळवंटात तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता? वाऱ्याने वाकलेल बोरु? 25. नाही, मग काय पाहण्यासाठी तुम्ही गेला होता? कपडे घातलेला मनुष्य? नाही. तलम कपडे घालणारे आणि ऐषारामात राहणारे लोक राजवाड्यात राहतात. 26. पण तुम्ही बाहेर काय पाहण्यासाठी गोला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही संदेष्ट्यापेक्षा काही तरी अधिक पाहिले आहे! 27. हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे,“पाहा, मी माझ्या संदेशवहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे. तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ मलाखी. 3:1 28. मी तुम्हांला सांगतो, जे स्त्रियांपासून जन्मले त्यात योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीही देवाच्या राज्यातील अगदी सामान्य माणूस सुध्दा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. 29. “जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी मान्य केले की, देवाची शिकवण चांगली आहे. जकातदारसुद्धा सहमत झाले. या लोकांना योहानाने अगोदरच बाप्तिस्मा दिला होता. 30. पण परुशी व नियमाशास्त्राच्या शिक्षकांनी देवाची त्यांच्याविषयी असलेली योजना नाकारली. त्यांनी योहानाला त्यांचा बाप्तिस्मा करु दिला नाही. 31. मग मी या पिढीची कोणाशी तुलना करु? ते कोणासारखे आहेत? 32. ते उनाड मुलांसारखे आहेत, ते बाजारात बसतात, ते एकमेकाला म्हणतात,“आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला पण तुम्ही नाचला नाही. आम्ही तुमच्यासाठी शोकगीत गाईले पण तुम्ही रडला नाही.’ 33. बाप्तिस्मा करणारा योहान हा भाकर किंवा द्राक्षारस खात किंवा पीत आला नाही. पण तुम्ही म्हणता, “त्याला भूत लागले आहे.’ 34. मनुष्याचा पुत्र खात पीत आला आणि तुम्ही म्हणता; “पाहा, तो खादाड, मद्यपी, जकातदारंचा आणि पाप्यांचा मित्र आहे.’ 35. ज्ञान तेव्हा योग्य ठरते, जेव्हा त्याचा वापर केल्याने झालेल्या गोष्टी योग्य असतात.” 36. कोणा एका परुश्याने येशूला त्याच्याबरोबर जेवणाचे आमंत्रण दिले, म्हणून तो परुश्याच्या घरी गेला व मेजासभोवती आपल्या जागेवर बसला. 37. तेथे त्या गावात एक स्त्री होती, ती पापी होती, जेव्हा तिला समजले की, येशू परुश्याच्या घरी जेवत आहे, तेव्हा तिने सुगंधी तेलाचे एक अलावास्त्र भांडे आणले. 38. ती त्याच्या पाठीमागे पायाशी उभी राहून रडत होती, ती आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. नंतर तिने ते आपल्या केसांनी पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले व त्यावर सुगंधी तेल ओतले. 39. ज्या परुश्याने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वत:शी म्हणाला, “जर हा मनुष्य संदेष्टा असता, तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे, हे त्याला कळले असते!” 40. येशू त्याला म्हणाला, “शिमोना, मला तुला काही सांगायचे आहे.” त्याने उत्तर दिले, “सांगा गुरुजी.” 41. येशू म्हणाला, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाकडे पाचशे चांदीची नाणी आणि दुसऱ्याकडे पन्नास चांदीची नाणी असे कर्ज होते. 42. ते कर्ज फेडू शकत नसल्याने सावकाराने दोघांचीही कर्ज माफ केली, आता त्यांच्यापैकी कोण त्याच्यावर अधिक प्रेम करील?” 43. शिमोनाने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.”येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर ओळखलेस.” 44. तो स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हणाला, “तू ही स्त्री पाहतोस काय? मी तुझ्या घरी आलो तेव्हा माझे पाय धुण्यास तू मला पाणी दिले नाहीस. परंतु हिने माझे पाय अंश्रूंनी ओले केले. ते तिने केसांनी पुसले. 45. तू मला साधे शुभेच्छालिंगन सुध्दा दिले नाहीस, पण मी आत आल्यापासून तिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. 46. तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु होने माझ्या पायावर सुगंधी तेल ओतले. 47. यासाठी मी तुला सांगतो की तिच्या अनेक पापांची क्षमा झाली आहे. हे स्पष्ट आहे कारण तिने विपुल प्रेम दाखविले आहे. परंतु ज्याला कमी माफ केले आहे तो कमी प्रेम करतो.” 48. तेव्हा तो तिला म्हणाला, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” 49. नंतर जे त्यांच्याबरोबर जेवत होते ते स्वत:शीच म्हणू लागले, “हा कोण आहे, जो पापांचीसुद्धा क्षमा करतो?” 50. पण तो स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला वाचविले आहे, शांतिने जा.”
  • लूक धडा 1  
  • लूक धडा 2  
  • लूक धडा 3  
  • लूक धडा 4  
  • लूक धडा 5  
  • लूक धडा 6  
  • लूक धडा 7  
  • लूक धडा 8  
  • लूक धडा 9  
  • लूक धडा 10  
  • लूक धडा 11  
  • लूक धडा 12  
  • लूक धडा 13  
  • लूक धडा 14  
  • लूक धडा 15  
  • लूक धडा 16  
  • लूक धडा 17  
  • लूक धडा 18  
  • लूक धडा 19  
  • लूक धडा 20  
  • लूक धडा 21  
  • लूक धडा 22  
  • लूक धडा 23  
  • लूक धडा 24  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References