1 तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. वेशींवर पहारा करायला माणसे नेमली. मंदिरात गायनाला आणि याजकांना मदत करायला माणसे नेमून दिली.2 यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गिढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. हनानीची निवड मी केली कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.3 नंतर हनानी आणि हनन्या यांना मी म्हणालो, “सूर्य चांगला वर येऊन ऊन तापल्यावरच तुम्ही रोज वेशीचे दरवाजे उघडा आणि सूर्यास्तापूर्वीच दरवाजे लावून घ्या. यरुशलेममध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा. त्यापैकी काही जणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”4 आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती.5 तेव्हा सर्व लोकांनी एकदा एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात आणले. सर्व वंशावळयांची यादी करावी म्हणून मी सर्व महत्वाची माणसे, अधिकारी, सामान्य लोक यांना एकत्र बोलावले. बंदिवासातून जे सगळयात आधी परत आले त्यांच्या वंशवळ्यांच्या याद्या मला सापडल्या त्यात मला जे लिहिलेले सापडले ते पुढीलप्रमाणे:6 बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने या लोकांना बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहुदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.7 जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दमानी, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:8 परोशचे वंशज21729 शेफठ्याचे वंशज37210 आरहचे वंशज65211 येशूवा आणि यवाब यांच्यावंशावळीतील पहथमवाबचेवंशज281812 एलामचे वंशज125413 जत्तूचे वंशज 84514 जक्काईचे वंशज 76015 बिन्नुईचे वंशज 64816 बेबाईचे वंशज62817 आजगादचे वंशज232218 अदोनीकामचे वंशज66719 बिग्वईचे वंशज20 6720 आदीनाचे वंशज 65521 हिज्कीयाच्या कुटुंबातीलओटेरचे वंशज9822 हाशुमाचे वंशज32823 बेसाईचे वंशज32424 हारिफाचे वंशज11225 गिबोनाचे वंशज9526 बेथलहेम आणि नटोफा यागावांमधली माणसे18827 अनाथोथ गावची माणसे12828 बेथ-अजमावेथ मधले लोक4229 किर्याथ-यारीम, कपीरा व बैरोथया गावातली74330 रामा आणि गेबा इथली62131 मिखमास या गावची 12232 बेथल आणि आय इथली12333 नबो या दुसऱ्या एका गावची 5234 एलाम या दुसऱ्या गावची125435 हारिम या गावचे लोक32036 यरीहो या गावचे लोक34537 लोद, हादीद व ओनो या गावाचे72138 सनावाचे393039 याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातली यदायायाचे वंशज97340 इम्मेराचे वंशज105241 पशहूराचे वंशज124742 हारिमाचे वंशज101743 लेवीच्या घराण्यातील माणसे पुढील प्रमाणे:होदयाच्या कुळातली कदमीएलच्याघराण्यातील येशूवाचे वंशज7444 गाणारे असे:आसाफाचे वंशज14845 द्वारपाल पुढील प्रमाणे:शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबायांचे वंशज13846 हे मंदिराचे विशेष सेवेकरी:सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज47 केरोस, सीया, पादोन48 लेबोना, हगाबा, सल्माई49 हानान, गिद्देल, गहार50 राया, रसीन, नकोदा51 गज्जाम, उज्जा. पासेहा52 बेसई, मऊनीम, नफूशेसीम53 बकबूक, हकूफ, हईराचे54 बसलीथ, महीद, हर्शा55 बकर्स, सीसरा, तामहा56 नसीहा आणि हतीफा57 शलमोनच्या सेवकांचे वंशज:सोताई, सोफेरेथ, परीदा58 याला, दकर्न, गिद्देल59 शफाठ्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईमआणि आमोन.60 मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनच्या सेवकांचे वंशज मिळून 39261 तेल मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलींमधलीच आहेत हे त्यांना खात्रीलायक सांगता येत नव्हते. ते लोक असे:62 दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज 64263 आणि याजकांच्या घराण्यातील वंशज असे:हबाया, हक्कोस, बर्जिल्लय (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्लयच्या वंशजात होई)64 काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. याजक म्हणून काम करता यावे यासाठी आपण याजकांचेच पूर्वज आहोत हे काही त्यांना सिध्द करता आले नाही. त्यामुळे त्यांना याजक म्हणून सेवा करता आली नाही. त्यांची नावे याजकांच्या यादीमध्ये समाविष्ट झाली नाहीत.65 अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने या बाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत त्यांनी या अन्नातले काही खायचे नव्हते.66(66-67) परत आलेल्या जथ्थ्या मध्ये सगळे मिळून एकंदर 42360 लोक होते. यात 7337 स्त्री-पुरुष सेवकांची गणना केलेली नाही. शिवाय त्यांच्यामध्ये 245गायकगायिका होत्या.6768(68-69) त्यांच्याजवळ 736घोडे, 245खेचरे, 435उंट आणि 6720 गाढवे होती.6970 घराण्यांच्या काही प्रमुखानी कामाला हातभार म्हणून पैसे दिले. राज्यपालने एकोणिस पौंड सोने भांडाराला दिले. शिवाय पन्नास वाडगे आणि याजकांसाठी 530 वस्त्रे दिली.71 घराण्याच्या प्रमुखांनी कामाला साहाय्य म्हणून भांडाराला 375पौंड सोने दिले. याखेरीज 1 1/3 टन चांदी देखील दिली.72 इतर सर्व लोकांनी मिळून 375पौंड सोने, 1 1/3 टन चांदी आणि याजकांसाठी 67वस्त्रे दिली.73 अशाप्रकारे याजक, लेवींच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत:च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.