मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
गीतरत्न

गीतरत्न धडा 6

1 सुंदर स्त्रिये! तुझा प्रियकर कुठे गेला आहे? आम्हाला सांग म्हणजे आम्ही त्याला शोधण्यात तुला मदत करु शकू. 2 माझा प्रियकर त्याच्या बागेत गेला. मसाल्याच्या फुलांच्या ताटव्यात गेला. तो बागेत खाऊ घालायला आणि कमलपुष्पे गोळा करायला गेला. 3 मी माझ्या प्रियकराची आहे. तो माझा आहे. कमलपुष्पात खाऊ घालणारा तोच माझा प्रियकर आहे. 4 प्रिये तू तिरझा नगरीप्रमाणे सुंदर आहेस. यरुशलेमसारखी आल्हाददायक आहेस आणि तटबंदी असलेल्या शहरासारखी भयंकर आहेस. 5 माझ्याकडे बघू नकोस! तुझे डोळे मला उद्दीपित करतात. लहान बकऱ्या गिलाद पर्वताच्या उतरावरुन नाचत खाली जातात तसे तुझे केस लांब आणि मोकळे आहेत. 6 तुझे दात नुकत्याच आंघोळ करुन आलेल्या बकरीसारखे पांढरे शुभ्र आहेत. त्या सगळ्या जुळ्यांना जन्म देतात आणि त्यांच्यापैकी एकीचेही बछडे दगावलेले नाही. 7 बुरख्याखाली असलेली तुझी कानशिले डाळींबाच्या फोडींसारखी आहेत. 8 तिथे कदचित 60 राण्या आणि 80 दासीअसतील आणि तरुण स्त्रिया अगणित असतील. 9 पण माझ्यासाठी मात्र फक्त एकच स्त्री आहे. माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट स्त्री. ति तिच्या आईची लाडकी आहे. आईचे सगळ्यात आवडते अपत्य आहे. तरुण स्त्रिया तिला पाहतात आणि तिची स्तुती करतात. राण्या आणि दासीसुध्दा तिची स्तुती करतात. 10 ती तरुण स्त्री कोण आहे? ती पहाटेप्रमाणे चमकते आहे, ती चंद्रासारखी सुंदर आहे. सूर्यासारखी तेजस्वी आहे आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. 11 मी आक्रोडाच्या राईतून दरीतली फळे बघायला गेले. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत का, डाळींबाना कळ्या आल्या आहेत का, ते बघायला गेले. 12 मला काही कळायच्या आतच माझ्या आत्म्याने मला राजाच्या लोकरथात ठेवले. 13 शुलामिथ, परत ये, परत ये. म्हणजे आम्ही तुला बघू शकू, ती म्हानेम नाच करीत असताना टक लावून का तू शुलमिथकडे पहात आहेस?
1 सुंदर स्त्रिये! तुझा प्रियकर कुठे गेला आहे? आम्हाला सांग म्हणजे आम्ही त्याला शोधण्यात तुला मदत करु शकू. .::. 2 माझा प्रियकर त्याच्या बागेत गेला. मसाल्याच्या फुलांच्या ताटव्यात गेला. तो बागेत खाऊ घालायला आणि कमलपुष्पे गोळा करायला गेला. .::. 3 मी माझ्या प्रियकराची आहे. तो माझा आहे. कमलपुष्पात खाऊ घालणारा तोच माझा प्रियकर आहे. .::. 4 प्रिये तू तिरझा नगरीप्रमाणे सुंदर आहेस. यरुशलेमसारखी आल्हाददायक आहेस आणि तटबंदी असलेल्या शहरासारखी भयंकर आहेस. .::. 5 माझ्याकडे बघू नकोस! तुझे डोळे मला उद्दीपित करतात. लहान बकऱ्या गिलाद पर्वताच्या उतरावरुन नाचत खाली जातात तसे तुझे केस लांब आणि मोकळे आहेत. .::. 6 तुझे दात नुकत्याच आंघोळ करुन आलेल्या बकरीसारखे पांढरे शुभ्र आहेत. त्या सगळ्या जुळ्यांना जन्म देतात आणि त्यांच्यापैकी एकीचेही बछडे दगावलेले नाही. .::. 7 बुरख्याखाली असलेली तुझी कानशिले डाळींबाच्या फोडींसारखी आहेत. .::. 8 तिथे कदचित 60 राण्या आणि 80 दासीअसतील आणि तरुण स्त्रिया अगणित असतील. .::. 9 पण माझ्यासाठी मात्र फक्त एकच स्त्री आहे. माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट स्त्री. ति तिच्या आईची लाडकी आहे. आईचे सगळ्यात आवडते अपत्य आहे. तरुण स्त्रिया तिला पाहतात आणि तिची स्तुती करतात. राण्या आणि दासीसुध्दा तिची स्तुती करतात. .::. 10 ती तरुण स्त्री कोण आहे? ती पहाटेप्रमाणे चमकते आहे, ती चंद्रासारखी सुंदर आहे. सूर्यासारखी तेजस्वी आहे आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. .::. 11 मी आक्रोडाच्या राईतून दरीतली फळे बघायला गेले. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत का, डाळींबाना कळ्या आल्या आहेत का, ते बघायला गेले. .::. 12 मला काही कळायच्या आतच माझ्या आत्म्याने मला राजाच्या लोकरथात ठेवले. .::. 13 शुलामिथ, परत ये, परत ये. म्हणजे आम्ही तुला बघू शकू, ती म्हानेम नाच करीत असताना टक लावून का तू शुलमिथकडे पहात आहेस?
  • गीतरत्न धडा 1  
  • गीतरत्न धडा 2  
  • गीतरत्न धडा 3  
  • गीतरत्न धडा 4  
  • गीतरत्न धडा 5  
  • गीतरत्न धडा 6  
  • गीतरत्न धडा 7  
  • गीतरत्न धडा 8  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References