मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यशया

यशया धडा 15

1 मवाबबद्दल ही शापवाणी. एका रात्रीत आर मवाब लुटले गेले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला. एका रात्री सैन्याने कीर मवाब लुटले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला. 2 राजघराणे व दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत. नबो व मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे व दाढी केली आहे. 3 मवाबमधील सर्वांनी घरादारातील सर्वांनी काळे कपडे घातले आहेत व ते रडत आहेत. 4 हेशबोन व एलाले येथील लोक एवढ्यामोठ्याने रडत आहेत की त्यांचा आवाज दूरच्या याहसा शहरापर्यंत ऐकू येत आहे. एवढेच काय पण सैनिकही गर्भगळीत होऊन भीतीने कापत आहेत. 5 मवाबच्या दु:खाने माझे मन रडत आहे. लोक बचावासाठी धावत आहेत. ते दूर सोअर व एगलाथ शलिशीयापर्यंत पळतात. लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत. होरोनाइमच्या वाटेवर लोक मोठ्याने आक्रोश करीत जात आहेत. 6 पण निम्रीमाचे पाणी आटले आहे. सर्व झाडेझुडपे वाळली आहेत. कोठेच हिरवेपणा नाही. 7 म्हणून लोक स्वत:ची संपत्ती गोळा करून मवाब सोडतात. ते ही संपत्ती घेऊन वाळुंजच्या खाडीपलीकडे जातात. 8 मवाबमध्ये सगळीकडे रडणे ऐकू येत आहे. लांब असलेल्या एग्लाइममधील लोक रडत आहेत आणि बैर-एलिममध्येही आक्रोश सुरू आहे. 9 दीमोनचेपाणी सक्ताने लालभडक झाले आहे. मी परमेश्वर दीमोनवर आणखी संकटे आणीन, मवाबमधील काही थोडी माणसे शत्रूच्या हातातून निसटली आहेत पण मी त्यांच्यावर त्यांना खाऊन टाकण्यासाठी सिंह पाठवीन.
1 मवाबबद्दल ही शापवाणी. एका रात्रीत आर मवाब लुटले गेले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला. एका रात्री सैन्याने कीर मवाब लुटले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला. .::. 2 राजघराणे व दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत. नबो व मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे व दाढी केली आहे. .::. 3 मवाबमधील सर्वांनी घरादारातील सर्वांनी काळे कपडे घातले आहेत व ते रडत आहेत. .::. 4 हेशबोन व एलाले येथील लोक एवढ्यामोठ्याने रडत आहेत की त्यांचा आवाज दूरच्या याहसा शहरापर्यंत ऐकू येत आहे. एवढेच काय पण सैनिकही गर्भगळीत होऊन भीतीने कापत आहेत. .::. 5 मवाबच्या दु:खाने माझे मन रडत आहे. लोक बचावासाठी धावत आहेत. ते दूर सोअर व एगलाथ शलिशीयापर्यंत पळतात. लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत. होरोनाइमच्या वाटेवर लोक मोठ्याने आक्रोश करीत जात आहेत. .::. 6 पण निम्रीमाचे पाणी आटले आहे. सर्व झाडेझुडपे वाळली आहेत. कोठेच हिरवेपणा नाही. .::. 7 म्हणून लोक स्वत:ची संपत्ती गोळा करून मवाब सोडतात. ते ही संपत्ती घेऊन वाळुंजच्या खाडीपलीकडे जातात. .::. 8 मवाबमध्ये सगळीकडे रडणे ऐकू येत आहे. लांब असलेल्या एग्लाइममधील लोक रडत आहेत आणि बैर-एलिममध्येही आक्रोश सुरू आहे. .::. 9 दीमोनचेपाणी सक्ताने लालभडक झाले आहे. मी परमेश्वर दीमोनवर आणखी संकटे आणीन, मवाबमधील काही थोडी माणसे शत्रूच्या हातातून निसटली आहेत पण मी त्यांच्यावर त्यांना खाऊन टाकण्यासाठी सिंह पाठवीन.
  • यशया धडा 1  
  • यशया धडा 2  
  • यशया धडा 3  
  • यशया धडा 4  
  • यशया धडा 5  
  • यशया धडा 6  
  • यशया धडा 7  
  • यशया धडा 8  
  • यशया धडा 9  
  • यशया धडा 10  
  • यशया धडा 11  
  • यशया धडा 12  
  • यशया धडा 13  
  • यशया धडा 14  
  • यशया धडा 15  
  • यशया धडा 16  
  • यशया धडा 17  
  • यशया धडा 18  
  • यशया धडा 19  
  • यशया धडा 20  
  • यशया धडा 21  
  • यशया धडा 22  
  • यशया धडा 23  
  • यशया धडा 24  
  • यशया धडा 25  
  • यशया धडा 26  
  • यशया धडा 27  
  • यशया धडा 28  
  • यशया धडा 29  
  • यशया धडा 30  
  • यशया धडा 31  
  • यशया धडा 32  
  • यशया धडा 33  
  • यशया धडा 34  
  • यशया धडा 35  
  • यशया धडा 36  
  • यशया धडा 37  
  • यशया धडा 38  
  • यशया धडा 39  
  • यशया धडा 40  
  • यशया धडा 41  
  • यशया धडा 42  
  • यशया धडा 43  
  • यशया धडा 44  
  • यशया धडा 45  
  • यशया धडा 46  
  • यशया धडा 47  
  • यशया धडा 48  
  • यशया धडा 49  
  • यशया धडा 50  
  • यशया धडा 51  
  • यशया धडा 52  
  • यशया धडा 53  
  • यशया धडा 54  
  • यशया धडा 55  
  • यशया धडा 56  
  • यशया धडा 57  
  • यशया धडा 58  
  • यशया धडा 59  
  • यशया धडा 60  
  • यशया धडा 61  
  • यशया धडा 62  
  • यशया धडा 63  
  • यशया धडा 64  
  • यशया धडा 65  
  • यशया धडा 66  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References