मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यिर्मया

यिर्मया धडा 49

1 हा संदेश अम्मोनी लोकांसाठी आहे. परमेश्वर म्हणतो, “अम्मोनी लोकांनो, इस्राएली लोकांना मुले नाहीत असे तुम्हाला वाटते का? आईवडील गेल्यावर तेथील जमिनीला कोणी वारस नाही असे तुम्ही समजता का? म्हणूनच कदाचित् मिलकोमने गादची भूमी घेतली का?” 2 परमेश्वर म्हणतो, “अम्मोनीच्या राब्बातून युद्धाचा खणखणाट ऐकण्याची वेळ येईल. राब्बाचा नाश होईल. ते पडझड झालेल्या इमारतींनी झाकलेली ओसाड टेकडी होईल. त्याच्या भोवतीची गावे जाळली जातील. ज्या लोकांनी, इस्राएलच्या लोकांना इस्राएलची भूमी बळजबरीने सोडायला लावली, त्यांच्याकडून इस्राएलचे लोक आपल्या भूमीचा ताबा घेतील. पण भविष्यात, इस्राएल त्यांना बळजबरीने हाकलून लावेल.” परमेश्वराने हे सांगितले. 3 “हेशबोनच्या लोकांनो, रडा का? कारण आयचा नाश झाला आहे. अम्मोनच्या राब्बातील स्त्रियांनो, शोक करा. शोकप्रदर्शक कपडे घालून रडा! सुरक्षेसाठी शहराकडे पळा! का? कारण शत्रू येत आहे. ते मिलकोम दैवताला, त्याच्या पुजाऱ्याला व इतर अधिकाऱ्यांना नेतील. 4 तुम्ही तुमच्या सामर्थ्याबद्दल बढाया मारता. पण तुम्ही दुर्बल होत आहात. तुमचा पैसा तुम्हाला वाचवील असा तुम्हाला विश्वास वाटतो तुमच्यावर हल्ला करण्याचा कोणी विचारही करणार नाही असे तुम्ही समजता.” 5 पण सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो: “मी सर्व बाजूंनी तुमच्यावर संकटे आणीन. तुम्ही सर्व पळून जाल आणि कोणीही तुम्हाला एकत्र आणू शकणार नाही.” 6 “अम्मोनी लोकांना कैदी करुन नेले जाईल. पण एक वेळ अशी येईल की मी त्यांना परत आणीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 7 हा संदेश अदोमसाठी आहेसर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो: “तेमानमध्ये जरासुद्धा शहाणपण उरले नाही का? अदोमचे सुज्ञ लोक चांगला सल्ला देऊ शकत नाहीत का? त्यांनी त्यांचे शहाणपण गमावले का? 8 ददानच्या लोकांनो, पळा! लपा! का? कारण मी एसावाला त्याने केलेल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा करीन. 9 “मजूर द्राक्षमळ्यातून द्राक्षे तोडतात पण ते काही द्राक्षे झाडावरच ठेवतात. चोरसुद्धा सर्व नेत नाही. 10 पण एसावातील सर्व काही मी काढून घेईन, मी त्याच्या सर्व लपायच्या जागा शोधून काढीन. तो माझ्यापासून लपून राहू शकणार नाही. त्याची मुले, नातेवाईक, शेजारी सर्व मरतील. 11 त्याच्या मुलांची काळजी घ्यायला कोणीही शिल्लक राहणार नाही. त्याच्या बायका निराधार होतील.” पण मी (देव) तुमच्या अनाथ मुलांच्या जीवाचे रक्षण करीन. तुमच्या विधवा माझ्यावर विश्वास ठेऊ शकतात.” 12 परमेश्वर म्हणतो: “काही लोक शिक्षेला पात्र नाहीत. पण त्यांना सोसावे लागते. पण अदोम, तू शिक्षेला पात्र आहेस. म्हणून तुला खरोखरीच शिक्षा होईल. तुझ्या शिक्षेतून तुझी सुटका होणार नाही. तुला शिक्षा होईलच.” 13 परमेश्वर म्हणतो, “माझ्या अधिकारात मी वचन देतो की बसऱ्याचा नाश होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. दुसऱ्या शहरांना शाप देताना लोक बसऱ्याचे नाव उच्चारतील. लोक त्याचा अपमान करतील आणि त्याभोवतालची गावेसुद्धा कायमची नाश पावतील.” 14 मी परमेश्वराकडून आलेला संदेश ऐकला परमेश्वराने राष्ट्रांकडे दूत पाठविला. तो असा “तुमची सैन्ये गोळा करा. लढायला सज्ज व्हा. अदोमकडे कूच करा. 15 “अदोम, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र बनवीन. प्रत्येकजण तुझा तिरस्कार करील. 16 अदोम, तू दुसऱ्या राष्ट्रांना घाबरविलेस! म्हणून तू स्वत:ला श्रेष्ठ समजलास! पण तू मूर्ख बनलास! तुझ्या गर्वाने तुला फसविले. अदोम, तू डोंगरात उंचावर राहतोस मोठ्या दगड धोंड्यांनी सुरक्षित केलेल्या जागी तू राहतोस पण जरी तू गरुडाच्या घरट्याप्रमाणे उंच घर बांधलेस तरी मी तुला पकडून खाली खेचून आणीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 17 अदोमचा नाश होईल. लोकांना ते पाहून धक्का बसेल. नाश झालेली शहरे पाहून लोक चकित होऊन सुस्कारे सोडतील. 18 सदोम, गमोरा त्याभोवतालची गावे यांच्याप्रमाणे अदोमचा नाश होईल. तेथे कोणीही राहणार नाही.” देव असे म्हणाला, 19 “यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपातून कधीतरी सिंह येईल व तो लोक शेतात जेथे मेंढ्या व गुरे ठेवतात, तेथे जाईल. मी त्या सिंहा सारखाच आहे. मी अदोमला जाईन आणि त्या लोकांना घाबरवीन. मी त्यांना पळून जायला भाग पाडीन, त्यांचा एकही तरुण मला थांबवू शकणार नाही. कोणीही माझ्यासारखा नाही. कोणीही मला आव्हान देणार नाही. त्यांचा कोणीही मेंढपाळ (नेता) माझ्या विरोधात उभा राहणार नाही.” 20 म्हणून अदोमच्या लोकांसाठी परमेश्वराने आखलेला बेत काय आहे तो ऐका: तेमानच्या लोकांचे काय करायचे ते परमेश्वराने ठरविले आहे. ते काय ठरविले आहे तेही ऐका. शत्रू अदोमच्या कळपातून (लोकांतून) लहान लेकरांना ओढून नेईल. त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे अदोमची कुरणे ओसाड बनतील. 21 अदोमच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्याचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्येत ऐकू जाईल. 22 हेरलेल्या सावजावर घिरटया घालणाऱ्या गरुडाप्रमाणे परमेश्वर आहे. परमेश्वर, गरुडाप्रमाणे, आपले पंख बसऱ्यावर पसरेल. त्या वेळी अदोमचे सैनिक फार भयभीत होतील प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे शूर सैनिक भीतीने रडतील. 23 हा संदेश दिमिष्क शहरासाठी आहे.‘हमाथ व अर्पाद ही गावे घाबरली आहेत वाईट बातमी ऐकल्याने ती घाबरलीत. त्यांचा धीर खचला आहे. ते चिंताग्रस्त झाले आहेत आणि भयभीतही 24 दिमीष्क दुबळे झाले आहे. लोकांना पळून जायचे आहे. लोक भीतिग्रस्त होण्याच्या बेतात आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे लोकांना यातना व वेदना होत आहेत. 25 “दिमिष्क एक सुखी नगरी होती. लोकांनी अजून ती ‘मौजेची नगरी’ सोडलेली नाही. 26 म्हणून तरुण त्या नगरीतील सार्वजनिक स्थळी मरतील. त्या वेळी तिचे सर्व सैनिक मारले जातील.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 27 “मी दिमिष्काच्या तटबंदीला आग लावीन. ती बेन-हदादचे मजबूत गड पूर्णपणे बेचिराख करील.” 28 हा संदेश केदारच्या कुळांसाठी व हासोरच्या राज्यकर्त्यांसाठी आहे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने त्यांचा पराभव केला.परमेश्वर म्हणतो, “जा आणि केदारच्या कुळांवर चढाई करा. पूर्वेच्या लोकांचा नाश करा. 29 त्यांचे तंबू व कळप नेले जातील. त्यांचे तंबू व संपत्ती घेतली जाईल त्यांचा शत्रू त्यांचे उंट नेईल. लोक त्यांना ओरडून सांगतील. ‘आमच्याभोवती काहीतरी भयंकर घडत आहे.’ 30 लवकर पळा! हासोरवासीयांनो, लपायला चांगली जागा शोधा.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे. तुमचा पराभव करण्यासाठी त्याने हुशारीने बेत रचला आहे. 31 आपण सुरक्षित आहोत अशी भावना असलेले एक राष्ट्र आहे. त्याला अतिशय सुरक्षित वाटते त्याच्या रक्षणसाठी दरवाजे वा कुंपण नाही. त्यांच्याजवळ कोणी माणसे राहात नाहीत. परमेश्वर म्हणतो, ‘त्या राष्ट्रांवर हल्ला करा.’ 32 शत्रू त्यांचे उंट व गुरांचे मोठे कळप चोरेल. ते लोक त्यांच्या दाढीच्या कडा कापतात.मी त्यांना जगाच्या लांबच्या कोपऱ्यात पळून जायला लावीन. मी, त्यांच्यावर, सगळीकडून संकटे आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 33 “हासोरला फक्त कोल्ह्यांची वस्ती होईल. तेथे कोणीही मनुष्यप्राणी राहणार नाही. ती जागा निर्जन होईल. तेथे कायमचे ओसाड वाळवंट होईल.” 34 यहूदाचा राजा सिद्कीया ह्याचा कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात यिर्मया या संदेष्ट्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो एलाम या राष्ट्राबाबत होता. 35 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “मी लवकरच एलामचे धनुष्य मोडीन. धनुष्य हे त्याचे सर्वांत सामर्थ्यशाली शस्त्र आहे. 36 मी एलामच्या विरुद्ध चार वारे सोडीन. मी त्यांना आकाशाच्या चार कोपऱ्यातून सोडीन. जगाच्या पाठीवर जेथे चारी वारे पोहोचतील अशा ठिकाणी मी त्यांना पाठवीन. एलामचे लोक कैदी म्हणून प्रत्येक राष्ट्रांतून नेले जातील. 37 एलामचे त्याच्या शत्रूसमोर मी तुकडे तुकडे करीन. जे लोक त्याला ठार करु इच्छितात, त्यांच्यासमोर मी एलामला मोडीन. मी त्यांच्यावर भयंकर संकटे आणीन. मी कित्ती रागावलो आहे, हे त्यांना दाखवून देईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.“एलामचा पाठलाग करायला मी तलवार पाठवीन. मी त्या सर्वांना ठार करेपर्यंत, ती त्यांचा पाठलाग करील. 38 नियंत्रण करणे माझ्या हातात आहे, हे मी एलामला दाखवून देईन. मी राजा व त्याचे अधिकारी यांना ठार करीन.” हा देवाचा संदेश आहे. 39 “पण भविष्यात, मी एलामला परत आणीन आणि तिच्याबाबतीत चांगल्या गोष्टी घडतील असे करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
1 हा संदेश अम्मोनी लोकांसाठी आहे. परमेश्वर म्हणतो, “अम्मोनी लोकांनो, इस्राएली लोकांना मुले नाहीत असे तुम्हाला वाटते का? आईवडील गेल्यावर तेथील जमिनीला कोणी वारस नाही असे तुम्ही समजता का? म्हणूनच कदाचित् मिलकोमने गादची भूमी घेतली का?” .::. 2 परमेश्वर म्हणतो, “अम्मोनीच्या राब्बातून युद्धाचा खणखणाट ऐकण्याची वेळ येईल. राब्बाचा नाश होईल. ते पडझड झालेल्या इमारतींनी झाकलेली ओसाड टेकडी होईल. त्याच्या भोवतीची गावे जाळली जातील. ज्या लोकांनी, इस्राएलच्या लोकांना इस्राएलची भूमी बळजबरीने सोडायला लावली, त्यांच्याकडून इस्राएलचे लोक आपल्या भूमीचा ताबा घेतील. पण भविष्यात, इस्राएल त्यांना बळजबरीने हाकलून लावेल.” परमेश्वराने हे सांगितले. .::. 3 “हेशबोनच्या लोकांनो, रडा का? कारण आयचा नाश झाला आहे. अम्मोनच्या राब्बातील स्त्रियांनो, शोक करा. शोकप्रदर्शक कपडे घालून रडा! सुरक्षेसाठी शहराकडे पळा! का? कारण शत्रू येत आहे. ते मिलकोम दैवताला, त्याच्या पुजाऱ्याला व इतर अधिकाऱ्यांना नेतील. .::. 4 तुम्ही तुमच्या सामर्थ्याबद्दल बढाया मारता. पण तुम्ही दुर्बल होत आहात. तुमचा पैसा तुम्हाला वाचवील असा तुम्हाला विश्वास वाटतो तुमच्यावर हल्ला करण्याचा कोणी विचारही करणार नाही असे तुम्ही समजता.” .::. 5 पण सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो: “मी सर्व बाजूंनी तुमच्यावर संकटे आणीन. तुम्ही सर्व पळून जाल आणि कोणीही तुम्हाला एकत्र आणू शकणार नाही.” .::. 6 “अम्मोनी लोकांना कैदी करुन नेले जाईल. पण एक वेळ अशी येईल की मी त्यांना परत आणीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. .::. 7 हा संदेश अदोमसाठी आहेसर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो: “तेमानमध्ये जरासुद्धा शहाणपण उरले नाही का? अदोमचे सुज्ञ लोक चांगला सल्ला देऊ शकत नाहीत का? त्यांनी त्यांचे शहाणपण गमावले का? .::. 8 ददानच्या लोकांनो, पळा! लपा! का? कारण मी एसावाला त्याने केलेल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा करीन. .::. 9 “मजूर द्राक्षमळ्यातून द्राक्षे तोडतात पण ते काही द्राक्षे झाडावरच ठेवतात. चोरसुद्धा सर्व नेत नाही. .::. 10 पण एसावातील सर्व काही मी काढून घेईन, मी त्याच्या सर्व लपायच्या जागा शोधून काढीन. तो माझ्यापासून लपून राहू शकणार नाही. त्याची मुले, नातेवाईक, शेजारी सर्व मरतील. .::. 11 त्याच्या मुलांची काळजी घ्यायला कोणीही शिल्लक राहणार नाही. त्याच्या बायका निराधार होतील.” पण मी (देव) तुमच्या अनाथ मुलांच्या जीवाचे रक्षण करीन. तुमच्या विधवा माझ्यावर विश्वास ठेऊ शकतात.” .::. 12 परमेश्वर म्हणतो: “काही लोक शिक्षेला पात्र नाहीत. पण त्यांना सोसावे लागते. पण अदोम, तू शिक्षेला पात्र आहेस. म्हणून तुला खरोखरीच शिक्षा होईल. तुझ्या शिक्षेतून तुझी सुटका होणार नाही. तुला शिक्षा होईलच.” .::. 13 परमेश्वर म्हणतो, “माझ्या अधिकारात मी वचन देतो की बसऱ्याचा नाश होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. दुसऱ्या शहरांना शाप देताना लोक बसऱ्याचे नाव उच्चारतील. लोक त्याचा अपमान करतील आणि त्याभोवतालची गावेसुद्धा कायमची नाश पावतील.” .::. 14 मी परमेश्वराकडून आलेला संदेश ऐकला परमेश्वराने राष्ट्रांकडे दूत पाठविला. तो असा “तुमची सैन्ये गोळा करा. लढायला सज्ज व्हा. अदोमकडे कूच करा. .::. 15 “अदोम, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र बनवीन. प्रत्येकजण तुझा तिरस्कार करील. .::. 16 अदोम, तू दुसऱ्या राष्ट्रांना घाबरविलेस! म्हणून तू स्वत:ला श्रेष्ठ समजलास! पण तू मूर्ख बनलास! तुझ्या गर्वाने तुला फसविले. अदोम, तू डोंगरात उंचावर राहतोस मोठ्या दगड धोंड्यांनी सुरक्षित केलेल्या जागी तू राहतोस पण जरी तू गरुडाच्या घरट्याप्रमाणे उंच घर बांधलेस तरी मी तुला पकडून खाली खेचून आणीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. .::. 17 अदोमचा नाश होईल. लोकांना ते पाहून धक्का बसेल. नाश झालेली शहरे पाहून लोक चकित होऊन सुस्कारे सोडतील. .::. 18 सदोम, गमोरा त्याभोवतालची गावे यांच्याप्रमाणे अदोमचा नाश होईल. तेथे कोणीही राहणार नाही.” देव असे म्हणाला, .::. 19 “यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपातून कधीतरी सिंह येईल व तो लोक शेतात जेथे मेंढ्या व गुरे ठेवतात, तेथे जाईल. मी त्या सिंहा सारखाच आहे. मी अदोमला जाईन आणि त्या लोकांना घाबरवीन. मी त्यांना पळून जायला भाग पाडीन, त्यांचा एकही तरुण मला थांबवू शकणार नाही. कोणीही माझ्यासारखा नाही. कोणीही मला आव्हान देणार नाही. त्यांचा कोणीही मेंढपाळ (नेता) माझ्या विरोधात उभा राहणार नाही.” .::. 20 म्हणून अदोमच्या लोकांसाठी परमेश्वराने आखलेला बेत काय आहे तो ऐका: तेमानच्या लोकांचे काय करायचे ते परमेश्वराने ठरविले आहे. ते काय ठरविले आहे तेही ऐका. शत्रू अदोमच्या कळपातून (लोकांतून) लहान लेकरांना ओढून नेईल. त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे अदोमची कुरणे ओसाड बनतील. .::. 21 अदोमच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्याचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्येत ऐकू जाईल. .::. 22 हेरलेल्या सावजावर घिरटया घालणाऱ्या गरुडाप्रमाणे परमेश्वर आहे. परमेश्वर, गरुडाप्रमाणे, आपले पंख बसऱ्यावर पसरेल. त्या वेळी अदोमचे सैनिक फार भयभीत होतील प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे शूर सैनिक भीतीने रडतील. .::. 23 हा संदेश दिमिष्क शहरासाठी आहे.‘हमाथ व अर्पाद ही गावे घाबरली आहेत वाईट बातमी ऐकल्याने ती घाबरलीत. त्यांचा धीर खचला आहे. ते चिंताग्रस्त झाले आहेत आणि भयभीतही .::. 24 दिमीष्क दुबळे झाले आहे. लोकांना पळून जायचे आहे. लोक भीतिग्रस्त होण्याच्या बेतात आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे लोकांना यातना व वेदना होत आहेत. .::. 25 “दिमिष्क एक सुखी नगरी होती. लोकांनी अजून ती ‘मौजेची नगरी’ सोडलेली नाही. .::. 26 म्हणून तरुण त्या नगरीतील सार्वजनिक स्थळी मरतील. त्या वेळी तिचे सर्व सैनिक मारले जातील.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. .::. 27 “मी दिमिष्काच्या तटबंदीला आग लावीन. ती बेन-हदादचे मजबूत गड पूर्णपणे बेचिराख करील.” .::. 28 हा संदेश केदारच्या कुळांसाठी व हासोरच्या राज्यकर्त्यांसाठी आहे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने त्यांचा पराभव केला.परमेश्वर म्हणतो, “जा आणि केदारच्या कुळांवर चढाई करा. पूर्वेच्या लोकांचा नाश करा. .::. 29 त्यांचे तंबू व कळप नेले जातील. त्यांचे तंबू व संपत्ती घेतली जाईल त्यांचा शत्रू त्यांचे उंट नेईल. लोक त्यांना ओरडून सांगतील. ‘आमच्याभोवती काहीतरी भयंकर घडत आहे.’ .::. 30 लवकर पळा! हासोरवासीयांनो, लपायला चांगली जागा शोधा.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे. तुमचा पराभव करण्यासाठी त्याने हुशारीने बेत रचला आहे. .::. 31 आपण सुरक्षित आहोत अशी भावना असलेले एक राष्ट्र आहे. त्याला अतिशय सुरक्षित वाटते त्याच्या रक्षणसाठी दरवाजे वा कुंपण नाही. त्यांच्याजवळ कोणी माणसे राहात नाहीत. परमेश्वर म्हणतो, ‘त्या राष्ट्रांवर हल्ला करा.’ .::. 32 शत्रू त्यांचे उंट व गुरांचे मोठे कळप चोरेल. ते लोक त्यांच्या दाढीच्या कडा कापतात.मी त्यांना जगाच्या लांबच्या कोपऱ्यात पळून जायला लावीन. मी, त्यांच्यावर, सगळीकडून संकटे आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. .::. 33 “हासोरला फक्त कोल्ह्यांची वस्ती होईल. तेथे कोणीही मनुष्यप्राणी राहणार नाही. ती जागा निर्जन होईल. तेथे कायमचे ओसाड वाळवंट होईल.” .::. 34 यहूदाचा राजा सिद्कीया ह्याचा कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात यिर्मया या संदेष्ट्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो एलाम या राष्ट्राबाबत होता. .::. 35 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “मी लवकरच एलामचे धनुष्य मोडीन. धनुष्य हे त्याचे सर्वांत सामर्थ्यशाली शस्त्र आहे. .::. 36 मी एलामच्या विरुद्ध चार वारे सोडीन. मी त्यांना आकाशाच्या चार कोपऱ्यातून सोडीन. जगाच्या पाठीवर जेथे चारी वारे पोहोचतील अशा ठिकाणी मी त्यांना पाठवीन. एलामचे लोक कैदी म्हणून प्रत्येक राष्ट्रांतून नेले जातील. .::. 37 एलामचे त्याच्या शत्रूसमोर मी तुकडे तुकडे करीन. जे लोक त्याला ठार करु इच्छितात, त्यांच्यासमोर मी एलामला मोडीन. मी त्यांच्यावर भयंकर संकटे आणीन. मी कित्ती रागावलो आहे, हे त्यांना दाखवून देईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.“एलामचा पाठलाग करायला मी तलवार पाठवीन. मी त्या सर्वांना ठार करेपर्यंत, ती त्यांचा पाठलाग करील. .::. 38 नियंत्रण करणे माझ्या हातात आहे, हे मी एलामला दाखवून देईन. मी राजा व त्याचे अधिकारी यांना ठार करीन.” हा देवाचा संदेश आहे. .::. 39 “पण भविष्यात, मी एलामला परत आणीन आणि तिच्याबाबतीत चांगल्या गोष्टी घडतील असे करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
  • यिर्मया धडा 1  
  • यिर्मया धडा 2  
  • यिर्मया धडा 3  
  • यिर्मया धडा 4  
  • यिर्मया धडा 5  
  • यिर्मया धडा 6  
  • यिर्मया धडा 7  
  • यिर्मया धडा 8  
  • यिर्मया धडा 9  
  • यिर्मया धडा 10  
  • यिर्मया धडा 11  
  • यिर्मया धडा 12  
  • यिर्मया धडा 13  
  • यिर्मया धडा 14  
  • यिर्मया धडा 15  
  • यिर्मया धडा 16  
  • यिर्मया धडा 17  
  • यिर्मया धडा 18  
  • यिर्मया धडा 19  
  • यिर्मया धडा 20  
  • यिर्मया धडा 21  
  • यिर्मया धडा 22  
  • यिर्मया धडा 23  
  • यिर्मया धडा 24  
  • यिर्मया धडा 25  
  • यिर्मया धडा 26  
  • यिर्मया धडा 27  
  • यिर्मया धडा 28  
  • यिर्मया धडा 29  
  • यिर्मया धडा 30  
  • यिर्मया धडा 31  
  • यिर्मया धडा 32  
  • यिर्मया धडा 33  
  • यिर्मया धडा 34  
  • यिर्मया धडा 35  
  • यिर्मया धडा 36  
  • यिर्मया धडा 37  
  • यिर्मया धडा 38  
  • यिर्मया धडा 39  
  • यिर्मया धडा 40  
  • यिर्मया धडा 41  
  • यिर्मया धडा 42  
  • यिर्मया धडा 43  
  • यिर्मया धडा 44  
  • यिर्मया धडा 45  
  • यिर्मया धडा 46  
  • यिर्मया धडा 47  
  • यिर्मया धडा 48  
  • यिर्मया धडा 49  
  • यिर्मया धडा 50  
  • यिर्मया धडा 51  
  • यिर्मया धडा 52  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References