मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
यहेज्केल
1. परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “आंतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसांत बंद असेल. पण शब्बाथ व अमावस्या ह्या दिवशी ते उघडले जाईल.
2. राजा, त्या दाराच्या द्वारमंडपापासून आता जाऊन दाराच्या खांबाशी उभा राहील. मग याजक त्याच्यासाठी होमार्मण व शांत्यर्पण करील. राजा दाराच्या उंबऱ्यात उपासना करील मग तो बाहेर जाईल. पण दार संध्याकाळशिवाय बंद होणार नाही.
3. देशातील लोकही शब्बाथ व नवचंद्रदिनी ह्या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करतील.
4. “शब्बाथच्या दिवशी राजा होमार्पण करील. त्याने सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा हे दिलेच पाहिजेत.
5. त्याने मेंढ्याबरोबर एक एफ (1/2बुशेल) धान्य दिले पाहिजे. कोकरांबरोबर त्याने शक्य असेल तेवढे धान्य द्यावे. प्रत्येक एक एक (12बुशेल) धान्याबरोबर त्याने 1 हीन (1 गॅलन) तेल दिले पाहिजे.
6. “नवचंद्रदिनी पहिल्या दिवशी त्याने एक निर्दोष गोऱ्हा दिला पाहिजे. तसेच त्याने सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा द्यावा.
7. त्याने बैल व मेंढा ह्यांच्याबरोबर प्रत्येकी एक एफ (1/2बुशेल) धान्य द्यावे. कोकरांबरोबर त्याने, त्याला शक्य असेल तेवढे धान्य द्यावे. मात्र प्रत्येक एफ बोरबर (1/2ुशेल बरोबर) 1 हीन (गॅलन) तेल द्यावे.
8. “राजाने पूर्वद्वाराच्या द्वारमंडपापासून मंदिरात ये-जा केली पाहिजे.
9. “खास सणांच्या वेळी देशातील लोक परमेश्वरापाशी येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. प्रत्येकाने सरळ दिशेनेच गेले पाहिजे.
10. जेव्हा लोक आत जातील, तेव्हा राजा आता जाईल व जेव्हा लोक बाहेर येतील, तेव्हा राजा बाहेर येईल.
11. “सणांच्या आणि विशेष सभांच्या वेळी, गोह्याबरोबर 1 एफ (1/2 बुशेल) धान्य दिलेच पाहिजे. तसेच प्रत्येक मेंढ्याबरोबरही 1 एफ (1/2 बुशेल) धान्य द्यायला हवे. कोकराबरोबर राजाने इच्छेप्रमाणे द्यावे मात्र 1 एफ (1/2 बुशेल) धान्याबरोबर 1 हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे.
12. “जेव्हा राजा स्वसंतोष अर्पण परमेश्वरासाठी करील (कदाचित् ते होमार्पण असेल वा कदाचित् शांत्यर्पण असेल किंवा स्वसंतोषदर्शक असेल.) तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडले जाईल. मग शब्बाथच्या दिवसाप्रमाणे तो अर्पण करील. तो जाताच, दार लावून घेण्यात येईल.
13. “परमेश्वराला होमार्पण म्हणून रोज तुम्ही एक वर्षांचे निर्दोष कोकरु द्यावे, रोज सकाळी ते द्यावे.
14. आणखी रोज सकाळी कोकराबरोबर तुम्ही धान्यार्पण अर्पण करावे, तुम्ही त्यासाठी 1/6 एफ पीठ व हे पीठ चांगले भिजण्यासाठी 1/3 हीन (1 गॅलन) तेल द्यावे. हे परमेश्वरासाठी रोज करावयाचे धान्यार्पण असेल.
15. होमार्पणासाठी लोक कोकरु, धान्यार्पण व तेल रोज सकाळी कायम देतील.”
16. परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “जर राजाने आपल्या मालकीच्या जमिनीचा भाग, भेट म्हणून आपल्या एखाद्या मुलाला दिला, तर तो त्या मुलाच्या मालकीचा होईल. ती त्याची मालमत्ता होईल.
17. पण राजाने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग, आपल्या एखाद्या गुलामाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंततो त्या गुलामाचा होईल. व त्यानंतर तो राजाला परत मिळेल. फक्त राजाची मुलेच राजाकडून मिळालेला भेट ठेवू शकतील.
18. राजा कोणाही माणसाची जमीन घेणार नाही अथवा कोणालाही सक्तीने जमीन सोडायला लावणार नाही. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना दिला पाहिजे. म्हणजे माझ्या लोकांना सक्तीने जमीन सोडावी लागणार नाही.”
19. मग त्या माणसाने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. तेथे अगदी पश्र्चिमेला जागा असलेली मला दिसली.
20. तो माणूस मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवितील, धान्यार्पणे भाजतील. का? कारण मग त्यांना हा पदार्थ बाहेरच्या अंगणात नेण्याची जरुरी नाही. जेथे सामान्य लोक असतात, तेथे त्यांना ह्या पवित्र गोष्टी न्याव्या लागणार नाहीत.”
21. मग मला त्या माणसाने बाहेरच्या पटांगणात आणले. त्याने मला पटांगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. प्रत्येक कोपऱ्यात एक छोटासा चौक होता.
22. चारी कोपऱ्यात लहान चौक होते. प्रत्येक चौक 40 हात (70 फूट) लांब व 30 हात (52फूट 6 इंच) रुंद होता. चारी कोपरे सारख्या मापाचे होते.
23. चारी चौकांच्या भोवताली विटांची भिंत होती. त्या भिंतीत स्वयंपाकासाठी जागा केलेली होती.
24. तो माणूस मला म्हणाला, “ह्या येथे मंदिराचे सेवक लोकांकरिता बळी दिलेल्या प्राण्यांचा पदार्थ शिजवितील.”
Total 48 अध्याय, Selected धडा 46 / 48
1 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “आंतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसांत बंद असेल. पण शब्बाथ व अमावस्या ह्या दिवशी ते उघडले जाईल. 2 राजा, त्या दाराच्या द्वारमंडपापासून आता जाऊन दाराच्या खांबाशी उभा राहील. मग याजक त्याच्यासाठी होमार्मण व शांत्यर्पण करील. राजा दाराच्या उंबऱ्यात उपासना करील मग तो बाहेर जाईल. पण दार संध्याकाळशिवाय बंद होणार नाही. 3 देशातील लोकही शब्बाथ व नवचंद्रदिनी ह्या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करतील. 4 “शब्बाथच्या दिवशी राजा होमार्पण करील. त्याने सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा हे दिलेच पाहिजेत. 5 त्याने मेंढ्याबरोबर एक एफ (1/2बुशेल) धान्य दिले पाहिजे. कोकरांबरोबर त्याने शक्य असेल तेवढे धान्य द्यावे. प्रत्येक एक एक (12बुशेल) धान्याबरोबर त्याने 1 हीन (1 गॅलन) तेल दिले पाहिजे. 6 “नवचंद्रदिनी पहिल्या दिवशी त्याने एक निर्दोष गोऱ्हा दिला पाहिजे. तसेच त्याने सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा द्यावा. 7 त्याने बैल व मेंढा ह्यांच्याबरोबर प्रत्येकी एक एफ (12बुशेल) धान्य द्यावे. कोकरांबरोबर त्याने, त्याला शक्य असेल तेवढे धान्य द्यावे. मात्र प्रत्येक एफ बोरबर (12ुशेल बरोबर) 1 हीन (गॅलन) तेल द्यावे. 8 “राजाने पूर्वद्वाराच्या द्वारमंडपापासून मंदिरात ये-जा केली पाहिजे. 9 “खास सणांच्या वेळी देशातील लोक परमेश्वरापाशी येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. प्रत्येकाने सरळ दिशेनेच गेले पाहिजे. 10 जेव्हा लोक आत जातील, तेव्हा राजा आता जाईल व जेव्हा लोक बाहेर येतील, तेव्हा राजा बाहेर येईल. 11 “सणांच्या आणि विशेष सभांच्या वेळी, गोह्याबरोबर 1 एफ (12 बुशेल) धान्य दिलेच पाहिजे. तसेच प्रत्येक मेंढ्याबरोबरही 1 एफ (12 बुशेल) धान्य द्यायला हवे. कोकराबरोबर राजाने इच्छेप्रमाणे द्यावे मात्र 1 एफ (12 बुशेल) धान्याबरोबर 1 हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे. 12 “जेव्हा राजा स्वसंतोष अर्पण परमेश्वरासाठी करील (कदाचित् ते होमार्पण असेल वा कदाचित् शांत्यर्पण असेल किंवा स्वसंतोषदर्शक असेल.) तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडले जाईल. मग शब्बाथच्या दिवसाप्रमाणे तो अर्पण करील. तो जाताच, दार लावून घेण्यात येईल. 13 “परमेश्वराला होमार्पण म्हणून रोज तुम्ही एक वर्षांचे निर्दोष कोकरु द्यावे, रोज सकाळी ते द्यावे. 14 आणखी रोज सकाळी कोकराबरोबर तुम्ही धान्यार्पण अर्पण करावे, तुम्ही त्यासाठी 1/6 एफ पीठ व हे पीठ चांगले भिजण्यासाठी 1/3 हीन (1 गॅलन) तेल द्यावे. हे परमेश्वरासाठी रोज करावयाचे धान्यार्पण असेल. 15 होमार्पणासाठी लोक कोकरु, धान्यार्पण व तेल रोज सकाळी कायम देतील.” 16 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “जर राजाने आपल्या मालकीच्या जमिनीचा भाग, भेट म्हणून आपल्या एखाद्या मुलाला दिला, तर तो त्या मुलाच्या मालकीचा होईल. ती त्याची मालमत्ता होईल. 17 पण राजाने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग, आपल्या एखाद्या गुलामाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंततो त्या गुलामाचा होईल. व त्यानंतर तो राजाला परत मिळेल. फक्त राजाची मुलेच राजाकडून मिळालेला भेट ठेवू शकतील. 18 राजा कोणाही माणसाची जमीन घेणार नाही अथवा कोणालाही सक्तीने जमीन सोडायला लावणार नाही. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना दिला पाहिजे. म्हणजे माझ्या लोकांना सक्तीने जमीन सोडावी लागणार नाही.” 19 मग त्या माणसाने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. तेथे अगदी पश्र्चिमेला जागा असलेली मला दिसली. 20 तो माणूस मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवितील, धान्यार्पणे भाजतील. का? कारण मग त्यांना हा पदार्थ बाहेरच्या अंगणात नेण्याची जरुरी नाही. जेथे सामान्य लोक असतात, तेथे त्यांना ह्या पवित्र गोष्टी न्याव्या लागणार नाहीत.” 21 मग मला त्या माणसाने बाहेरच्या पटांगणात आणले. त्याने मला पटांगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. प्रत्येक कोपऱ्यात एक छोटासा चौक होता. 22 चारी कोपऱ्यात लहान चौक होते. प्रत्येक चौक 40 हात (70 फूट) लांब व 30 हात (52फूट 6 इंच) रुंद होता. चारी कोपरे सारख्या मापाचे होते. 23 चारी चौकांच्या भोवताली विटांची भिंत होती. त्या भिंतीत स्वयंपाकासाठी जागा केलेली होती. 24 तो माणूस मला म्हणाला, “ह्या येथे मंदिराचे सेवक लोकांकरिता बळी दिलेल्या प्राण्यांचा पदार्थ शिजवितील.”
Total 48 अध्याय, Selected धडा 46 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References