मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1 योहान

1 योहान धडा 1

1 जगाच्या सुरुवातीपासून हे होत. हे आम्ही ऐकले आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. आम्ही ते निरखूनपाहिले आहे. आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे. जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत. 2 ते जीवनआम्हास प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि त्या अनंतकाळच्या जीवनाविषयीआम्ही तुम्हांला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याबरोबर होते आणि ते आम्हाला प्रकटविण्यात आले. 3 आम्ही ते पाहिले आहे व ऐकले आहे आणि आम्ही आता ते तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीहीआमच्यासह सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. 4 म्हणूनआम्ही तुम्हांला या गोष्टींविषयी लिहीत आहोत. यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा. 5 आणि हा संदेश आहे जो आम्ही येशू ख्रिस्ताकडून ऐकला आहे आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करीत आहोत. देव प्रकाशआहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही. 6 जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही राहतो तर आम्ही खोटेबोलत आहोत व आम्ही सत्याला अनुसरत नाही. 7 पण जर आम्ही प्रकाशात चालतो, जसा देव प्रकाशात आहे तर आमचीविश्वासणारे या नात्याने एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्धकरते. 8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वत:ला फसवीत आहोत. आणिआमच्यामध्ये सत्य नाही. 9 जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देवविश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो. 10 जर आम्ही म्हणतो की आम्ही पापकेले नाही तर आम्ही देवाला लबाड ठरवितो. आणि त्याचा संदेश आमच्या अंत:करणात नाही.
1 जगाच्या सुरुवातीपासून हे होत. हे आम्ही ऐकले आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. आम्ही ते निरखूनपाहिले आहे. आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे. जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत. .::. 2 ते जीवनआम्हास प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि त्या अनंतकाळच्या जीवनाविषयीआम्ही तुम्हांला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याबरोबर होते आणि ते आम्हाला प्रकटविण्यात आले. .::. 3 आम्ही ते पाहिले आहे व ऐकले आहे आणि आम्ही आता ते तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीहीआमच्यासह सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. .::. 4 म्हणूनआम्ही तुम्हांला या गोष्टींविषयी लिहीत आहोत. यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा. .::. 5 आणि हा संदेश आहे जो आम्ही येशू ख्रिस्ताकडून ऐकला आहे आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करीत आहोत. देव प्रकाशआहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही. .::. 6 जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही राहतो तर आम्ही खोटेबोलत आहोत व आम्ही सत्याला अनुसरत नाही. .::. 7 पण जर आम्ही प्रकाशात चालतो, जसा देव प्रकाशात आहे तर आमचीविश्वासणारे या नात्याने एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्धकरते. .::. 8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वत:ला फसवीत आहोत. आणिआमच्यामध्ये सत्य नाही. .::. 9 जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देवविश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो. .::. 10 जर आम्ही म्हणतो की आम्ही पापकेले नाही तर आम्ही देवाला लबाड ठरवितो. आणि त्याचा संदेश आमच्या अंत:करणात नाही.
  • 1 योहान धडा 1  
  • 1 योहान धडा 2  
  • 1 योहान धडा 3  
  • 1 योहान धडा 4  
  • 1 योहान धडा 5  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References