मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यहेज्केल

Notes

No Verse Added

यहेज्केल धडा 15

1 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, .::. 2 “मानवपुत्रा, रानातील झाडांच्या लहान लहान फांद्यांपेक्षा द्राक्षवेलींचे तुकडे चांगले का? नाही. .::. 3 द्राक्षवेलीच्या लाकडाचा कशासाठी उपयोग होतो का? नाही. ताटल्या अडकवून ठेवण्यासाठी त्याच्यापासून खुंट्या बनविता येतात का? नाही. .::. 4 लोक त्या लाकडाला फक्त आगीत टाकतात, काही काटक्या टोकाकडून जळू लागतात, मध्यावर काळ्या पडतात, पण त्या काही पूर्णपणे जळत नाहीत. त्या जळक्या काटक्यांचा काही उपयोग आहे का? .::. 5 ते लाकूड जळण्यापूर्वी जर तुम्ही त्या लाकडाचा उपयोग करु शकत नसाल, तर ते लाकूड जळल्यावर नक्कीच त्याचा काही उपयोग होणार नाही. .::. 6 म्हणजेच द्राक्षवेलींच्या काटक्या ह्या रानातल्या झाडांच्या फांद्याप्राणेच आहेत. लोक त्या विस्तवात टाकतात आणि त्या जळून जातात. त्याचप्रमाणे, यरुशलेमच्या लोकांना मी आगीत टाकीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला, .::. 7 “मी त्या लोकांना शिक्षा करीन. पण काही लोक त्या अर्धवट जळालेल्या काटक्यांप्रमाणे असतील. त्यांना शिक्षा होईल. पण त्यांचा संपूर्ण नाश होणार नाही. ‘मीच त्यांना शिक्षा केली’ हे तुम्हाला दिसून येईल व मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे. .::. 8 त्या लोकांनी खोट्या देवांसाठी माझा त्याग केला, म्हणून मी त्या देशाचा नाश करीन.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या
  • यहेज्केल धडा 1  
  • यहेज्केल धडा 2  
  • यहेज्केल धडा 3  
  • यहेज्केल धडा 4  
  • यहेज्केल धडा 5  
  • यहेज्केल धडा 6  
  • यहेज्केल धडा 7  
  • यहेज्केल धडा 8  
  • यहेज्केल धडा 9  
  • यहेज्केल धडा 10  
  • यहेज्केल धडा 11  
  • यहेज्केल धडा 12  
  • यहेज्केल धडा 13  
  • यहेज्केल धडा 14  
  • यहेज्केल धडा 15  
  • यहेज्केल धडा 16  
  • यहेज्केल धडा 17  
  • यहेज्केल धडा 18  
  • यहेज्केल धडा 19  
  • यहेज्केल धडा 20  
  • यहेज्केल धडा 21  
  • यहेज्केल धडा 22  
  • यहेज्केल धडा 23  
  • यहेज्केल धडा 24  
  • यहेज्केल धडा 25  
  • यहेज्केल धडा 26  
  • यहेज्केल धडा 27  
  • यहेज्केल धडा 28  
  • यहेज्केल धडा 29  
  • यहेज्केल धडा 30  
  • यहेज्केल धडा 31  
  • यहेज्केल धडा 32  
  • यहेज्केल धडा 33  
  • यहेज्केल धडा 34  
  • यहेज्केल धडा 35  
  • यहेज्केल धडा 36  
  • यहेज्केल धडा 37  
  • यहेज्केल धडा 38  
  • यहेज्केल धडा 39  
  • यहेज्केल धडा 40  
  • यहेज्केल धडा 41  
  • यहेज्केल धडा 42  
  • यहेज्केल धडा 43  
  • यहेज्केल धडा 44  
  • यहेज्केल धडा 45  
  • यहेज्केल धडा 46  
  • यहेज्केल धडा 47  
  • यहेज्केल धडा 48  
×

Alert

×

marathi Letters Keypad References