मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
लेवीय

लेवीय धडा 12

1 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध राहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी. 3 आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी. 4 नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस काढावे लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्र स्थानात जाऊ नये. 5 परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील. 6 “तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धीहोण्याची मुदत पुरी झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोंकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत. 7 तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी. 8 मग याजकाने ते होले किंवा ती पिले परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.”
1 परमेश्वर मोशेला म्हणाला, .::. 2 “इस्राएल लोकांना सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध राहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी. .::. 3 आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी. .::. 4 नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस काढावे लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्र स्थानात जाऊ नये. .::. 5 परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील. .::. 6 “तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धीहोण्याची मुदत पुरी झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोंकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत. .::. 7 तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी. .::. 8 मग याजकाने ते होले किंवा ती पिले परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.”
  • लेवीय धडा 1  
  • लेवीय धडा 2  
  • लेवीय धडा 3  
  • लेवीय धडा 4  
  • लेवीय धडा 5  
  • लेवीय धडा 6  
  • लेवीय धडा 7  
  • लेवीय धडा 8  
  • लेवीय धडा 9  
  • लेवीय धडा 10  
  • लेवीय धडा 11  
  • लेवीय धडा 12  
  • लेवीय धडा 13  
  • लेवीय धडा 14  
  • लेवीय धडा 15  
  • लेवीय धडा 16  
  • लेवीय धडा 17  
  • लेवीय धडा 18  
  • लेवीय धडा 19  
  • लेवीय धडा 20  
  • लेवीय धडा 21  
  • लेवीय धडा 22  
  • लेवीय धडा 23  
  • लेवीय धडा 24  
  • लेवीय धडा 25  
  • लेवीय धडा 26  
  • लेवीय धडा 27  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References