1 पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला.2 शेशबस्सर म्हणजेच जरुब्बाबेल याच्याबरोबर जे आले ते असे: येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. परत आलेल्या इस्राएलींची नावानिशी यादी आणि संख्या पुढीलप्रमाणे:3 परोशाचे वंशज 2,1724 शफाट्याचे वंशज 3725 आरहाचे वंशज 7756 येशूवा व यवाब यांच्या घराण्यातीलपहथमवाबा चे वंशज 2,8127 एलामाचे वंशज 1,2548 जत्तूचे वंशज9 459 जक्काईचे वंशज 76010 बानीचे वंशज 64211 बेबाईचे वंशज 62312 अजगादाचे वंशज 1,22213 अदोनिकामचे वंशज 66614 बिग्वईचे वंशज 2,05615 आदीनाचे वंशज 45416 हिज्कीयाच्या घराण्यातीलआटेरचे वंशज 9817 बेसाईचे वंशज 32318 योराचे वंशज 11219 हाशूमाचे वंशज 22320 गिबाराचे वंशज 9521 बेथलहेमा नगरातील 12322 नटोफा नगरातील 5623 अनाथोथ मधील 12824 अजमावेथ मधील 4225 किर्याथ-आरीम, कफीरा आणिबैरोथ येथील 74326 रामा व गेबा मधील 62127 मिखमासमधील 12228 बेथेल आणि आय येथील 22329 नबो येथील 5230 मग्वीशचे लोक 15631 एलामनावाच्या दुसऱ्या गावचे 1,25432 हारीम येथील 32033 लोद, हादीद आणि ओनो येथील 72534 यरीहो नगरातील 34535 सनाहाचे 3,63036 याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातीलयादायाचे वंशज 97337 इम्मेराचे वंशज 1,05238 पशूहराचे वंशज 1,24739 हारीमाचे वंशज 1,01740 लेवींच्या घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचेवंशज 7441 गायक असे:आसाफचे वंशज 12842 मंदिराच्या द्वारपालांचे वंशज:शल्लूम, आहेर, तल्मोन, अक्कूवा,हतीत आणि शोबाई यांचे वंशज 13943 मंदिरातील पुढील विशेष सेवेकऱ्यांचे वंशज:सीहा, हसूफा, तब्बाबोथ,44 केरोस, सीहा, पादोन,.45 लबाना, हगबा, अकूबा,46 हागाब, शम्लाई, हानान,47 गिद्देल, गहर, राया,48 रसीन, नकोदा, गज्जाम,49 उज्जा, पासेह, बेसाई,50 अस्ना, मऊनीम, नफूसीम51 बकबुक हकूफ, हरहुर,52 बस्लूथ, महीद, हर्षा,53 बकर्स, सीसरा, तामह,54 नसीहा, हतीफा55 शलमोनाच्या सेवाकांचे वंशज:सोताई, हसोफरत, परुदा,56 जाला, दकर्न, गिद्देल,57 शफाट्या, हत्तील, पोखेथ-हस्सबाईम, आमी58 मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचेंवंशज 39259 तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे:60 दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज 65261 याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.62 आपल्या घराण्याची वंशावळ ज्यांना शोधूनही मिळाली नाही ते, आपले पूर्वज याजक होते हे सिध्द करु न शकल्याने याजक होऊ शकले नाहीत. त्यांची नावे याजकांच्या यादीत नाहीत.63 त्यांनी परमपवित्र मानले गेलेले अन्न खायचे नाही असा आदेश अधिपतीने काढला. उरीम व थुम्मीम घातलेला याजक देवाला कौल मागायला उभा राहीपर्यंत त्यांना हे अन्न खाण्यास मनाई होती.64(64-65) एकंदर 42,360 लोक परत आले. त्यामध्ये त्यांच्या 7,337स्त्री - पुरुष चाकरांची गणती केलेली नाही. त्यांच्याबरोबर 200 स्त्रीपुरुष गायकही होते.6566(66-67) 36घोडे, 245खेचरे, 435उंट आणि 6,720 गाढवे होती.6768 हे सर्वजण यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती.69 या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेली दाने अशी: सोने 1,110 पौंड, चांदी 3 टन, याजकांचे अंगरखे 100.70 याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.