मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
निर्गम

निर्गम धडा 30

1 देव मोशेला म्हणाला, “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी करावी. 2 ती चौरस असावी; ती आठरा इंचलांब व आठरा इंच रुंद असावी, आणि ती छत्तीस इंचउंच असावी; तिच्या चारही कोपऱ्यांना शिंगे असावीत; ती वेदीच्या एकाच अखंड लाकडाची करावी. 3 वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि वेदीभोवती सोन्याचा कंगोरा करावा. 4 त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकींच्या विरुद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल. 5 हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करुन ते सोन्याने मढवावेत. 6 वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; ह्याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन. 7 “अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर संगधी धूप जाळावा; 8 पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळावा. 9 तिच्यावर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा धूप जाळू नये किंवा हव्य अर्पण करू नये; तसेच अन्नार्पण किंवा पेयार्पण अर्पण करू नये. 10 “अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणातील रक्त घेऊन ते वेदीवर अर्पण करावे. ह्या दिवसाला ‘प्रायश्चित दिवस’ म्हणावे. हे परमेश्वरासाठी परम पवित्र आहे.” 11 परमेश्वर मोशेला म्हणाला, 12 “एकूण इस्राएल लोक किती आहेत याची तुला माहिती असावी म्हणून तू त्यांची शिरगणती करावीस; अशा प्रत्येक शिरगणतीच्या वेळी प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा; जो कोणी असा खंड देईल त्याच्यावर भयंकर संकट येणार नाही. 13 शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएल व्यक्तिने पवित्र निवास मंडपातील अधिकृत मापाने अर्धा शेकेल खंडणी द्यावी. (एका शेकेलाचे वजन वीस ‘गेरा’ असते) हा अर्धा शेकेल म्हणजे परमेश्वराला दिलेले अर्पण होय. 14 वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएली माणसाने परमेश्वराला हे अर्पण करावे. 15 श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; सर्व जणांनी परमेश्वराला सारखेच अर्पण करावे; हे तुम्हाला आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्ताची खंडणी असे होईल. 16 हा पैसा इस्राएल लोकांकडून गोळा करावा आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा म्हणजे परमेश्वराला आपल्या लोकांची आठवण राहण्याचा एक मार्ग होईल; लोक आपल्या जिवाबद्दल खंडणी देत राहतील.” 17 परमेश्वर मोशेला म्हणाला, 18 “पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हात पाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे. 19 या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात पाय धुवावेत; 20 दर्शनमंडपात व वेदीजवळ जाताना प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात पाय धुवावेत; असे केल्यास ते मरणार नाहीत. 21 त्यांनी आपले हात पाय धुतलेच पाहिजेत नाहीतर ते मरतील; हा अहरोन व त्याच्या लोकांसाठी कायमचा नियम होय; अहरोनाच्या मागे त्याच्या पुत्रपौत्रांसाठी पिढ्यान्पिढ्या हा नियम लागू राहील.” 22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 23 “उत्तमात उत्तम मसाले घे; अधिकृत मापाप्रमाणे बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे सहा पौंड म्हणजेच अडीचशे शेकेल सुंगधी दालचिनी, बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल सुंगधी बच. 24 आणि बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतुनाचे तेल घे. 25 “व या सर्वाच्या मिश्रणाने अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर; 26 हे पवित्र तेल दर्शन मंडपावर व आज्ञापटाच्या कोशावर ओतून त्यांना पवित्र कर; या गोष्टींना विशेष महत्व आहे हे यावरून दिसून येईल. 27 तसेच मेज व त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी, 28 तसेच होमवेदी व तिचे सर्वसामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यांसर्वावर तेल ओतावे. 29 त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमेश्वराला परमपवित्र होतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल. 30 “अहरोन व त्याच्या मुलांना तेलाचा अभिषेक कर म्हणजे ते पवित्र होतील. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; 31 इस्राएल लोकांना तू सांग की अभिषेकाचे तेल पवित्र आहे, पिढ्यान्पिढ्या ते केवळ माझ्यासाठीच वापरावे. 32 ह्या तेलाचा, ते साधे सुवासिक तेल असल्यासारखा कोणीही वापर करु नये; हे पवित्र तेल ज्याप्रकारे तयार केले तसे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्हालाही ते अगदी पवित्रच वाटले पाहिजे. 33 ह्या पवित्र तेलासारखे सुवासिक तेल जर कोणी तयार करील किंवा ते कोणा परकीयाला देईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.” 34 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधा बिरूजा व शुद्ध धूप आणावेस. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात; 35 आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून त्यांचे सुवासिक धूप द्रव्य तयार करावे; तसेच त्यात मीठमिसळावे म्हणजे ते मिश्रण केलेल धूप द्रव्य शुद्ध व पवित्र होईल. 36 त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शन मंडपात पवित्र करारापुढे ठेवावे; ह्याच कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन; हे चूर्ण तुम्ही परमपवित्र लेखाचे. 37 या धूपद्रव्याचा फक्त परमेश्वरासाठीच उपयोग करावा; त्याच्या सारखे दुसरे धूप द्रव्य तुम्ही करु नये. 38 सुवासाचा आनंद घ्यावा म्हणून कोणी आपल्या स्वत:साठी असे धूप द्रव्य तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
1. देव मोशेला म्हणाला, “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी करावी. 2. ती चौरस असावी; ती आठरा इंचलांब व आठरा इंच रुंद असावी, आणि ती छत्तीस इंचउंच असावी; तिच्या चारही कोपऱ्यांना शिंगे असावीत; ती वेदीच्या एकाच अखंड लाकडाची करावी. 3. वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि वेदीभोवती सोन्याचा कंगोरा करावा. 4. त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकींच्या विरुद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल. 5. हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करुन ते सोन्याने मढवावेत. 6. वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; ह्याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन. 7. “अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर संगधी धूप जाळावा; 8. पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळावा. 9. तिच्यावर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा धूप जाळू नये किंवा हव्य अर्पण करू नये; तसेच अन्नार्पण किंवा पेयार्पण अर्पण करू नये. 10. “अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणातील रक्त घेऊन ते वेदीवर अर्पण करावे. ह्या दिवसाला ‘प्रायश्चित दिवस’ म्हणावे. हे परमेश्वरासाठी परम पवित्र आहे.” 11. परमेश्वर मोशेला म्हणाला, 12. “एकूण इस्राएल लोक किती आहेत याची तुला माहिती असावी म्हणून तू त्यांची शिरगणती करावीस; अशा प्रत्येक शिरगणतीच्या वेळी प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा; जो कोणी असा खंड देईल त्याच्यावर भयंकर संकट येणार नाही. 13. शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएल व्यक्तिने पवित्र निवास मंडपातील अधिकृत मापाने अर्धा शेकेल खंडणी द्यावी. (एका शेकेलाचे वजन वीस ‘गेरा’ असते) हा अर्धा शेकेल म्हणजे परमेश्वराला दिलेले अर्पण होय. 14. वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएली माणसाने परमेश्वराला हे अर्पण करावे. 15. श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; सर्व जणांनी परमेश्वराला सारखेच अर्पण करावे; हे तुम्हाला आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्ताची खंडणी असे होईल. 16. हा पैसा इस्राएल लोकांकडून गोळा करावा आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा म्हणजे परमेश्वराला आपल्या लोकांची आठवण राहण्याचा एक मार्ग होईल; लोक आपल्या जिवाबद्दल खंडणी देत राहतील.” 17. परमेश्वर मोशेला म्हणाला, 18. “पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हात पाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे. 19. या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात पाय धुवावेत; 20. दर्शनमंडपात व वेदीजवळ जाताना प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात पाय धुवावेत; असे केल्यास ते मरणार नाहीत. 21. त्यांनी आपले हात पाय धुतलेच पाहिजेत नाहीतर ते मरतील; हा अहरोन व त्याच्या लोकांसाठी कायमचा नियम होय; अहरोनाच्या मागे त्याच्या पुत्रपौत्रांसाठी पिढ्यान्पिढ्या हा नियम लागू राहील.” 22. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 23. “उत्तमात उत्तम मसाले घे; अधिकृत मापाप्रमाणे बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे सहा पौंड म्हणजेच अडीचशे शेकेल सुंगधी दालचिनी, बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल सुंगधी बच. 24. आणि बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतुनाचे तेल घे. 25. “व या सर्वाच्या मिश्रणाने अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर; 26. हे पवित्र तेल दर्शन मंडपावर व आज्ञापटाच्या कोशावर ओतून त्यांना पवित्र कर; या गोष्टींना विशेष महत्व आहे हे यावरून दिसून येईल. 27. तसेच मेज व त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी, 28. तसेच होमवेदी व तिचे सर्वसामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यांसर्वावर तेल ओतावे. 29. त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमेश्वराला परमपवित्र होतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल. 30. “अहरोन व त्याच्या मुलांना तेलाचा अभिषेक कर म्हणजे ते पवित्र होतील. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; 31. इस्राएल लोकांना तू सांग की अभिषेकाचे तेल पवित्र आहे, पिढ्यान्पिढ्या ते केवळ माझ्यासाठीच वापरावे. 32. ह्या तेलाचा, ते साधे सुवासिक तेल असल्यासारखा कोणीही वापर करु नये; हे पवित्र तेल ज्याप्रकारे तयार केले तसे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्हालाही ते अगदी पवित्रच वाटले पाहिजे. 33. ह्या पवित्र तेलासारखे सुवासिक तेल जर कोणी तयार करील किंवा ते कोणा परकीयाला देईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.” 34. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधा बिरूजा व शुद्ध धूप आणावेस. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात; 35. आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून त्यांचे सुवासिक धूप द्रव्य तयार करावे; तसेच त्यात मीठमिसळावे म्हणजे ते मिश्रण केलेल धूप द्रव्य शुद्ध व पवित्र होईल. 36. त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शन मंडपात पवित्र करारापुढे ठेवावे; ह्याच कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन; हे चूर्ण तुम्ही परमपवित्र लेखाचे. 37. या धूपद्रव्याचा फक्त परमेश्वरासाठीच उपयोग करावा; त्याच्या सारखे दुसरे धूप द्रव्य तुम्ही करु नये. 38. सुवासाचा आनंद घ्यावा म्हणून कोणी आपल्या स्वत:साठी असे धूप द्रव्य तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
  • निर्गम धडा 1  
  • निर्गम धडा 2  
  • निर्गम धडा 3  
  • निर्गम धडा 4  
  • निर्गम धडा 5  
  • निर्गम धडा 6  
  • निर्गम धडा 7  
  • निर्गम धडा 8  
  • निर्गम धडा 9  
  • निर्गम धडा 10  
  • निर्गम धडा 11  
  • निर्गम धडा 12  
  • निर्गम धडा 13  
  • निर्गम धडा 14  
  • निर्गम धडा 15  
  • निर्गम धडा 16  
  • निर्गम धडा 17  
  • निर्गम धडा 18  
  • निर्गम धडा 19  
  • निर्गम धडा 20  
  • निर्गम धडा 21  
  • निर्गम धडा 22  
  • निर्गम धडा 23  
  • निर्गम धडा 24  
  • निर्गम धडा 25  
  • निर्गम धडा 26  
  • निर्गम धडा 27  
  • निर्गम धडा 28  
  • निर्गम धडा 29  
  • निर्गम धडा 30  
  • निर्गम धडा 31  
  • निर्गम धडा 32  
  • निर्गम धडा 33  
  • निर्गम धडा 34  
  • निर्गम धडा 35  
  • निर्गम धडा 36  
  • निर्गम धडा 37  
  • निर्गम धडा 38  
  • निर्गम धडा 39  
  • निर्गम धडा 40  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References