मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
उत्पत्ति

उत्पत्ति धडा 28

1 नंतर इसहाकाने याकोबाला बोलावून त्याला आशीर्वाद दिला नंतर त्याने त्याला बजावून आज्ञा दिली; तो म्हणाला, “तू कनानी मुलीपैकी कोणत्याच मुलीशी लग्न करता कामा नये; 2 तेव्हा तू आता येथून नीघ, व पदल अरामात बथुवेल तुझ्या आईचे वडील बथुवेल याच्या कडे जा. तुझ्या आईचा भाऊ लाबान तेथे राहातो आणि त्याच्या मुलीपैकीच एकीशी लग्न कर. 3 मी सर्वसमर्थ देवयाची प्रार्थना करतो की त्याने तुला आशीर्वादित करावे; आणि तुला खूप मुले द्यावीत तू महान राष्ट्राचा पिता व्हावे अशी प्रार्थना करतो. 4 तसेच परमेश्वराने अब्राहामाला व त्याच्या संततीला जसा आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद त्याने तुला व तुझ्या संततीलाही द्यावा अशी मी प्रार्थना करतो; आणि मी आणखी अशी ही प्रार्थना करतो की जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहातोस त्या देशाचा त्याने तुला मालक करावे.” 5 अशी रीतीने इसहाकाने याकोबाला पदन अराम येथे पाठवले; तेव्हा याकोब पदन अराम येथील अरामी बथूवेलाचा मुलगा व आपली आई रिबका हिचा भाऊ, लाबान याच्याकडे गेला. 6 एसावाला कळले की आपला बाप इसहाक याने याकोबला आपला आशीर्वाद दिला, व याकोबाने कोणत्याच कनानी स्त्रिशी लग्न करु नये अशी आज्ञा दिली, तसेच बायको शोधण्यासठी त्याने याकोबाला पदन अराम येथे पाठवून दिले; 7 आणि याकोबही आपल्या आईबापाची आज्ञा मानून पदन अरामास गेला ह्या ही गोष्टी एसावास कळाल्या; 8 या सर्व गोष्टींवरुन आपल्या बापाला आपल्या मुलांनी कोणत्याच कनानी मुलीशी लग्न करु नये असे वाटते हे एसावाला उमगले 9 एसावाला अगोदरच दोन कनानी बायका होत्या, म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आणखी एका स्त्रीशी म्हणजे इश्माएलाची मुलगी महलथ हिच्याशी लग्न केले, इश्माएल अब्राहामाचा मुलगा होता आणि महलथ नबायोथाची बहीण. 10 याकोबाने बैर - शेबा सोडले व तो हारानाला गेला; 11 प्रवास करताना सूर्य मावळला म्हणून त्याने एके जागी रात्रीं मुक्काम केला; तेथे रात्रीं झोंपताना त्याला एक धोंडा दिसला तो उशास घेऊन तो रात्रीं तेथेच झोंपला; 12 तेव्हा त्याला एक स्वप्न पडले; स्वप्नात एक उंच शिडी आहे, तिचे एक टोक जमिनीवर व दुसरे टोक वर स्वर्गापर्यंत पाहोचलेले आहे असे त्याने पाहिले; 13 याकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत व उतरत आहेत. शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले; परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आजोबा अब्राहाम व तुझे वडील इसहाक यांचा मी परमेश्वर व देव आहे; तू ज्या भूमिवर झोंपला आहेस ती भूमि म्हणजे तो देश मी तुला व तुझ्या वंशजांना देईन 14 तसेच मी तुला भरपूर वंशज देईन; तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके अगणित होतील; ते उत्तर व दक्षिण, पूर्व व पश्चिम या दिशांकडील देशात पसरतील; तुझ्यामुळे व तुझ्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. 15 “मी सतत तुझ्याबरोबर आहे आणि तू ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणी तुला या देशात परत आणीन; मी हे माझे वचन पूर्ण करीपर्यंत तुला अंतर देणार नाही.” 16 मग याकोब झोपेतून जागा झाला व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे हे मला समजले आहे; परंतु झोंपून उठेपर्यंत ते मला कळले नाही.” 17 याकोबाला भीती वाटली, तो म्हणाला, “हे फार महान ठिकाण आहे, हे देवाचे निवासस्थान, त्याचे घर व स्वर्गाचे दार आहे.” 18 याकोब पहाटे लवकर उठला; त्याने उशास घेतलेला धोंडा एका टोकावर उभा करुन जमिनीत रोवला; मग त्याने त्यावर तेल ओतले. अशा प्रकारे त्याने त्या धोंड्याचे देवाचे स्मारक केले. 19 त्या ठिकाणाचे नाव लूज होते परंतु याकोबाने त्याचे नाव बेथेल ठेवले. 20 मग याकोबाने शपथ वाहून नवस केला; तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील; आणि जेथे जेथे मी जाईन तेथे तो माझे रक्षण करील; आणि जर तो मला खावावयास अन्न व ल्यावयास वस्त्र पुरवील; 21 आणि जर मी शांतीने माझ्या बापाच्या घरी परत येईन जर देव या सर्वगोष्टी करील तर मग तो माझा परमेश्वर होईल; 22 मी हा धोंडा या ठिकाणी स्मारकस्तंभ म्हणून उभा करुन ठेवतो, त्यावरुन परमेवराकरिता हे पवित्र ठिकाण आहे असे दिसेल आणि देवाने मला दिलेल्या सर्वाचा दशांश म्हणजे दहावा भाग मी देवाला अर्पण करीन.”
1. नंतर इसहाकाने याकोबाला बोलावून त्याला आशीर्वाद दिला नंतर त्याने त्याला बजावून आज्ञा दिली; तो म्हणाला, “तू कनानी मुलीपैकी कोणत्याच मुलीशी लग्न करता कामा नये; 2. तेव्हा तू आता येथून नीघ, व पदल अरामात बथुवेल तुझ्या आईचे वडील बथुवेल याच्या कडे जा. तुझ्या आईचा भाऊ लाबान तेथे राहातो आणि त्याच्या मुलीपैकीच एकीशी लग्न कर. 3. मी सर्वसमर्थ देवयाची प्रार्थना करतो की त्याने तुला आशीर्वादित करावे; आणि तुला खूप मुले द्यावीत तू महान राष्ट्राचा पिता व्हावे अशी प्रार्थना करतो. 4. तसेच परमेश्वराने अब्राहामाला व त्याच्या संततीला जसा आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद त्याने तुला व तुझ्या संततीलाही द्यावा अशी मी प्रार्थना करतो; आणि मी आणखी अशी ही प्रार्थना करतो की जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहातोस त्या देशाचा त्याने तुला मालक करावे.” 5. अशी रीतीने इसहाकाने याकोबाला पदन अराम येथे पाठवले; तेव्हा याकोब पदन अराम येथील अरामी बथूवेलाचा मुलगा व आपली आई रिबका हिचा भाऊ, लाबान याच्याकडे गेला. 6. एसावाला कळले की आपला बाप इसहाक याने याकोबला आपला आशीर्वाद दिला, व याकोबाने कोणत्याच कनानी स्त्रिशी लग्न करु नये अशी आज्ञा दिली, तसेच बायको शोधण्यासठी त्याने याकोबाला पदन अराम येथे पाठवून दिले; 7. आणि याकोबही आपल्या आईबापाची आज्ञा मानून पदन अरामास गेला ह्या ही गोष्टी एसावास कळाल्या; 8. या सर्व गोष्टींवरुन आपल्या बापाला आपल्या मुलांनी कोणत्याच कनानी मुलीशी लग्न करु नये असे वाटते हे एसावाला उमगले 9. एसावाला अगोदरच दोन कनानी बायका होत्या, म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आणखी एका स्त्रीशी म्हणजे इश्माएलाची मुलगी महलथ हिच्याशी लग्न केले, इश्माएल अब्राहामाचा मुलगा होता आणि महलथ नबायोथाची बहीण. 10. याकोबाने बैर - शेबा सोडले व तो हारानाला गेला; 11. प्रवास करताना सूर्य मावळला म्हणून त्याने एके जागी रात्रीं मुक्काम केला; तेथे रात्रीं झोंपताना त्याला एक धोंडा दिसला तो उशास घेऊन तो रात्रीं तेथेच झोंपला; 12. तेव्हा त्याला एक स्वप्न पडले; स्वप्नात एक उंच शिडी आहे, तिचे एक टोक जमिनीवर व दुसरे टोक वर स्वर्गापर्यंत पाहोचलेले आहे असे त्याने पाहिले; 13. याकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत व उतरत आहेत. शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले; परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आजोबा अब्राहाम व तुझे वडील इसहाक यांचा मी परमेश्वर व देव आहे; तू ज्या भूमिवर झोंपला आहेस ती भूमि म्हणजे तो देश मी तुला व तुझ्या वंशजांना देईन 14. तसेच मी तुला भरपूर वंशज देईन; तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके अगणित होतील; ते उत्तर व दक्षिण, पूर्व व पश्चिम या दिशांकडील देशात पसरतील; तुझ्यामुळे व तुझ्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. 15. “मी सतत तुझ्याबरोबर आहे आणि तू ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणी तुला या देशात परत आणीन; मी हे माझे वचन पूर्ण करीपर्यंत तुला अंतर देणार नाही.” 16. मग याकोब झोपेतून जागा झाला व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे हे मला समजले आहे; परंतु झोंपून उठेपर्यंत ते मला कळले नाही.” 17. याकोबाला भीती वाटली, तो म्हणाला, “हे फार महान ठिकाण आहे, हे देवाचे निवासस्थान, त्याचे घर व स्वर्गाचे दार आहे.” 18. याकोब पहाटे लवकर उठला; त्याने उशास घेतलेला धोंडा एका टोकावर उभा करुन जमिनीत रोवला; मग त्याने त्यावर तेल ओतले. अशा प्रकारे त्याने त्या धोंड्याचे देवाचे स्मारक केले. 19. त्या ठिकाणाचे नाव लूज होते परंतु याकोबाने त्याचे नाव बेथेल ठेवले. 20. मग याकोबाने शपथ वाहून नवस केला; तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील; आणि जेथे जेथे मी जाईन तेथे तो माझे रक्षण करील; आणि जर तो मला खावावयास अन्न व ल्यावयास वस्त्र पुरवील; 21. आणि जर मी शांतीने माझ्या बापाच्या घरी परत येईन जर देव या सर्वगोष्टी करील तर मग तो माझा परमेश्वर होईल; 22. मी हा धोंडा या ठिकाणी स्मारकस्तंभ म्हणून उभा करुन ठेवतो, त्यावरुन परमेवराकरिता हे पवित्र ठिकाण आहे असे दिसेल आणि देवाने मला दिलेल्या सर्वाचा दशांश म्हणजे दहावा भाग मी देवाला अर्पण करीन.”
  • उत्पत्ति धडा 1  
  • उत्पत्ति धडा 2  
  • उत्पत्ति धडा 3  
  • उत्पत्ति धडा 4  
  • उत्पत्ति धडा 5  
  • उत्पत्ति धडा 6  
  • उत्पत्ति धडा 7  
  • उत्पत्ति धडा 8  
  • उत्पत्ति धडा 9  
  • उत्पत्ति धडा 10  
  • उत्पत्ति धडा 11  
  • उत्पत्ति धडा 12  
  • उत्पत्ति धडा 13  
  • उत्पत्ति धडा 14  
  • उत्पत्ति धडा 15  
  • उत्पत्ति धडा 16  
  • उत्पत्ति धडा 17  
  • उत्पत्ति धडा 18  
  • उत्पत्ति धडा 19  
  • उत्पत्ति धडा 20  
  • उत्पत्ति धडा 21  
  • उत्पत्ति धडा 22  
  • उत्पत्ति धडा 23  
  • उत्पत्ति धडा 24  
  • उत्पत्ति धडा 25  
  • उत्पत्ति धडा 26  
  • उत्पत्ति धडा 27  
  • उत्पत्ति धडा 28  
  • उत्पत्ति धडा 29  
  • उत्पत्ति धडा 30  
  • उत्पत्ति धडा 31  
  • उत्पत्ति धडा 32  
  • उत्पत्ति धडा 33  
  • उत्पत्ति धडा 34  
  • उत्पत्ति धडा 35  
  • उत्पत्ति धडा 36  
  • उत्पत्ति धडा 37  
  • उत्पत्ति धडा 38  
  • उत्पत्ति धडा 39  
  • उत्पत्ति धडा 40  
  • उत्पत्ति धडा 41  
  • उत्पत्ति धडा 42  
  • उत्पत्ति धडा 43  
  • उत्पत्ति धडा 44  
  • उत्पत्ति धडा 45  
  • उत्पत्ति धडा 46  
  • उत्पत्ति धडा 47  
  • उत्पत्ति धडा 48  
  • उत्पत्ति धडा 49  
  • उत्पत्ति धडा 50  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References