मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
2 इतिहास

2 इतिहास धडा 32

1 हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करुन आला. नगराच्या तटबंदीबाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करुन ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला. 2 यरुशलेमवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले. 3 तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला. त्यांच्या साहाय्याने व त्यांच्याशी मसलत करुन राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांनी त्याला मदत केली. 4 झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर पाणी कुठले मिळायला?” 5 हिज्कीयाने पुढील उपाययोजनेने यरुशलेमची मजबुती वाढवली. तटबंदीची भिंत जिथे जिथे ढासळली होती तिथे बांधून काढली. भिंतीवर बुरुज बांधले. तटबंदीबाहेर दुसरा कोट केला. यरुशलेमच्या जुन्या भागाची पूर्वेची बाजू आणखी भक्काम केली. शस्त्रे आणि ढाली आणखी करवून घेतल्या. 6 (6-7) हिज्कीयाने प्रजेवर सेनानायकांच्या नेमणुका केल्या, आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली. हिज्कीया त्यांना म्हणाला, “हिंमत बाळगा आणि द्दढ राहा. अश्शूरच्या राजाची किंवा त्याच्या विशाल सेनेची धास्ती घेऊ नका. आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे. 7 8 अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे. आपल्या बाजूला मात्र साक्षात परमेश्वर देव आहे. तोच आपल्याला मदत करील.” आपल्या युध्दात तोच लढेल अशाप्रकारे हिज्कीयाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांना त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरुप आला. 9 अश्शूरचा राजा सन्हेरीब याने लाखीशचा पराभव करण्याच्या हेतूने आपल्या सैन्यासह लाखीश नगराजवळ तळ दिला होता. तेथून त्याने यहूदाचा राजा हिज्कीया आणि यरुशलेममधील यहूदी लोक यांच्यासाठी आपल्या सेवकांमार्फत निरोप पाठवला. 10 सेवक म्हणाले की, “अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा संदेश असा आहे. ‘यरुशलेमला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता? 11 हिज्कीयाचा हा तुम्हाला फसवण्याचा डाव आहे. यरुशलेममध्ये अडकून तुम्ही तहानभुकेने व्याकुळ होऊन मरावे असा त्याचा अंत:स्थ हेतू आहे. तो तुम्हाला म्हणतो, “अश्शूरच्या राजापासून आपला देव परमेश्वर आपले रक्षण करील.” 12 पण त्यानेच परमेश्वराची उंच स्थाने आणि वेद्या काढून टाकल्या. तुम्हा यहूदी आणि यरुशलेमच्या लोकांना त्याने सांगितले की तुम्ही फक्त एकाच वेदीवर उपासना केली पाहिजे आणि धूप जाळला पाहिजे. 13 माझ्या पूर्वजांनी आणि मी इतर देशांतल्या लोकांची कशी अवस्था करुन टाकली ती तुम्हाला माहीत आहे. त्या देशांतले दैवते काही आपल्या लोकांना वाचवू शकले नाहीत. मलाही ते त्यांचा नाश करण्यापासून परावृत्त करु शकले नाहीत. 14 माझ्या पूर्वजांनी इतर देशांना मातीला मिळवले. आपल्या लोकांना विनाशातून सोडवण्याची माझ्यासमोर कोणत्याही देवताची प्राज्ञा नाही. तेव्हा तुमचे दैवत तरी तुम्हाला वाचवू शकेल असे वाटते का? 15 हिज्कीयाच्या बतावणीला बळी पडू नका. आमच्या पासून आपल्या प्रजेचे रक्षण करण्यात कोणत्याच राष्ट्राच्या दैवताला अद्यापि यश आलेले नाही. तेव्हा तुमचा संहार करण्याला तुमचे दैवत माझ्या हातून तुम्हांला वाचवू शकेल असे समजू नका.”‘ 16 अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिज्कीया याची निंदानालस्ती केली. 17 अश्शूरच्या राजाने पत्रांमध्ये परमेश्वर देवा विषयी अपमानकारक मजकूरही लिहिला. तो असा होता. “इतर देशांच्या दैवतांना मी केलेल्या संहारापासून आपल्या प्रजेला वाचवता आले नाही. तद्वतच हिज्कीयाचा देवही मला त्याच्या प्रजेचा नाश करण्यापासून थोपवू शकणार नाही.” 18 मग अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी तटबंदीवर उभ्या असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवण्यासाठी हिब्रू भाषेत मोठ्याने आरडाओरडा केला. असे करुन यरुशलेम नगर ताब्यात घ्यायचा त्यांचा विचार होता. 19 जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईटसाईट बोलत राहिले. हे परमेश्वर म्हणजे लोकांनी निव्वळ हातांनी बनवलेल्या मूर्तीं यरुशलेमच्या परमेश्वरालाही या सेवकांनी त्या देवतांच्याच रांगेला बसवले. 20 यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा मुलगा यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करुन मोठ्याने प्रार्थना केली. 21 तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या मुलांनी तलवारीने त्याला ठार केले. 22 अशाप्रकारे परमेश्वराने अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याचे सैन्य यांच्यापासून हिज्कीया आणि यरुशलेमचे लोक यांचे संरक्षण केले. परमेश्वराला हिज्कीयाची आणि यरुशलेमच्या प्रजेची काळजी होती. 23 बऱ्याच जणांनी परमेश्वराला वाहायला भेटवस्तू आणल्या. यहूदाचा राजा हिज्कीया याच्यासाठी ही नजराणे आणले. या घटनेपासून सर्व राष्ट्रांना हिज्कीयाबद्दल आदर वाटू लागला. 24 या काळातच हिज्कीयाला आजारपणाने घेरले आणि तो मरणासन्न झाला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि परमेश्वराने त्याला एक संकेत दिला4 25 पण हिज्कीयाला गर्व वाटू लागला होता. त्यामुळे त्याने परमेश्वराने दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल त्याला धन्यवाद दिले नाहीत. या गोष्टीमुळे हिज्कीयावर आणि यहूदा व यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला. 26 पण हे लोक आणि हिज्कीया यांचे ह्दयपरिवर्तन झाले आणि त्यांची वर्तणूक बदलली. त्यांच्यात नम्रता आली. त्यामुळे हिज्कीयाच्या हयातीत परमेश्वराचा रोष त्यांच्यावर ओढवला नाही. 27 हिज्कीयाची भरभराट झाली. त्याला मानसन्मान मिळाला. चांदी, सोने, किंमती रत्ने, मसाल्याचे पदार्थ, ढाली इत्यादी नाना तऱ्हेच्या वस्तू ठेवण्यासाठी त्याने कोठारे केली. 28 धान्य, नवीन मद्य, तेल या लोकांकडून आलेल्या गोष्टी ठेवायलाही कोठारे बांधली, गुरेढोरे आणि मेंढ्या यांच्यासाठी कोंडवाडे बांधले. 29 हिज्कीयाने नवीन नगरे वसवली. सर्व तऱ्हेचे पशू आणि मेंढरे यांचे कळप त्याच्याकडे होते. देवदयेने हिज्कीयाला समृध्दी आली. 30 याच हिच्कीयाने गीहोनचा यरुशलेममधला वरचा प्रवाह अडवून त्याला दावीद नगराच्या पश्चिमेकडून सरळ खाली आणले होते. हिज्कीयाला त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळाले. 31 एकदा देशात घडलेल्या चमत्कारांविषयी चौकशी करायला बाबेलच्या अधिपतींनी त्याच्याकडे राजदूत पाठवले. तेव्हा हिज्कीयाची पारख करावी आणि त्याचे मन जाणून घ्यावे म्हणून देवाने त्याला एकटे सोडले. 32 हिज्कीयाने केलेल्या इतर गोष्टी आणि त्याचा लोकांविषयीचा दयाळूपणा, त्याची धार्मिक कृत्ये, त्याची परमेश्वरा प्रती एकनिष्ठा याविषयी ‘आमोजचा मुलगा यशया संदेष्टा याचे दृष्टांत आणि ‘यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास’ या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे. 33 हिज्कीया मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. दावीदाच्या वंशजांच्या कबरीपाशी डोंगरावर लोकांनी त्याचे दफन केले. हिज्कीया मरण पावला तेव्हा यहूदा आणि यरुशलेममधील लोकांनी त्याला सन्मानपूर्वक निरोप दिला. हिज्कीयाच्या जागी त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.
1. हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करुन आला. नगराच्या तटबंदीबाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करुन ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला. 2. यरुशलेमवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले. 3. तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला. त्यांच्या साहाय्याने व त्यांच्याशी मसलत करुन राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांनी त्याला मदत केली. 4. झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर पाणी कुठले मिळायला?” 5. हिज्कीयाने पुढील उपाययोजनेने यरुशलेमची मजबुती वाढवली. तटबंदीची भिंत जिथे जिथे ढासळली होती तिथे बांधून काढली. भिंतीवर बुरुज बांधले. तटबंदीबाहेर दुसरा कोट केला. यरुशलेमच्या जुन्या भागाची पूर्वेची बाजू आणखी भक्काम केली. शस्त्रे आणि ढाली आणखी करवून घेतल्या. 6. (6-7) हिज्कीयाने प्रजेवर सेनानायकांच्या नेमणुका केल्या, आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली. हिज्कीया त्यांना म्हणाला, “हिंमत बाळगा आणि द्दढ राहा. अश्शूरच्या राजाची किंवा त्याच्या विशाल सेनेची धास्ती घेऊ नका. आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे. 7. 8. अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे. आपल्या बाजूला मात्र साक्षात परमेश्वर देव आहे. तोच आपल्याला मदत करील.” आपल्या युध्दात तोच लढेल अशाप्रकारे हिज्कीयाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांना त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरुप आला. 9. अश्शूरचा राजा सन्हेरीब याने लाखीशचा पराभव करण्याच्या हेतूने आपल्या सैन्यासह लाखीश नगराजवळ तळ दिला होता. तेथून त्याने यहूदाचा राजा हिज्कीया आणि यरुशलेममधील यहूदी लोक यांच्यासाठी आपल्या सेवकांमार्फत निरोप पाठवला. 10. सेवक म्हणाले की, “अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा संदेश असा आहे. ‘यरुशलेमला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता? 11. हिज्कीयाचा हा तुम्हाला फसवण्याचा डाव आहे. यरुशलेममध्ये अडकून तुम्ही तहानभुकेने व्याकुळ होऊन मरावे असा त्याचा अंत:स्थ हेतू आहे. तो तुम्हाला म्हणतो, “अश्शूरच्या राजापासून आपला देव परमेश्वर आपले रक्षण करील.” 12. पण त्यानेच परमेश्वराची उंच स्थाने आणि वेद्या काढून टाकल्या. तुम्हा यहूदी आणि यरुशलेमच्या लोकांना त्याने सांगितले की तुम्ही फक्त एकाच वेदीवर उपासना केली पाहिजे आणि धूप जाळला पाहिजे. 13. माझ्या पूर्वजांनी आणि मी इतर देशांतल्या लोकांची कशी अवस्था करुन टाकली ती तुम्हाला माहीत आहे. त्या देशांतले दैवते काही आपल्या लोकांना वाचवू शकले नाहीत. मलाही ते त्यांचा नाश करण्यापासून परावृत्त करु शकले नाहीत. 14. माझ्या पूर्वजांनी इतर देशांना मातीला मिळवले. आपल्या लोकांना विनाशातून सोडवण्याची माझ्यासमोर कोणत्याही देवताची प्राज्ञा नाही. तेव्हा तुमचे दैवत तरी तुम्हाला वाचवू शकेल असे वाटते का? 15. हिज्कीयाच्या बतावणीला बळी पडू नका. आमच्या पासून आपल्या प्रजेचे रक्षण करण्यात कोणत्याच राष्ट्राच्या दैवताला अद्यापि यश आलेले नाही. तेव्हा तुमचा संहार करण्याला तुमचे दैवत माझ्या हातून तुम्हांला वाचवू शकेल असे समजू नका.”‘ 16. अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिज्कीया याची निंदानालस्ती केली. 17. अश्शूरच्या राजाने पत्रांमध्ये परमेश्वर देवा विषयी अपमानकारक मजकूरही लिहिला. तो असा होता. “इतर देशांच्या दैवतांना मी केलेल्या संहारापासून आपल्या प्रजेला वाचवता आले नाही. तद्वतच हिज्कीयाचा देवही मला त्याच्या प्रजेचा नाश करण्यापासून थोपवू शकणार नाही.” 18. मग अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी तटबंदीवर उभ्या असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवण्यासाठी हिब्रू भाषेत मोठ्याने आरडाओरडा केला. असे करुन यरुशलेम नगर ताब्यात घ्यायचा त्यांचा विचार होता. 19. जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईटसाईट बोलत राहिले. हे परमेश्वर म्हणजे लोकांनी निव्वळ हातांनी बनवलेल्या मूर्तीं यरुशलेमच्या परमेश्वरालाही या सेवकांनी त्या देवतांच्याच रांगेला बसवले. 20. यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा मुलगा यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करुन मोठ्याने प्रार्थना केली. 21. तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या मुलांनी तलवारीने त्याला ठार केले. 22. अशाप्रकारे परमेश्वराने अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याचे सैन्य यांच्यापासून हिज्कीया आणि यरुशलेमचे लोक यांचे संरक्षण केले. परमेश्वराला हिज्कीयाची आणि यरुशलेमच्या प्रजेची काळजी होती. 23. बऱ्याच जणांनी परमेश्वराला वाहायला भेटवस्तू आणल्या. यहूदाचा राजा हिज्कीया याच्यासाठी ही नजराणे आणले. या घटनेपासून सर्व राष्ट्रांना हिज्कीयाबद्दल आदर वाटू लागला. 24. या काळातच हिज्कीयाला आजारपणाने घेरले आणि तो मरणासन्न झाला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि परमेश्वराने त्याला एक संकेत दिला4 25. पण हिज्कीयाला गर्व वाटू लागला होता. त्यामुळे त्याने परमेश्वराने दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल त्याला धन्यवाद दिले नाहीत. या गोष्टीमुळे हिज्कीयावर आणि यहूदा व यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला. 26. पण हे लोक आणि हिज्कीया यांचे ह्दयपरिवर्तन झाले आणि त्यांची वर्तणूक बदलली. त्यांच्यात नम्रता आली. त्यामुळे हिज्कीयाच्या हयातीत परमेश्वराचा रोष त्यांच्यावर ओढवला नाही. 27. हिज्कीयाची भरभराट झाली. त्याला मानसन्मान मिळाला. चांदी, सोने, किंमती रत्ने, मसाल्याचे पदार्थ, ढाली इत्यादी नाना तऱ्हेच्या वस्तू ठेवण्यासाठी त्याने कोठारे केली. 28. धान्य, नवीन मद्य, तेल या लोकांकडून आलेल्या गोष्टी ठेवायलाही कोठारे बांधली, गुरेढोरे आणि मेंढ्या यांच्यासाठी कोंडवाडे बांधले. 29. हिज्कीयाने नवीन नगरे वसवली. सर्व तऱ्हेचे पशू आणि मेंढरे यांचे कळप त्याच्याकडे होते. देवदयेने हिज्कीयाला समृध्दी आली. 30. याच हिच्कीयाने गीहोनचा यरुशलेममधला वरचा प्रवाह अडवून त्याला दावीद नगराच्या पश्चिमेकडून सरळ खाली आणले होते. हिज्कीयाला त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळाले. 31. एकदा देशात घडलेल्या चमत्कारांविषयी चौकशी करायला बाबेलच्या अधिपतींनी त्याच्याकडे राजदूत पाठवले. तेव्हा हिज्कीयाची पारख करावी आणि त्याचे मन जाणून घ्यावे म्हणून देवाने त्याला एकटे सोडले. 32. हिज्कीयाने केलेल्या इतर गोष्टी आणि त्याचा लोकांविषयीचा दयाळूपणा, त्याची धार्मिक कृत्ये, त्याची परमेश्वरा प्रती एकनिष्ठा याविषयी ‘आमोजचा मुलगा यशया संदेष्टा याचे दृष्टांत आणि ‘यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास’ या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे. 33. हिज्कीया मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. दावीदाच्या वंशजांच्या कबरीपाशी डोंगरावर लोकांनी त्याचे दफन केले. हिज्कीया मरण पावला तेव्हा यहूदा आणि यरुशलेममधील लोकांनी त्याला सन्मानपूर्वक निरोप दिला. हिज्कीयाच्या जागी त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.
  • 2 इतिहास धडा 1  
  • 2 इतिहास धडा 2  
  • 2 इतिहास धडा 3  
  • 2 इतिहास धडा 4  
  • 2 इतिहास धडा 5  
  • 2 इतिहास धडा 6  
  • 2 इतिहास धडा 7  
  • 2 इतिहास धडा 8  
  • 2 इतिहास धडा 9  
  • 2 इतिहास धडा 10  
  • 2 इतिहास धडा 11  
  • 2 इतिहास धडा 12  
  • 2 इतिहास धडा 13  
  • 2 इतिहास धडा 14  
  • 2 इतिहास धडा 15  
  • 2 इतिहास धडा 16  
  • 2 इतिहास धडा 17  
  • 2 इतिहास धडा 18  
  • 2 इतिहास धडा 19  
  • 2 इतिहास धडा 20  
  • 2 इतिहास धडा 21  
  • 2 इतिहास धडा 22  
  • 2 इतिहास धडा 23  
  • 2 इतिहास धडा 24  
  • 2 इतिहास धडा 25  
  • 2 इतिहास धडा 26  
  • 2 इतिहास धडा 27  
  • 2 इतिहास धडा 28  
  • 2 इतिहास धडा 29  
  • 2 इतिहास धडा 30  
  • 2 इतिहास धडा 31  
  • 2 इतिहास धडा 32  
  • 2 इतिहास धडा 33  
  • 2 इतिहास धडा 34  
  • 2 इतिहास धडा 35  
  • 2 इतिहास धडा 36  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References