मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
प्रकटीकरण

प्रकटीकरण धडा 19

1 यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते:“हालेलुया! तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत 2 कारण त्याचे न्यायनिवाडे खरे आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली,तिला देवाने शिक्षा केली आहे. त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.” 3 ते पुन्हा म्हणाले,“हालेलुया! तिच्यापासून निघालेला धूर अनंतकाळ वर जातो.” 4 मग चोवीस वडीलजन आणि चार जिवंत प्राणी जो देव सिंहासनावर बसला आहे त्याच्या पाया पडले व त्यांनी त्याचीउपासना केली. ते म्हणाले:“आमेन, हालेलुया!” 5 मग सिंहासनावरुन एक वाणी झाली, ती म्हणाली,“देवाच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुति करा, जे तुम्ही त्याचे भय धरता ते तुम्ही सर्व लहानथोर देवाची स्तुति करा!” 6 नंतर मोठ्या लोकसमुदायाच्या गर्जनेसारखा आवाज मी ऐकला, तो आवाज महापूराच्या आणि मेघांच्या मोठयागडगडाटासारखा होता. तो लोकसमुदास असे मोठ्याने म्हणत होता की:“हालेलुया! कारण आमच्या सर्वसमर्थ देवाने सत्ता गाजविण्यास सुरुवात केली आहे. 7 आपण उल्हास करु व आनंदात राहू! आणि त्याचे गौरव करु कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे. आणि त्याच्यावधूने स्वत:ला नटवून तयार केले आहे 8 तिला स्वच्छ, चमकणारे तागाचे कपडे नेसायला दिले आहेत.”(देवाच्या पवित्र लोकांनी केलेली नीतीमत्त्वाची कामे म्हणजेच तलम तागाचे कपडे आहेत) 9 नंतर तो देवदूत मला म्हणाला, “हे लिही, ज्यांना कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले आहे, ते धन्य!” तोमला म्हणाला, “हे देवाचे खरेखुरे शब्द आहेत.” 10 यावर मी देवदूताच्या पायावर डोके ठेवून त्याची उपासना करु लागलो; परंतु देवदूत म्हणाला, “असे करु नको, मी तरतुझ्याबरोबरीचा आणि येशूच्या सत्याबाबत साक्ष देण्याची जबाबदारी तुझ्या ज्या भावांवर आहे, त्यांच्या बरोबरीचा एक सेवकमात्र आहे. देवाची उपासना कर! येशूच्या सत्याचे शिक्षण देणे हाच देवाच्या संदेशाचा आत्मा आहे.” 11 नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला; आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे‘नाव विश्वासू आणि खरा’ असे होते; कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. 12 त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुगुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिलेआहे. ते नाव काय आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही. 13 त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेलाझगा घातला होता. त्या स्वाराचे नाव “देवाचा शब्द” असे आहे. 14 स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्यपांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते. 15 त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते जिच्याने तो राष्ट्रांना नमवील,आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सता गाजवील. सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडवील. 16 त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे: 17 नंतर सूर्यात उभा राहिलेला एक देवदूत मी पाहिला. तो मोठ्याने ओरडून आकाशामध्ये उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना म्हणतहोता, “या! देवाच्या महान मेजवानीसाठी जमा व्हा! 18 म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणासांचे मांस तुम्हांलाखावयाला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र व गुलाम, लहान व थोर अशा सर्व लोकांचेमांस तुम्हांला खावयाला मिळेल.” 19 मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वारबरोबर व त्याच्यासैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते. 20 त्या श्र्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्यासंदेष्ट्याने चमत्कार केले होते, त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणित्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार दाखवून फसविले, त्या दोघांना (प्राणी आणिखोटा संदेष्टा यांना) धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले. 21 शिल्लक राहीलेलेसैन्य, घोडेस्वाराच्या तोंडामधून निघालेल्या तरवारीने ठार मारण्यात आले. आणि साऱ्या पक्ष्यांनी त्या सैनिकांचे मांस पोटभरखाल्ले.
1 यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते:“हालेलुया! तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत .::. 2 कारण त्याचे न्यायनिवाडे खरे आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली,तिला देवाने शिक्षा केली आहे. त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.” .::. 3 ते पुन्हा म्हणाले,“हालेलुया! तिच्यापासून निघालेला धूर अनंतकाळ वर जातो.” .::. 4 मग चोवीस वडीलजन आणि चार जिवंत प्राणी जो देव सिंहासनावर बसला आहे त्याच्या पाया पडले व त्यांनी त्याचीउपासना केली. ते म्हणाले:“आमेन, हालेलुया!” .::. 5 मग सिंहासनावरुन एक वाणी झाली, ती म्हणाली,“देवाच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुति करा, जे तुम्ही त्याचे भय धरता ते तुम्ही सर्व लहानथोर देवाची स्तुति करा!” .::. 6 नंतर मोठ्या लोकसमुदायाच्या गर्जनेसारखा आवाज मी ऐकला, तो आवाज महापूराच्या आणि मेघांच्या मोठयागडगडाटासारखा होता. तो लोकसमुदास असे मोठ्याने म्हणत होता की:“हालेलुया! कारण आमच्या सर्वसमर्थ देवाने सत्ता गाजविण्यास सुरुवात केली आहे. .::. 7 आपण उल्हास करु व आनंदात राहू! आणि त्याचे गौरव करु कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे. आणि त्याच्यावधूने स्वत:ला नटवून तयार केले आहे .::. 8 तिला स्वच्छ, चमकणारे तागाचे कपडे नेसायला दिले आहेत.”(देवाच्या पवित्र लोकांनी केलेली नीतीमत्त्वाची कामे म्हणजेच तलम तागाचे कपडे आहेत) .::. 9 नंतर तो देवदूत मला म्हणाला, “हे लिही, ज्यांना कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले आहे, ते धन्य!” तोमला म्हणाला, “हे देवाचे खरेखुरे शब्द आहेत.” .::. 10 यावर मी देवदूताच्या पायावर डोके ठेवून त्याची उपासना करु लागलो; परंतु देवदूत म्हणाला, “असे करु नको, मी तरतुझ्याबरोबरीचा आणि येशूच्या सत्याबाबत साक्ष देण्याची जबाबदारी तुझ्या ज्या भावांवर आहे, त्यांच्या बरोबरीचा एक सेवकमात्र आहे. देवाची उपासना कर! येशूच्या सत्याचे शिक्षण देणे हाच देवाच्या संदेशाचा आत्मा आहे.” .::. 11 नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला; आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे‘नाव विश्वासू आणि खरा’ असे होते; कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. .::. 12 त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुगुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिलेआहे. ते नाव काय आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही. .::. 13 त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेलाझगा घातला होता. त्या स्वाराचे नाव “देवाचा शब्द” असे आहे. .::. 14 स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्यपांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते. .::. 15 त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते जिच्याने तो राष्ट्रांना नमवील,आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सता गाजवील. सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडवील. .::. 16 त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे: .::. 17 नंतर सूर्यात उभा राहिलेला एक देवदूत मी पाहिला. तो मोठ्याने ओरडून आकाशामध्ये उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना म्हणतहोता, “या! देवाच्या महान मेजवानीसाठी जमा व्हा! .::. 18 म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणासांचे मांस तुम्हांलाखावयाला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र व गुलाम, लहान व थोर अशा सर्व लोकांचेमांस तुम्हांला खावयाला मिळेल.” .::. 19 मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वारबरोबर व त्याच्यासैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते. .::. 20 त्या श्र्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्यासंदेष्ट्याने चमत्कार केले होते, त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणित्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार दाखवून फसविले, त्या दोघांना (प्राणी आणिखोटा संदेष्टा यांना) धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले. .::. 21 शिल्लक राहीलेलेसैन्य, घोडेस्वाराच्या तोंडामधून निघालेल्या तरवारीने ठार मारण्यात आले. आणि साऱ्या पक्ष्यांनी त्या सैनिकांचे मांस पोटभरखाल्ले.
  • प्रकटीकरण धडा 1  
  • प्रकटीकरण धडा 2  
  • प्रकटीकरण धडा 3  
  • प्रकटीकरण धडा 4  
  • प्रकटीकरण धडा 5  
  • प्रकटीकरण धडा 6  
  • प्रकटीकरण धडा 7  
  • प्रकटीकरण धडा 8  
  • प्रकटीकरण धडा 9  
  • प्रकटीकरण धडा 10  
  • प्रकटीकरण धडा 11  
  • प्रकटीकरण धडा 12  
  • प्रकटीकरण धडा 13  
  • प्रकटीकरण धडा 14  
  • प्रकटीकरण धडा 15  
  • प्रकटीकरण धडा 16  
  • प्रकटीकरण धडा 17  
  • प्रकटीकरण धडा 18  
  • प्रकटीकरण धडा 19  
  • प्रकटीकरण धडा 20  
  • प्रकटीकरण धडा 21  
  • प्रकटीकरण धडा 22  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References