मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
1 शमुवेल
1. शमुवेल खूप म्हतारा झाला तेव्हा त्याने आपल्या मुलांना इस्राएलचे न्यायाधिश म्हणून नेमले.
2. मोठ्या मुलाचे नाव योएल आणि दुसऱ्याचे नाव अबीया. बैर-शीबा येथे राहून ते काम करु लागले.
3. पण ते त्यांच्या वडिलांसारखे वागले नाही. पैशाच्या लोभाने लाच खाऊन ते न्यानिवाड्यात फेरफार करीत. लोकांना फसवीत.
4. तेव्हा इस्राएलची सर्व वडील धारी मंडळी एकत्र जमून रामा येथे शमुवेलला भेटायला गेली.
5. शमुवेलला ते लोक म्हणाले, “तुम्ही तर वृध्द झालात. तुमच्या मुलांचे वागणे बरोबर नाही. ती तुमच्यासारखी नाहीत. तेव्हा इतर राष्ट्राप्रमाणेच आमच्यावर ही राज्यकारभार करण्यासाठी राजा नेमा.”
6. आपल्यावर शासन करण्यासाठी त्यांनी राजाची मागणी करावी हे शमुवेलला ठीक वाटले नाही. तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
7. परमेश्वर त्याला म्हणाला, “लोक म्हणतात तसे कर. त्यांनी काही तुला नाकारलेले नाही. त्यांनी माझा धिक्कार केला आहे. त्यांना मी राजा म्हणून नको आहे.
8. हे त्यांचे वागणे नेहमीचेच आहे. मी त्यांना मिसरमधून बाहेर आणले पण मला सोडून ते इतर दैवतांच्या मागे लागले. आता ते तुझ्याशीही तसेच वागत आहेत.
9. त्यांचे ऐक आणि त्यांना हवे तसे कर. पण त्या आधी त्यांना इशारा दे. राजाचा कारभार कसा असतो, तो कशी सत्ता गाजवतो ते त्यांना सांग.”
10. लोकांनी राजा मागितला, तेव्हा, शमुवेलने, परमेश्वराने सांगितले ते सर्व त्यांना ऐकवले.
11. तो म्हणाला, “राजा आपली सत्ता कशी गाजवेल ते ऐका. तुमच्या मुलांना तो तुमच्यापासून हिरावून घेईल. त्यांना बळजबरीने सैन्यात दाखल करील. रथावर, घोड्यांवर स्वार व्हायला लावून तो त्यांना युद्धाला जुंपील. तुमची मुले राजाच्या रथा पुढे रक्षक म्हणून धावतील.
12. काहीजण हजाराहजारावर तर काही पन्नास-पन्नास सैनिकांवर नायक म्हणून नेमली जातील. काही मुलं शेतीच्या कामात राबतील तर काहींना शस्त्रास्त्रे, रथाचे भाग बनविणे या कामाला लावले जाईल.
13. “राजा तुमच्या मुलींनाही कामाला लावील. अत्तरे करणे, स्वयंपाकपाणी, भटारखान्यात राबणे ही कामे त्यांच्याकडून करुन घेईल.
14. “तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे, जैतुनांच्या बागा तुमच्या कडून काढून घेऊन तो त्या आपल्या अधिकाऱ्यांच्या हवाली करील.
15. धान्यातील आणि द्राक्षांतील एकदशांश हिस्सा तुमच्या कडून घेऊन राजा आपल्या अधिकांऱ्याना आणि नोकरांना देईल.
16. तुमचे नोकर, दासी, दुभती जनावरे, गाढवे तुमच्याकडून काढून स्वत:च्या ताब्यात घेईल.
17. तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशांश हिस्साही घेईल.“तुम्ही त्याचे दास व्हाल.
18. तुमच्यावर अशी वेळ आली की मग असा राजा निवडल्याबद्दल परमेश्वराकडे गाऱ्हाणे न्याल. पण तेव्हा परमेश्वर तुमचे ऐकणार नाही.”
19. पण लोक शमुवेलचे ऐकायला तयार नव्हते ते म्हणाले, “आम्हाला राजा हवाच आहे.
20. मग आम्ही इतर राष्ट्रांच्या बरोबरीला येऊ. तो आमचे नेतृत्व करील. आमच्यासाठी लढाया करील.”
21. शमुवेलने लोकांचे ऐकून घेतले आणि परमेश्वराला त्यांचे म्हणणे जसेच्या तसे सांगितले.
22. परमेश्वर म्हणाला, “तू त्याचे ऐकायलाच हवेस. त्यांच्यावर राजा नेम.”मग शमुवेल इस्राएली लोकांना म्हणाला, “ठीक तर! तुम्हाला राजा मिळेल. आता सर्वजण आपापल्या गावी परत जा.”
Total 31 अध्याय, Selected धडा 8 / 31
1 शमुवेल खूप म्हतारा झाला तेव्हा त्याने आपल्या मुलांना इस्राएलचे न्यायाधिश म्हणून नेमले. 2 मोठ्या मुलाचे नाव योएल आणि दुसऱ्याचे नाव अबीया. बैर-शीबा येथे राहून ते काम करु लागले. 3 पण ते त्यांच्या वडिलांसारखे वागले नाही. पैशाच्या लोभाने लाच खाऊन ते न्यानिवाड्यात फेरफार करीत. लोकांना फसवीत. 4 तेव्हा इस्राएलची सर्व वडील धारी मंडळी एकत्र जमून रामा येथे शमुवेलला भेटायला गेली. 5 शमुवेलला ते लोक म्हणाले, “तुम्ही तर वृध्द झालात. तुमच्या मुलांचे वागणे बरोबर नाही. ती तुमच्यासारखी नाहीत. तेव्हा इतर राष्ट्राप्रमाणेच आमच्यावर ही राज्यकारभार करण्यासाठी राजा नेमा.” 6 आपल्यावर शासन करण्यासाठी त्यांनी राजाची मागणी करावी हे शमुवेलला ठीक वाटले नाही. तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. 7 परमेश्वर त्याला म्हणाला, “लोक म्हणतात तसे कर. त्यांनी काही तुला नाकारलेले नाही. त्यांनी माझा धिक्कार केला आहे. त्यांना मी राजा म्हणून नको आहे. 8 हे त्यांचे वागणे नेहमीचेच आहे. मी त्यांना मिसरमधून बाहेर आणले पण मला सोडून ते इतर दैवतांच्या मागे लागले. आता ते तुझ्याशीही तसेच वागत आहेत. 9 त्यांचे ऐक आणि त्यांना हवे तसे कर. पण त्या आधी त्यांना इशारा दे. राजाचा कारभार कसा असतो, तो कशी सत्ता गाजवतो ते त्यांना सांग.” 10 लोकांनी राजा मागितला, तेव्हा, शमुवेलने, परमेश्वराने सांगितले ते सर्व त्यांना ऐकवले. 11 तो म्हणाला, “राजा आपली सत्ता कशी गाजवेल ते ऐका. तुमच्या मुलांना तो तुमच्यापासून हिरावून घेईल. त्यांना बळजबरीने सैन्यात दाखल करील. रथावर, घोड्यांवर स्वार व्हायला लावून तो त्यांना युद्धाला जुंपील. तुमची मुले राजाच्या रथा पुढे रक्षक म्हणून धावतील. 12 काहीजण हजाराहजारावर तर काही पन्नास-पन्नास सैनिकांवर नायक म्हणून नेमली जातील. काही मुलं शेतीच्या कामात राबतील तर काहींना शस्त्रास्त्रे, रथाचे भाग बनविणे या कामाला लावले जाईल. 13 “राजा तुमच्या मुलींनाही कामाला लावील. अत्तरे करणे, स्वयंपाकपाणी, भटारखान्यात राबणे ही कामे त्यांच्याकडून करुन घेईल. 14 “तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे, जैतुनांच्या बागा तुमच्या कडून काढून घेऊन तो त्या आपल्या अधिकाऱ्यांच्या हवाली करील. 15 धान्यातील आणि द्राक्षांतील एकदशांश हिस्सा तुमच्या कडून घेऊन राजा आपल्या अधिकांऱ्याना आणि नोकरांना देईल. 16 तुमचे नोकर, दासी, दुभती जनावरे, गाढवे तुमच्याकडून काढून स्वत:च्या ताब्यात घेईल. 17 तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशांश हिस्साही घेईल.“तुम्ही त्याचे दास व्हाल. 18 तुमच्यावर अशी वेळ आली की मग असा राजा निवडल्याबद्दल परमेश्वराकडे गाऱ्हाणे न्याल. पण तेव्हा परमेश्वर तुमचे ऐकणार नाही.” 19 पण लोक शमुवेलचे ऐकायला तयार नव्हते ते म्हणाले, “आम्हाला राजा हवाच आहे. 20 मग आम्ही इतर राष्ट्रांच्या बरोबरीला येऊ. तो आमचे नेतृत्व करील. आमच्यासाठी लढाया करील.” 21 शमुवेलने लोकांचे ऐकून घेतले आणि परमेश्वराला त्यांचे म्हणणे जसेच्या तसे सांगितले. 22 परमेश्वर म्हणाला, “तू त्याचे ऐकायलाच हवेस. त्यांच्यावर राजा नेम.”मग शमुवेल इस्राएली लोकांना म्हणाला, “ठीक तर! तुम्हाला राजा मिळेल. आता सर्वजण आपापल्या गावी परत जा.”
Total 31 अध्याय, Selected धडा 8 / 31
×

Alert

×

Marathi Letters Keypad References