मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
मत्तय

मत्तय धडा 16

चिन्हासाठी विनंती व त्यास येशूचा नकार
मार्क 8:11-13; लूक 12:54-56

1 परूशी आणि सदूकी लोकांस येशूची परीक्षा पाहायची होती म्हणून ते येशूकडे आले व आम्हास आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली. 2 परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आकाश तांबूस आहे, 3 आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हास आकाशाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत काय? 4 दुष्ट व देवाशी अप्रामाणिक असणारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला. असमंजसपणाबद्दल शिष्यांचा निषेध
मार्क 8:14-21

5 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले. 6 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.” 7 तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.” 8 पण येशूने हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपसामध्ये का करता? 9 तुम्हास अजून समजत नाही काय? पाच भाकारींनी पाच हजार लोकांस जेवू घातले ते आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हास आठवत नाही काय? 10 तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हास आठवत नाही काय? 11 मी भाकरी विषयी तुम्हास बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हास कसे समजत नाही?” 12 तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली
मार्क 8:27-30; लूक 9:18-20

13 येशू फिलिप्पाच्या कैसरीया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” 14 आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.” 15 मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” 16 शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.” 17 येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले. 18 आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही. 19 मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” 20 तेव्हा त्याने शिष्यांना मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका असे निक्षून सांगितले. स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य
मार्क 8:31-33; लूक 9:21, 22

21 तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरूशलेम शहराला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे. 22 तेव्हा पेत्राने त्यास एकाबाजूला घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभू, तुझ्यापासून हे दूर असो. असे तुला कधीही होणारच नाही!” 23 परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून चालता हो, तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.” आत्मत्यागाचे आमंत्रण
मार्क 8:34-38; लूक 9:23-26

24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. 25 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवील. 26 जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल? 27 कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल. 28 मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यातले काहीजण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
चिन्हासाठी विनंती व त्यास येशूचा नकार
मार्क 8:11-13; लूक 12:54-56

1 परूशी आणि सदूकी लोकांस येशूची परीक्षा पाहायची होती म्हणून ते येशूकडे आले व आम्हास आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली. .::. 2 परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आकाश तांबूस आहे, .::. 3 आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हास आकाशाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत काय? .::. 4 दुष्ट व देवाशी अप्रामाणिक असणारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला. .::. असमंजसपणाबद्दल शिष्यांचा निषेध
मार्क 8:14-21

5 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले. .::. 6 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.” .::. 7 तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.” .::. 8 पण येशूने हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपसामध्ये का करता? .::. 9 तुम्हास अजून समजत नाही काय? पाच भाकारींनी पाच हजार लोकांस जेवू घातले ते आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हास आठवत नाही काय? .::. 10 तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हास आठवत नाही काय? .::. 11 मी भाकरी विषयी तुम्हास बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हास कसे समजत नाही?” .::. 12 तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते. .::. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली
मार्क 8:27-30; लूक 9:18-20

13 येशू फिलिप्पाच्या कैसरीया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” .::. 14 आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.” .::. 15 मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” .::. 16 शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.” .::. 17 येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले. .::. 18 आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही. .::. 19 मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” .::. 20 तेव्हा त्याने शिष्यांना मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका असे निक्षून सांगितले. .::. स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य
मार्क 8:31-33; लूक 9:21, 22

21 तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरूशलेम शहराला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे. .::. 22 तेव्हा पेत्राने त्यास एकाबाजूला घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभू, तुझ्यापासून हे दूर असो. असे तुला कधीही होणारच नाही!” .::. 23 परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून चालता हो, तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.” .::. आत्मत्यागाचे आमंत्रण
मार्क 8:34-38; लूक 9:23-26

24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. .::. 25 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवील. .::. 26 जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल? .::. 27 कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल. .::. 28 मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यातले काहीजण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
  • मत्तय धडा 1  
  • मत्तय धडा 2  
  • मत्तय धडा 3  
  • मत्तय धडा 4  
  • मत्तय धडा 5  
  • मत्तय धडा 6  
  • मत्तय धडा 7  
  • मत्तय धडा 8  
  • मत्तय धडा 9  
  • मत्तय धडा 10  
  • मत्तय धडा 11  
  • मत्तय धडा 12  
  • मत्तय धडा 13  
  • मत्तय धडा 14  
  • मत्तय धडा 15  
  • मत्तय धडा 16  
  • मत्तय धडा 17  
  • मत्तय धडा 18  
  • मत्तय धडा 19  
  • मत्तय धडा 20  
  • मत्तय धडा 21  
  • मत्तय धडा 22  
  • मत्तय धडा 23  
  • मत्तय धडा 24  
  • मत्तय धडा 25  
  • मत्तय धडा 26  
  • मत्तय धडा 27  
  • मत्तय धडा 28  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References