3. 3 तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.
|
7. 7 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.
|
9. 9 का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे. परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
|
10. 10 थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत. तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील.
|
12. 12 दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात. दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात.
|
19. 19 संकटाच्यावेळी चागल्या माणसांचा नाश होणार नाही. भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल.
|
20. 20 वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत आणि त्या माणसांचा नाश होणार आहे त्यांच्या दऱ्या कोरड्या पडतील आणि जळून जातील. त्यांचा संपूर्ण नाश होईल.
|
21. 21 वाईट माणूस पैसे चटक्न उसने घेतो आणि कधीही परत करीत नाही. परंतु चांगला माणूस उदारहस्ते इतरांना देतो.
|
22. 22 जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.
|
24. 24 जर सैनिक पळत पळत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल तर परमेश्वर त्याचा हात धरुन त्याला पडताना सावरतो.
|
25. 25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे. आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत.
|
26. 26 चांगला माणूस दुसऱ्यांना सढळ हाताने देतो आणि चांगल्या माणसाची मुले म्हणजे जणू ईश्वरी कृपाच असते.
|
28. 28 परमेश्वराला न्याय आवडतो. तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहात नाही. तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दालन करेल.
|
32. 32 परंतु दुष्ट लोक चांगल्यांना दु:खी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतात ते चांगल्यांना मारण्याचा प्रयत्न करतात.
|
34. 34 परमेश्वर सांगतो तसे करा परमेश्वराच्या मदतीची वाट पाहा. त्याला अनुसरा दुष्टांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्व देईल आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल.
|
38. 38 परंतु जे लोक नियम पाळत नाहीत त्यांचा नाश होईल. आणि त्यांच्या संततीला देश सोडून जाणे भाग पडेल.
|
39. 39 परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.
|
40. 40 परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो.
|