मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
आमोस

आमोस धडा 6

1 सयोनमधील काहींचे जीवन आरामदायी आहे. शोमरोनच्या पर्वतावरील काही लोकांना नर्धास्त वाटते. पण तुमच्यावर खूप संकटे येतील. जगातील उत्तम नगरीतील तुम्ही “महत्वाचे लोक” आहात इस्राएलचे (लोक) मदत मागण्यासाठी तुमच्याकडे येतात. 2 कालनेला जाऊन पाहा. तेथून महानगरी ‘हमाथला जा. पलिष्ट्यांची नगरी गथला जा. तुम्ही ह्या राज्यांपेक्षा चांगले आहात का? नाही. त्याचे देश तुमच्या देशापेक्षा मोठे आहेत. 3 तुम्ही लोक करीत असलेल्या कृत्यांमुळे शिक्षेचा दिवस जवळ जवळ येत आहे. तुम्ही त्या हिंसाचाराच्या नियमाला जवळ जवळ आणता. 4 पण तुम्ही सर्व सुखसोयी उपभोगता. तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि गाद्या-गिर्द्यावर पसरता. तुम्ही कळपातील कोवळी कोकरे व गोठ्यातील वासरे खाता. 5 तुम्ही वीणा वाजविता. आणि दाविदाप्रमाणे वाद्यांवर सराव करता. 6 तुम्ही दिमाखदार प्यालांतून मद्य पिता. तुम्ही चांगली अत्तरे वापरता. पण योसेफच्या वंशाचा नाश होत आहे, ह्याचा तुम्हाला खेदही वाटत नाही.” 7 ते लोक त्यांच्या गाद्या-गिर्द्यावर पसरले आहेत पण त्यांचा चांगला काळ संपेल कैद्यांप्रमाणे त्यांना परकीय देशांत नेले जाईल ते अशारीतीने नेले जाणाऱ्यांतील पहिले असतील. 8 परमेश्वराने, माझ्या प्रभूने, स्वत:ची शपथ घेतली. सर्वशक्तिमान परमेश्वर देवाने अशी शपथ घेतली, “याकोबला ज्या गोष्टींचा अभिमान वाटतो, त्या गोष्टींचा मला तिटकारा करतो. त्याच्या जबूत मनोऱ्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी शत्रूला ती नगरी व त्यातील सर्व काही घेऊ देईन.” 9 त्या वेळी, कदाचित् काही घरांत दहा लोक जिवंत राहतील आणि ते सुध्दा मरतील. 10 प्रेत घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी लपले असेल तर त्याला लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी एखादे प्रेत आहे का?” तो माणूस म्हणेल, “नाही......” मग त्या माणसाचा नातेवाईक म्हणेल, “शू! आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नसतो.” 11 पाहा! परमेश्वर देव आज्ञा देईल, मग मोठ्या घरांचे तुकडे तुकडे होतील. व लहान घरांचे लहान लहान तुकडे होतील. 12 घोडे खडकावरून धावतात का? नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का? नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता. तुम्ही चांगुलपणा व न्याय यांचे वीष केले. 13 तुम्ही लो-देबारमध्ये सुखी आहात. तुम्ही म्हणता, “आम्ही आमच्या बळावर कर्नाईम घेतले.” 14 “पण इस्राएल, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन. ते राष्ट्र. तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला अडचणीत आणेल.’ सर्वशक्तिमान परमेश्वर देव हे सर्व बोलला.
1 सयोनमधील काहींचे जीवन आरामदायी आहे. शोमरोनच्या पर्वतावरील काही लोकांना नर्धास्त वाटते. पण तुमच्यावर खूप संकटे येतील. जगातील उत्तम नगरीतील तुम्ही “महत्वाचे लोक” आहात इस्राएलचे (लोक) मदत मागण्यासाठी तुमच्याकडे येतात. .::. 2 कालनेला जाऊन पाहा. तेथून महानगरी ‘हमाथला जा. पलिष्ट्यांची नगरी गथला जा. तुम्ही ह्या राज्यांपेक्षा चांगले आहात का? नाही. त्याचे देश तुमच्या देशापेक्षा मोठे आहेत. .::. 3 तुम्ही लोक करीत असलेल्या कृत्यांमुळे शिक्षेचा दिवस जवळ जवळ येत आहे. तुम्ही त्या हिंसाचाराच्या नियमाला जवळ जवळ आणता. .::. 4 पण तुम्ही सर्व सुखसोयी उपभोगता. तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि गाद्या-गिर्द्यावर पसरता. तुम्ही कळपातील कोवळी कोकरे व गोठ्यातील वासरे खाता. .::. 5 तुम्ही वीणा वाजविता. आणि दाविदाप्रमाणे वाद्यांवर सराव करता. .::. 6 तुम्ही दिमाखदार प्यालांतून मद्य पिता. तुम्ही चांगली अत्तरे वापरता. पण योसेफच्या वंशाचा नाश होत आहे, ह्याचा तुम्हाला खेदही वाटत नाही.” .::. 7 ते लोक त्यांच्या गाद्या-गिर्द्यावर पसरले आहेत पण त्यांचा चांगला काळ संपेल कैद्यांप्रमाणे त्यांना परकीय देशांत नेले जाईल ते अशारीतीने नेले जाणाऱ्यांतील पहिले असतील. .::. 8 परमेश्वराने, माझ्या प्रभूने, स्वत:ची शपथ घेतली. सर्वशक्तिमान परमेश्वर देवाने अशी शपथ घेतली, “याकोबला ज्या गोष्टींचा अभिमान वाटतो, त्या गोष्टींचा मला तिटकारा करतो. त्याच्या जबूत मनोऱ्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी शत्रूला ती नगरी व त्यातील सर्व काही घेऊ देईन.” .::. 9 त्या वेळी, कदाचित् काही घरांत दहा लोक जिवंत राहतील आणि ते सुध्दा मरतील. .::. 10 प्रेत घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी लपले असेल तर त्याला लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी एखादे प्रेत आहे का?” तो माणूस म्हणेल, “नाही......” मग त्या माणसाचा नातेवाईक म्हणेल, “शू! आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नसतो.” .::. 11 पाहा! परमेश्वर देव आज्ञा देईल, मग मोठ्या घरांचे तुकडे तुकडे होतील. व लहान घरांचे लहान लहान तुकडे होतील. .::. 12 घोडे खडकावरून धावतात का? नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का? नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता. तुम्ही चांगुलपणा व न्याय यांचे वीष केले. .::. 13 तुम्ही लो-देबारमध्ये सुखी आहात. तुम्ही म्हणता, “आम्ही आमच्या बळावर कर्नाईम घेतले.” .::. 14 “पण इस्राएल, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन. ते राष्ट्र. तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला अडचणीत आणेल.’ सर्वशक्तिमान परमेश्वर देव हे सर्व बोलला.
  • आमोस धडा 1  
  • आमोस धडा 2  
  • आमोस धडा 3  
  • आमोस धडा 4  
  • आमोस धडा 5  
  • आमोस धडा 6  
  • आमोस धडा 7  
  • आमोस धडा 8  
  • आमोस धडा 9  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References