मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यहेज्केल

यहेज्केल धडा 40

1 आमच्या परागंदा होण्याच्या काळातील पंचविसाव्या वर्षाच्या आरंभाला (आंक्टोंबरमध्ये) महिन्याच्या दहाव्या दिवशी परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. चौदा वर्षापूर्वी ह्याच दिवशी खास्द्यांनी यरुशलेम हस्तगत केले होते. दृष्टान्तात परमेश्वराने मला तेथे नेले. 2 दुष्टान्तात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्या पर्वतावर गावासारखे दिसणारे बांधकाम होते. ते दक्षिणेकडे होते. 3 परमेश्वराने मला तेथे आणले. तेथे एक माणूस होता. तो चकाकी दिलेल्या काशाप्राणे होता. त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी व मापदंड होता. तो प्रवेशद्वाराजवळ उभा होता. 4 तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्या डोळ्यांचा व कानांचा उपयोग कर. ह्या गोष्टी पाहा आणि माझे म्हणणे ऐक. मी दाखवीत असलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहा. का? कारण ह्या गोष्टी मी तुला दाखविण्यासाठीच तुला येथे आणले आहे. येथे पाहिलेले सर्व काही तू इस्राएलच्या लोकांना सांगितले पाहिजेस.” 5 मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या माणसाच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात(10 फूट इंच) लांब होती. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली. मग त्या माणसाने भिंतीची उंची मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली. 6 मग तो माणूस पूर्वेच्या दाराजवळ गेला. तो पायऱ्या चढला व त्याने दाराचा उंबरठा मोजला. तो एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुंद होता. दुसरा उंबराही तेवढाच रुंद होता. 7 चौकीदाराची खोली एक पट्टी (10 फूट 6 इंच) लांब व एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुद होती. मंदिरासमोरच्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपाच्या दाराची रुंदी एक पट्टी होती. 8 मग त्या माणसाने द्वारमंडप मोजला. 9 तो 8 हात लांब भरला. मग त्याने दाराच्या दोन्ही बाजूच्या भिंती मोजल्या. प्रत्येक भिंत दोन हात (3 फूट 6 इंच) रुद होती. मंदिराच्या समोरच्या प्रवेशद्वाराच्या शेवटी द्वारमंडप होता. 10 दाराच्या प्रत्येक बाजूला तीन लहान खोल्या होत्या. त्या सारख्या मापाच्या होत्या. दोन्ही बाजूच्या दाराच्या बाजूच्या भिंती सारख्या मापाच्या होत्या. 11 त्या माणसाने दरवाजांची रुंदी भरली. ते 10 हात आणि 13हात लांब होती. 12 प्रत्येक खोलीसमोर एक बुटकी भिंत होती. ती एक हात (1 फूट 6 इंच) उंच आणि 1 हात (1 फूट 6 इंच) जाड होती. खोल्यांची प्रत्येक बाजू 6 हात (10 फूट 6 इंच) लांब होती. 13 माणासने एका खोलीच्या छतापासून दुसऱ्या खोलीच्या छतापर्यंतचे दाराचे मोजमाप केले. प्रत्येक दार दुसऱ्या दाराच्या बरोबर समोर होते. ते एका दारापासून दुसऱ्या दारापर्यंत 25हात (43फूट 9 इंच) भरले. 14 त्या माणसाने बाजूच्या भिंतीचे क्षेत्रफळ काढले. ह्यामध्ये पटांगणातील द्वारमंडपाच्या बाजूच्या भिंतींचाही समावेश होता. एकंदर क्षेत्रफळ साठ हात होते. 15 द्वारमंडप बाहेरच्या बाजूपासून आतल्या बाजूपर्यंत 50 हात (87फूट 6 इंच) होता. 16 चौकीदाराच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप ह्यांच्यावर लहान लहान खिडक्या होत्या. खिडक्यांचा रुद भाग प्रवेशद्वाराकडे होता. प्रवेशद्वारच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर खजुराची झाडे कोरलेली होती. 17 मग त्या माणसाने मला बाहेरच्या पटांगणात आणले. तेथे पटांगणाच्या सर्व बाजूंना खोल्या व फरसबंदी होती. फरसबंदीपुढे तीस खोल्या होत्या. 18 फरसबंदी दारांच्या लांबी इतकीच रुंद होती. ती प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूच्या शेवटापर्यंत होती. ही खालची फरसबंदी होय. 19 मग त्या माणसाने खालच्या दाराच्या आतील बाजूपासून पटांगणाच्या बाहेरच्या भिंतीपर्यंतचे माप घेतले. ते 100 हात (175फूट) पूर्वेला आणि 100 हात उत्तरेला असे भरले. 20 बाहेरच्या पटांगणाच्या उत्तरेकडे तोंड असलेल्या दाराची लांबी व रुंदीही त्या माणसाने मोजली. 21 हे द्वार त्याच्या प्रत्येक बाजूला असलेल्या तीन तीन खोल्या आणि त्याचा द्वारमंडप ह्यांची मापे पहिल्या प्रवेशद्वाराएवढीच होती. द्वार 50 हात लांब व 25हात रुंद होते. 22 पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराच्या खिडक्यांच्या, द्वारमंडपाच्या मापाच्याच ह्या द्वाराच्या खिडक्या व द्वारमंडप होता. खजुरीच्या झाडांचे नक्षीकामही अगदी तसेच होते. द्वाराला सात पायऱ्या होत्या व द्वारमंडप आतल्या बाजूला होता. 23 आतल्या पटांगणाला उत्तरेच्या बाजूकडील दारासमोर एक दार होते. ते पूर्वेच्या दाराप्रमाणे होते. त्या माणसाने एका दरापासून दुसऱ्या दारापर्यंतचे अंतर मोजले. ते 100 हात (175फूट) होते. 24 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडे नेले. तेथे मला एक दार दिसले. त्या माणसाने त्या दाराच्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांचे मोजमाप घेतले. ते इतर दारांच्या खांबांप्रमाणे व द्वारमंडपांप्रमाणेच भरले. 25 दार, त्याचा द्वारमंडप ह्यांना इतर दारांप्रमाणेच खिडक्या होत्या. दार 50 हात लांब व 25हात रुंद होते. 26 दारापर्यंत सात पायऱ्या होत्या. त्याचा द्वारमंडप आतल्या बाजूला होता. त्याच्या भिंतींवर प्रत्येक द्वारमंडप आतल्या बाजूला होता. त्याच्या भिंतींवर प्रत्येक बाजूला एक खजुरीचे झाड कोरलेले होते. 27 आतल्या पटांगणाच्या दक्षिणेला एक दार होते. दक्षिणेकडील दारांमधील अंतर त्या माणसाने मोजले. ते 100 हात (175फूट) होते. 28 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले. दक्षिणेकडचे दार इतर दारांच्याच मापाचे होते. 29 दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते. 30 द्वारमंडप 25हात (43फूट 9 इंच) रुंद आणि 5 हात लांब होता. 31 दक्षिणेच्या दाराचा द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. त्याच्या खांबावर खजुरीची झाडे कोरलेली होती. त्यांच्या जिन्याला आठ पायऱ्या होत्या. त्या प्रवेशद्वारापर्यंत जात होत्या. 32 त्या माणसाने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणले. त्याने दार मोजले. ते इतर दारांच्या मापाचेच होते. 33 पूर्वेच्या दाराकडील खोल्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच त्यांच्याच मापाचे होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. पूर्वेकडील दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते. 34 त्याच्या द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. त्याच्या जिन्याला प्रवेशद्वारापर्यंत जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या. 35 मग मला त्या माणसाने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती. 36 त्याच्या खोल्या, बाजूच्या भिंती, व द्वारमंडप हे इतर दारांच्या खोल्या, बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांच्याच मापाचे होते. ते दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43ूट 9 इंच) रुंद होते. 37 आणि त्याचा द्वारामंडप बाहेरच्या पटांगणाच्या जवळ असलेल्या दाराच्या शेवटाला होता. दाराच्या दोन्ही भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. जिन्याला प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या. 38 ह्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपापाशी दार असलेली एक खोली होती. ह्या खोलीत, याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना धुवत असत. 39 द्वारमंडपाच्या प्रत्येक बाजूला दोन टेबले होती. त्यावर होमार्पण, पापार्पण व दोषार्पण यांसाठी आणलेले प्राणी मारीत असत. 40 द्वारमंडपाच्या बाहेर, उत्तरेच्या दाराच्या तोंडापाशी, दोन टेबले होती. द्वारमंडपाच्या दुसऱ्या बाजूलाही दोन टेबले होती. 41 चार टेबले भिंतीच्या आत होती. व चार बाहेर होती. एकूण तेथे आठ टेबले होती. ह्यावर याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारीत असत. 42 होमार्पणासाठी ताशीव दगडाची चार टेबले होती. ती 11/2 हात (2 फूट 7.1/2 इंच) उंच होती. होमार्पण वा बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारण्यासाठी लागणारी हत्यारे याजक ह्या टेबलावर ठेवीत. 43 सर्व मंदिरात 3 इंच लांबीचे आकडे भिंतीवर बसविलेले होते. अर्पण करण्यासाठी आणलेले मांस टेबलावर होते. 44 आतल्या अंगणाच्या दाराच्या बाहेरच्या बाजूला दोन खोल्या होत्या. एक उत्तरेच्या दारालगत होती. तिचे तोंड दक्षिणेकडे होते. दुसरी दक्षिणेकडे होती. तिचे तोंड उत्तरेकडे होते. 45 तो माणूस मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली ही खोली मंदिरात सेवा करण्याच्या कामावर असलेल्या याजकाकरिता आहे. 46 पण उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीच्या सेवेचे काम करणाऱ्या याजकासाठी आहे. हे सर्व याजक लेवीचे वंशज आहेत. पण याजकांचा दुसरा गट सादोक वंशजांचा आहे व तेच फक्त बळी परमेश्वराकडे आणून परमेश्वराची सेवा करु शकतात.” 47 त्या माणसाने पटांगण मोजले. ते अगदी चौरसाकृती होते. ते 100 हात (175फूट) लांब व 100 हात (175फूट) रुंद होते. वेदी मंदिराच्या समोर होती. 48 मग त्या माणसाने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत 5 हात जाड आणि 3 हात रुंद होती. आणि दोन्हीमधील दार 14हात होते. 49 द्वारमंडप 20 हात रुंद व 20 हात लांब होते. द्वारमंडपाकडे यायला दहा पायऱ्या होत्या. द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीला प्रत्येकी एक खांब होता. असे तेथे दोन खांब होते.
1 आमच्या परागंदा होण्याच्या काळातील पंचविसाव्या वर्षाच्या आरंभाला (आंक्टोंबरमध्ये) महिन्याच्या दहाव्या दिवशी परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. चौदा वर्षापूर्वी ह्याच दिवशी खास्द्यांनी यरुशलेम हस्तगत केले होते. दृष्टान्तात परमेश्वराने मला तेथे नेले. .::. 2 दुष्टान्तात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्या पर्वतावर गावासारखे दिसणारे बांधकाम होते. ते दक्षिणेकडे होते. .::. 3 परमेश्वराने मला तेथे आणले. तेथे एक माणूस होता. तो चकाकी दिलेल्या काशाप्राणे होता. त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी व मापदंड होता. तो प्रवेशद्वाराजवळ उभा होता. .::. 4 तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्या डोळ्यांचा व कानांचा उपयोग कर. ह्या गोष्टी पाहा आणि माझे म्हणणे ऐक. मी दाखवीत असलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहा. का? कारण ह्या गोष्टी मी तुला दाखविण्यासाठीच तुला येथे आणले आहे. येथे पाहिलेले सर्व काही तू इस्राएलच्या लोकांना सांगितले पाहिजेस.” .::. 5 मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या माणसाच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात(10 फूट इंच) लांब होती. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली. मग त्या माणसाने भिंतीची उंची मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली. .::. 6 मग तो माणूस पूर्वेच्या दाराजवळ गेला. तो पायऱ्या चढला व त्याने दाराचा उंबरठा मोजला. तो एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुंद होता. दुसरा उंबराही तेवढाच रुंद होता. .::. 7 चौकीदाराची खोली एक पट्टी (10 फूट 6 इंच) लांब व एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुद होती. मंदिरासमोरच्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपाच्या दाराची रुंदी एक पट्टी होती. .::. 8 मग त्या माणसाने द्वारमंडप मोजला. .::. 9 तो 8 हात लांब भरला. मग त्याने दाराच्या दोन्ही बाजूच्या भिंती मोजल्या. प्रत्येक भिंत दोन हात (3 फूट 6 इंच) रुद होती. मंदिराच्या समोरच्या प्रवेशद्वाराच्या शेवटी द्वारमंडप होता. .::. 10 दाराच्या प्रत्येक बाजूला तीन लहान खोल्या होत्या. त्या सारख्या मापाच्या होत्या. दोन्ही बाजूच्या दाराच्या बाजूच्या भिंती सारख्या मापाच्या होत्या. .::. 11 त्या माणसाने दरवाजांची रुंदी भरली. ते 10 हात आणि 13हात लांब होती. .::. 12 प्रत्येक खोलीसमोर एक बुटकी भिंत होती. ती एक हात (1 फूट 6 इंच) उंच आणि 1 हात (1 फूट 6 इंच) जाड होती. खोल्यांची प्रत्येक बाजू 6 हात (10 फूट 6 इंच) लांब होती. .::. 13 माणासने एका खोलीच्या छतापासून दुसऱ्या खोलीच्या छतापर्यंतचे दाराचे मोजमाप केले. प्रत्येक दार दुसऱ्या दाराच्या बरोबर समोर होते. ते एका दारापासून दुसऱ्या दारापर्यंत 25हात (43फूट 9 इंच) भरले. .::. 14 त्या माणसाने बाजूच्या भिंतीचे क्षेत्रफळ काढले. ह्यामध्ये पटांगणातील द्वारमंडपाच्या बाजूच्या भिंतींचाही समावेश होता. एकंदर क्षेत्रफळ साठ हात होते. .::. 15 द्वारमंडप बाहेरच्या बाजूपासून आतल्या बाजूपर्यंत 50 हात (87फूट 6 इंच) होता. .::. 16 चौकीदाराच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप ह्यांच्यावर लहान लहान खिडक्या होत्या. खिडक्यांचा रुद भाग प्रवेशद्वाराकडे होता. प्रवेशद्वारच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर खजुराची झाडे कोरलेली होती. .::. 17 मग त्या माणसाने मला बाहेरच्या पटांगणात आणले. तेथे पटांगणाच्या सर्व बाजूंना खोल्या व फरसबंदी होती. फरसबंदीपुढे तीस खोल्या होत्या. .::. 18 फरसबंदी दारांच्या लांबी इतकीच रुंद होती. ती प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूच्या शेवटापर्यंत होती. ही खालची फरसबंदी होय. .::. 19 मग त्या माणसाने खालच्या दाराच्या आतील बाजूपासून पटांगणाच्या बाहेरच्या भिंतीपर्यंतचे माप घेतले. ते 100 हात (175फूट) पूर्वेला आणि 100 हात उत्तरेला असे भरले. .::. 20 बाहेरच्या पटांगणाच्या उत्तरेकडे तोंड असलेल्या दाराची लांबी व रुंदीही त्या माणसाने मोजली. .::. 21 हे द्वार त्याच्या प्रत्येक बाजूला असलेल्या तीन तीन खोल्या आणि त्याचा द्वारमंडप ह्यांची मापे पहिल्या प्रवेशद्वाराएवढीच होती. द्वार 50 हात लांब व 25हात रुंद होते. .::. 22 पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराच्या खिडक्यांच्या, द्वारमंडपाच्या मापाच्याच ह्या द्वाराच्या खिडक्या व द्वारमंडप होता. खजुरीच्या झाडांचे नक्षीकामही अगदी तसेच होते. द्वाराला सात पायऱ्या होत्या व द्वारमंडप आतल्या बाजूला होता. .::. 23 आतल्या पटांगणाला उत्तरेच्या बाजूकडील दारासमोर एक दार होते. ते पूर्वेच्या दाराप्रमाणे होते. त्या माणसाने एका दरापासून दुसऱ्या दारापर्यंतचे अंतर मोजले. ते 100 हात (175फूट) होते. .::. 24 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडे नेले. तेथे मला एक दार दिसले. त्या माणसाने त्या दाराच्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांचे मोजमाप घेतले. ते इतर दारांच्या खांबांप्रमाणे व द्वारमंडपांप्रमाणेच भरले. .::. 25 दार, त्याचा द्वारमंडप ह्यांना इतर दारांप्रमाणेच खिडक्या होत्या. दार 50 हात लांब व 25हात रुंद होते. .::. 26 दारापर्यंत सात पायऱ्या होत्या. त्याचा द्वारमंडप आतल्या बाजूला होता. त्याच्या भिंतींवर प्रत्येक द्वारमंडप आतल्या बाजूला होता. त्याच्या भिंतींवर प्रत्येक बाजूला एक खजुरीचे झाड कोरलेले होते. .::. 27 आतल्या पटांगणाच्या दक्षिणेला एक दार होते. दक्षिणेकडील दारांमधील अंतर त्या माणसाने मोजले. ते 100 हात (175फूट) होते. .::. 28 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले. दक्षिणेकडचे दार इतर दारांच्याच मापाचे होते. .::. 29 दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते. .::. 30 द्वारमंडप 25हात (43फूट 9 इंच) रुंद आणि 5 हात लांब होता. .::. 31 दक्षिणेच्या दाराचा द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. त्याच्या खांबावर खजुरीची झाडे कोरलेली होती. त्यांच्या जिन्याला आठ पायऱ्या होत्या. त्या प्रवेशद्वारापर्यंत जात होत्या. .::. 32 त्या माणसाने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणले. त्याने दार मोजले. ते इतर दारांच्या मापाचेच होते. .::. 33 पूर्वेच्या दाराकडील खोल्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच त्यांच्याच मापाचे होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. पूर्वेकडील दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते. .::. 34 त्याच्या द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. त्याच्या जिन्याला प्रवेशद्वारापर्यंत जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या. .::. 35 मग मला त्या माणसाने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती. .::. 36 त्याच्या खोल्या, बाजूच्या भिंती, व द्वारमंडप हे इतर दारांच्या खोल्या, बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांच्याच मापाचे होते. ते दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43ूट 9 इंच) रुंद होते. .::. 37 आणि त्याचा द्वारामंडप बाहेरच्या पटांगणाच्या जवळ असलेल्या दाराच्या शेवटाला होता. दाराच्या दोन्ही भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. जिन्याला प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या. .::. 38 ह्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपापाशी दार असलेली एक खोली होती. ह्या खोलीत, याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना धुवत असत. .::. 39 द्वारमंडपाच्या प्रत्येक बाजूला दोन टेबले होती. त्यावर होमार्पण, पापार्पण व दोषार्पण यांसाठी आणलेले प्राणी मारीत असत. .::. 40 द्वारमंडपाच्या बाहेर, उत्तरेच्या दाराच्या तोंडापाशी, दोन टेबले होती. द्वारमंडपाच्या दुसऱ्या बाजूलाही दोन टेबले होती. .::. 41 चार टेबले भिंतीच्या आत होती. व चार बाहेर होती. एकूण तेथे आठ टेबले होती. ह्यावर याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारीत असत. .::. 42 होमार्पणासाठी ताशीव दगडाची चार टेबले होती. ती 11/2 हात (2 फूट 7.1/2 इंच) उंच होती. होमार्पण वा बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारण्यासाठी लागणारी हत्यारे याजक ह्या टेबलावर ठेवीत. .::. 43 सर्व मंदिरात 3 इंच लांबीचे आकडे भिंतीवर बसविलेले होते. अर्पण करण्यासाठी आणलेले मांस टेबलावर होते. .::. 44 आतल्या अंगणाच्या दाराच्या बाहेरच्या बाजूला दोन खोल्या होत्या. एक उत्तरेच्या दारालगत होती. तिचे तोंड दक्षिणेकडे होते. दुसरी दक्षिणेकडे होती. तिचे तोंड उत्तरेकडे होते. .::. 45 तो माणूस मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली ही खोली मंदिरात सेवा करण्याच्या कामावर असलेल्या याजकाकरिता आहे. .::. 46 पण उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीच्या सेवेचे काम करणाऱ्या याजकासाठी आहे. हे सर्व याजक लेवीचे वंशज आहेत. पण याजकांचा दुसरा गट सादोक वंशजांचा आहे व तेच फक्त बळी परमेश्वराकडे आणून परमेश्वराची सेवा करु शकतात.” .::. 47 त्या माणसाने पटांगण मोजले. ते अगदी चौरसाकृती होते. ते 100 हात (175फूट) लांब व 100 हात (175फूट) रुंद होते. वेदी मंदिराच्या समोर होती. .::. 48 मग त्या माणसाने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत 5 हात जाड आणि 3 हात रुंद होती. आणि दोन्हीमधील दार 14हात होते. .::. 49 द्वारमंडप 20 हात रुंद व 20 हात लांब होते. द्वारमंडपाकडे यायला दहा पायऱ्या होत्या. द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीला प्रत्येकी एक खांब होता. असे तेथे दोन खांब होते.
  • यहेज्केल धडा 1  
  • यहेज्केल धडा 2  
  • यहेज्केल धडा 3  
  • यहेज्केल धडा 4  
  • यहेज्केल धडा 5  
  • यहेज्केल धडा 6  
  • यहेज्केल धडा 7  
  • यहेज्केल धडा 8  
  • यहेज्केल धडा 9  
  • यहेज्केल धडा 10  
  • यहेज्केल धडा 11  
  • यहेज्केल धडा 12  
  • यहेज्केल धडा 13  
  • यहेज्केल धडा 14  
  • यहेज्केल धडा 15  
  • यहेज्केल धडा 16  
  • यहेज्केल धडा 17  
  • यहेज्केल धडा 18  
  • यहेज्केल धडा 19  
  • यहेज्केल धडा 20  
  • यहेज्केल धडा 21  
  • यहेज्केल धडा 22  
  • यहेज्केल धडा 23  
  • यहेज्केल धडा 24  
  • यहेज्केल धडा 25  
  • यहेज्केल धडा 26  
  • यहेज्केल धडा 27  
  • यहेज्केल धडा 28  
  • यहेज्केल धडा 29  
  • यहेज्केल धडा 30  
  • यहेज्केल धडा 31  
  • यहेज्केल धडा 32  
  • यहेज्केल धडा 33  
  • यहेज्केल धडा 34  
  • यहेज्केल धडा 35  
  • यहेज्केल धडा 36  
  • यहेज्केल धडा 37  
  • यहेज्केल धडा 38  
  • यहेज्केल धडा 39  
  • यहेज्केल धडा 40  
  • यहेज्केल धडा 41  
  • यहेज्केल धडा 42  
  • यहेज्केल धडा 43  
  • यहेज्केल धडा 44  
  • यहेज्केल धडा 45  
  • यहेज्केल धडा 46  
  • यहेज्केल धडा 47  
  • यहेज्केल धडा 48  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References