मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यशया

यशया धडा 42

परमेश्वराचा सेवक 1 पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः मी आपला आत्मा त्याच्याठायी ठेवीन; तो राष्ट्रावर न्याय आणील. 2 तो मोठ्याने ओरडणार नाही किंवा आरोळी ठोकणार नाही किंवा त्याचा आवाज रस्त्यावर ऐकू येऊ देणार नाही. 3 तो चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणती वातसुध्दा तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय देईल. 4 पृथ्वीवर न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो मंदावणार नाही किंवा धैर्यहीन होणार नाही; आणि किनारपट्टीवरील देश त्याच्या नियमशास्त्राची वाट पाहतील. 5 परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जीवन दिले आहे; तो त्यावरील लोकांस श्वास देतो आणि त्यावर राहणाऱ्यांना जिवन देतो; 6 मी, परमेश्वराने, तुला न्यायानुसार बोलाविले आहे आणि तुझा हात धरीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी करार व परराष्ट्रीयांसाठी प्रकाश देणारा असे करीन. 7 आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिवानांना अंधारकोठडीतून आणि अंधारात बसलेल्यांना बंदीगृहातून सोडवावे. 8 “मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे; आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही. 9 पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, आता मी नवीन घटनेबद्दल जाहीर करतो. त्या होण्यापूर्वी मी त्याबद्दल तुम्हास सांगत आहे.” परमेश्वराच्या महान मुक्तीबद्दल स्तवन 10 परमेश्वरास नवीन गाणे गा, आणि पृथ्वीच्या शेवटापासून, जे तुम्ही खाली समुद्रात जाता आणि त्याच्यात जे आहे ते सर्व, किनाऱ्यावरील देश आणि तेथे राहणारे त्याची स्तुती करा. 11 वाळवंटांनो आणि नगरांनो आरोळी मारा, ज्या खेड्यात केदार राहतो, मोठ्याने आनंदाने ओरडा! सेलात राहणाऱ्यांनो गायन करोत, डोंगरमाथ्यावरून आरोळी करोत. 12 त्यांना परमेश्वरास गौरव देऊ द्या आणि किनाऱ्यावरील देशात त्याची स्तुती जाहीर करोत. 13 परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल. तो ओरडेल, होय! तो आपल्या युद्धाची मोठ्याने ओरडून गर्जना करील; तो आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखवील. 14 बराच वेळ मी काही बोललो नाही; मी स्तब्ध राहिलो आणि स्वतःवर संयम ठेवला; आता मी प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मोठ्याने ओरडेन, मी उसासे व धापा टाकीन. 15 मी टेकड्या आणि पर्वत उध्वस्त करीन आणि त्यांचे सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन; आणि मी नद्यांची बेटे करीन आणि पाणथळ जमीन कोरडी करीन. 16 मी आंधळ्यांना माहीत नसलेल्या मार्गाने आणीन, त्यांना माहीत नसलेल्या वाटेने मी त्यांना नेईन, मी त्यांच्यापुढे अंधाराचा प्रकाश करीन, वाकडी ठिकाणे सरळ करीन. या गोष्टी मी करीन आणि मी त्यांना सोडणार नाही. 17 जे कोणी कोरीव मूर्तीवर भरवसा ठेवतात, ओतीव मूर्तींना म्हणतात, तुम्ही आमचे देव आहात. ते मागे वळतील, ते पूर्णपणे लज्जित होतील. शिस्तीचे फायदे मिळवण्यास इस्राएल असमर्थ 18 तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; आणि तुम्ही आंधळ्यांनो, तुम्हास दिसावे म्हणून तुम्ही पाहा. 19 माझ्या सेवकाशिवाय कोण आंधळा आहे? किंवा ज्याला मी पाठवले त्या माझ्या निरोप्यासारखा बहिरा कोण आहे? माझ्या कराराच्या भागीदारासारखा किंवा परमेश्वराच्या सेवकासारखा आंधळा कोण आहे? 20 तुम्ही पुष्कळ गोष्टी पाहता, परंतु त्याचे आकलन होत नाही; त्याचे कान उघडे आहेत, परंतु कोणी एक ऐकत नाही. 21 परमेश्वर आपल्या न्यायीपणामुळे आणि नियमशास्त्र वैभवशाली केल्याने खूश झाला. 22 पण हे लोक लुटलेले आणि लुबाडलेले आहेत; ते सर्व खड्ड्यामध्ये सापळ्यात पडलेले आहेत, तुरुंगात कैदी झाले आहेत; ते सर्व लूट असे झाले आहेत त्यांना सोडवणारा कोणी नाही आणि त्यांना परत माघारी म्हणणारा कोणी नाही! 23 तुमच्यातील याकडे कोण कान देईल? भविष्यात कोण कान देऊन ऐकेल आणि श्रवण करील? 24 याकोबाला लुटीस व इस्राएलास लुटणाऱ्यांस कोणी दिले? ज्या परमेश्वराविरूद्ध आम्ही पाप केले, त्याच्या मार्गाने चालण्यास त्यांनी नकार दिला आणि त्याचे नियम पाळण्याचे त्यांनी नाकारले त्यानेच की नाही? 25 म्हणून त्याने आपला भडकलेला कोप त्यांच्याविरुद्ध नासधूसीच्या युद्धासह ओतला. त्याने त्यांच्या सभोवती आग लावली तरी त्यांना कळले नाही; त्यास जाळले. पण तरी तो मनावर घेईना.
परमेश्वराचा सेवक 1 पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः मी आपला आत्मा त्याच्याठायी ठेवीन; तो राष्ट्रावर न्याय आणील. .::. 2 तो मोठ्याने ओरडणार नाही किंवा आरोळी ठोकणार नाही किंवा त्याचा आवाज रस्त्यावर ऐकू येऊ देणार नाही. .::. 3 तो चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणती वातसुध्दा तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय देईल. .::. 4 पृथ्वीवर न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो मंदावणार नाही किंवा धैर्यहीन होणार नाही; आणि किनारपट्टीवरील देश त्याच्या नियमशास्त्राची वाट पाहतील. .::. 5 परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जीवन दिले आहे; तो त्यावरील लोकांस श्वास देतो आणि त्यावर राहणाऱ्यांना जिवन देतो; .::. 6 मी, परमेश्वराने, तुला न्यायानुसार बोलाविले आहे आणि तुझा हात धरीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी करार व परराष्ट्रीयांसाठी प्रकाश देणारा असे करीन. .::. 7 आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिवानांना अंधारकोठडीतून आणि अंधारात बसलेल्यांना बंदीगृहातून सोडवावे. .::. 8 “मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे; आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही. .::. 9 पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, आता मी नवीन घटनेबद्दल जाहीर करतो. त्या होण्यापूर्वी मी त्याबद्दल तुम्हास सांगत आहे.” .::. परमेश्वराच्या महान मुक्तीबद्दल स्तवन 10 परमेश्वरास नवीन गाणे गा, आणि पृथ्वीच्या शेवटापासून, जे तुम्ही खाली समुद्रात जाता आणि त्याच्यात जे आहे ते सर्व, किनाऱ्यावरील देश आणि तेथे राहणारे त्याची स्तुती करा. .::. 11 वाळवंटांनो आणि नगरांनो आरोळी मारा, ज्या खेड्यात केदार राहतो, मोठ्याने आनंदाने ओरडा! सेलात राहणाऱ्यांनो गायन करोत, डोंगरमाथ्यावरून आरोळी करोत. .::. 12 त्यांना परमेश्वरास गौरव देऊ द्या आणि किनाऱ्यावरील देशात त्याची स्तुती जाहीर करोत. .::. 13 परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल. तो ओरडेल, होय! तो आपल्या युद्धाची मोठ्याने ओरडून गर्जना करील; तो आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखवील. .::. 14 बराच वेळ मी काही बोललो नाही; मी स्तब्ध राहिलो आणि स्वतःवर संयम ठेवला; आता मी प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मोठ्याने ओरडेन, मी उसासे व धापा टाकीन. .::. 15 मी टेकड्या आणि पर्वत उध्वस्त करीन आणि त्यांचे सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन; आणि मी नद्यांची बेटे करीन आणि पाणथळ जमीन कोरडी करीन. .::. 16 मी आंधळ्यांना माहीत नसलेल्या मार्गाने आणीन, त्यांना माहीत नसलेल्या वाटेने मी त्यांना नेईन, मी त्यांच्यापुढे अंधाराचा प्रकाश करीन, वाकडी ठिकाणे सरळ करीन. या गोष्टी मी करीन आणि मी त्यांना सोडणार नाही. .::. 17 जे कोणी कोरीव मूर्तीवर भरवसा ठेवतात, ओतीव मूर्तींना म्हणतात, तुम्ही आमचे देव आहात. ते मागे वळतील, ते पूर्णपणे लज्जित होतील. .::. शिस्तीचे फायदे मिळवण्यास इस्राएल असमर्थ 18 तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; आणि तुम्ही आंधळ्यांनो, तुम्हास दिसावे म्हणून तुम्ही पाहा. .::. 19 माझ्या सेवकाशिवाय कोण आंधळा आहे? किंवा ज्याला मी पाठवले त्या माझ्या निरोप्यासारखा बहिरा कोण आहे? माझ्या कराराच्या भागीदारासारखा किंवा परमेश्वराच्या सेवकासारखा आंधळा कोण आहे? .::. 20 तुम्ही पुष्कळ गोष्टी पाहता, परंतु त्याचे आकलन होत नाही; त्याचे कान उघडे आहेत, परंतु कोणी एक ऐकत नाही. .::. 21 परमेश्वर आपल्या न्यायीपणामुळे आणि नियमशास्त्र वैभवशाली केल्याने खूश झाला. .::. 22 पण हे लोक लुटलेले आणि लुबाडलेले आहेत; ते सर्व खड्ड्यामध्ये सापळ्यात पडलेले आहेत, तुरुंगात कैदी झाले आहेत; ते सर्व लूट असे झाले आहेत त्यांना सोडवणारा कोणी नाही आणि त्यांना परत माघारी म्हणणारा कोणी नाही! .::. 23 तुमच्यातील याकडे कोण कान देईल? भविष्यात कोण कान देऊन ऐकेल आणि श्रवण करील? .::. 24 याकोबाला लुटीस व इस्राएलास लुटणाऱ्यांस कोणी दिले? ज्या परमेश्वराविरूद्ध आम्ही पाप केले, त्याच्या मार्गाने चालण्यास त्यांनी नकार दिला आणि त्याचे नियम पाळण्याचे त्यांनी नाकारले त्यानेच की नाही? .::. 25 म्हणून त्याने आपला भडकलेला कोप त्यांच्याविरुद्ध नासधूसीच्या युद्धासह ओतला. त्याने त्यांच्या सभोवती आग लावली तरी त्यांना कळले नाही; त्यास जाळले. पण तरी तो मनावर घेईना.
  • यशया धडा 1  
  • यशया धडा 2  
  • यशया धडा 3  
  • यशया धडा 4  
  • यशया धडा 5  
  • यशया धडा 6  
  • यशया धडा 7  
  • यशया धडा 8  
  • यशया धडा 9  
  • यशया धडा 10  
  • यशया धडा 11  
  • यशया धडा 12  
  • यशया धडा 13  
  • यशया धडा 14  
  • यशया धडा 15  
  • यशया धडा 16  
  • यशया धडा 17  
  • यशया धडा 18  
  • यशया धडा 19  
  • यशया धडा 20  
  • यशया धडा 21  
  • यशया धडा 22  
  • यशया धडा 23  
  • यशया धडा 24  
  • यशया धडा 25  
  • यशया धडा 26  
  • यशया धडा 27  
  • यशया धडा 28  
  • यशया धडा 29  
  • यशया धडा 30  
  • यशया धडा 31  
  • यशया धडा 32  
  • यशया धडा 33  
  • यशया धडा 34  
  • यशया धडा 35  
  • यशया धडा 36  
  • यशया धडा 37  
  • यशया धडा 38  
  • यशया धडा 39  
  • यशया धडा 40  
  • यशया धडा 41  
  • यशया धडा 42  
  • यशया धडा 43  
  • यशया धडा 44  
  • यशया धडा 45  
  • यशया धडा 46  
  • यशया धडा 47  
  • यशया धडा 48  
  • यशया धडा 49  
  • यशया धडा 50  
  • यशया धडा 51  
  • यशया धडा 52  
  • यशया धडा 53  
  • यशया धडा 54  
  • यशया धडा 55  
  • यशया धडा 56  
  • यशया धडा 57  
  • यशया धडा 58  
  • यशया धडा 59  
  • यशया धडा 60  
  • यशया धडा 61  
  • यशया धडा 62  
  • यशया धडा 63  
  • यशया धडा 64  
  • यशया धडा 65  
  • यशया धडा 66  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References