मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
नीतिसूत्रे

Notes

No Verse Added

नीतिसूत्रे धडा 27

1 भविष्यात काय घडेल याबद्दलच्या फुशारक्या मारु नका. उद्या काय घडेल ते तुम्हाला माहीत नसते. .::. 2 स्वत:चीच स्तुती कधीही करु नका. ती दुसऱ्यांना करु द्या. .::. 3 दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वाहून न्यायला कठीण असते. पण मूर्खांनी आणलेली संकटे सहन करणे या दोन्ही पेक्षा कठीण असते. .::. 4 राग क्रूर आणि नीच असतो त्यामुळे सर्वनाश होतो. पण मत्सर त्याहीपेक्षा वाईट असतो. .::. 5 उघड टीका ही गुप्त प्रेमापेक्षा चांगली असते. .::. 6 मित्र तुम्हाला कधीतरी दु:ख देईल पण त्याची तसे करायची इच्छा नसते. शत्रू वेगळा असतो. शत्रू जरी तुमच्याशी कधी दयाबुध्दीने वागला तरी त्याला तुम्हाला दु:ख द्यायचीच इच्छा असते. .::. 7 तुम्हाला जर भूक नसेल तर तुम्ही मधदेखील खाणार नाही. पण जर तुम्ही भुकेले असाल तर तुम्ही काहीही खाल. ते चवीला वाईट असले तरीही. .::. 8 घरापासून दूर असलेला माणूस म्हणजे घरट्यापासून दूर असलेला पक्षी. .::. 9 अत्तर आणि गोड वास असलेल्या वस्तू तुम्हाला आनंद देतात. पण संकटे तुमच्या मनाची शांती घालवतात. .::. 10 तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या मित्रांना विसरु नका. आणि तुम्ही संकटात असाल तर मदतीसाठी दूरच्या तुमच्या भावाच्या घरी जाऊ नका. जवळच्या शेजाऱ्याला विचारणे हे दूरवरच्या तुमच्या भावाकडे जाण्यापेक्षा चांगले असते. .::. 11 मुला शहाणा हो. त्यामुळे मला आनंद वाटेल. नंतर जो कुणी माझ्यावर टीका करेल त्याला मी उत्तर देऊ शकेन. .::. 12 शहाण्या लोकांना संकटांचा सुगावा लागला आणि ते त्यांच्या मार्गांतून बाजूला होतात. पण मूर्ख सरळ संकटात जातात आणि त्यामुळे दु:खी होतात. .::. 13 जर तुम्ही दुसऱ्याच्या कर्जाबद्दल स्वत: जामीन राहिलात तर तुम्हाला तुमचे कपडेदेखील गमवावे लागतील. .::. 14 “सुप्रभात” च्या आरोळीने तुमच्या शेजाऱ्याला भल्या पहाटे उठवू नका. तो त्याला आशीर्वादाऐवजी शाप समजेल. .::. 15 सतत वाद घालण्याची इच्छी धरणारी बायको पावसाळ्याच्या दिवसात सतत गळणाऱ्या दिवसात सतत गळणाऱ्या पाण्यासारखी असते. .::. 16 त्या बाईला थांबवणे हे वाऱ्याला थांबवण्यासारखे आहे. हाताने तेल पकडण्यासारखे असते. .::. 17 लोखंडाच्या सुरीला धार करण्यासाठी लोखंडाचेच तुकडे वापरतात. त्याचप्रमाणे लोक एकमेकांना धारदार बनविणे एकमेकापासूनच शिकतात. .::. 18 जो माणूस अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याची फळे खाऊ शकतो. तसेच जो माणूस त्याच्या धन्याची काळजी घेतो त्याला बक्षीस मिळते. त्याचा मालक त्याची काळजी घेईल. .::. 19 माणसाने पाण्यात पाहिले तर त्याला स्वत:चा चेहरा दिसेल. त्याचप्रमाणे माणसाचे हृदय तो माणूस खरा कसा आहे ते दाखविते. .::. 20 मृतलोक आणि नाश ह्यांची कधीही तृप्ती होत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या डोळ्यांतील वासना कधी शमत नाही. .::. 21 सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी लोक अग्नीचा वापर करतात. त्याच रीतीने माणसाची परीक्षा लोक त्याची स्तुती करतात त्यावरुन होते. .::. 22 मूर्खाला दळून तुम्ही त्याचे पीठ केले तरी त्याचा मूर्खपणा तुम्ही घालवू शकणार नाही. .::. 23 तुमच्या मेंढ्यांची आणि पशुधनाची काळजी घ्या. त्यांची तुम्ही उत्तम प्रकारे निगा राखत आहात याची खात्री करा. .::. 24 संपत्ती कायम टिकत नाही. राष्ट्रेसुध्दा कायम राहात नसतात. .::. 25 गवत कापल्यानंतर पुन्हा नवीन उगवते. टेकडीवर उगवणारे गवत कापा. .::. 26 तुमच्या मेंढ्यांवरची लोकर कापा आणि तुमचे कपडे करा. तुमच्या काही बकऱ्या विका आणि जमीन विकत घ्या. .::. 27 तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शेळीचे बरेच दूध असेल. त्यामुळे तुमच्या सेवकमुली निरोगी राहतील.
  • नीतिसूत्रे धडा 1  
  • नीतिसूत्रे धडा 2  
  • नीतिसूत्रे धडा 3  
  • नीतिसूत्रे धडा 4  
  • नीतिसूत्रे धडा 5  
  • नीतिसूत्रे धडा 6  
  • नीतिसूत्रे धडा 7  
  • नीतिसूत्रे धडा 8  
  • नीतिसूत्रे धडा 9  
  • नीतिसूत्रे धडा 10  
  • नीतिसूत्रे धडा 11  
  • नीतिसूत्रे धडा 12  
  • नीतिसूत्रे धडा 13  
  • नीतिसूत्रे धडा 14  
  • नीतिसूत्रे धडा 15  
  • नीतिसूत्रे धडा 16  
  • नीतिसूत्रे धडा 17  
  • नीतिसूत्रे धडा 18  
  • नीतिसूत्रे धडा 19  
  • नीतिसूत्रे धडा 20  
  • नीतिसूत्रे धडा 21  
  • नीतिसूत्रे धडा 22  
  • नीतिसूत्रे धडा 23  
  • नीतिसूत्रे धडा 24  
  • नीतिसूत्रे धडा 25  
  • नीतिसूत्रे धडा 26  
  • नीतिसूत्रे धडा 27  
  • नीतिसूत्रे धडा 28  
  • नीतिसूत्रे धडा 29  
  • नीतिसूत्रे धडा 30  
  • नीतिसूत्रे धडा 31  
×

Alert

×

marathi Letters Keypad References