मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
नीतिसूत्रे
1. मुला, माझ्या शहाणपणाच्या शिकवणुकीकडे लक्ष दे. माझ्या समजूत निर्माण करणाऱ्या शब्दाकडे लक्ष दे.
2. नंतर तुला जगण्याचा योग्य मार्ग कळेल. तुझे शब्द तू शहाणा आहेस हे दाखवून देतील.
3. दुसन्या माणसाची बायको खूप मोहक असेल. तीच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द खूप गोड व आकर्षक असतील.
4. पण शेवटी त्यामुळे कटुता व दु:खच मिळेल. ते दु:ख विषापेक्षाही कडवट असले. आणि तलवारीपेक्षी धारदार असेल.
5. तिचे पाय मृत्यूलाच जाऊन भिडतात. ती तुला सरळ कबरेत नेईल.
6. तिच्या मागे जाऊ नकोस. तिने योग्य मार्ग सोडला आहे आणि ते तिला माहीत नाही. काळजीपूर्वक राहा. जीवनाचा योग्य मार्ग आचर.
7. मुलांनो, आता माझे ऐका. मी जे सांगतो ते विसरु नका.
8. जी स्त्री व्यभिचार करते तिच्यापासून दूर राहा. तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नका.
9. जर तुम्ही गेलात तर तुम्ही लोकांच्या मनातल्या तुमच्या विषयीच्या आदराला मुकाल. तुमचा गेलेला मान दुसरे लोक घेतील. शेवटी तुम्ही तुमच्या जीवनाला मुकाल. दुष्ट लोक ते तुमच्यापासून हिरावून घेतील.
10. तुम्हाला माहीत नसलेले लोक तुमची संपत्ती संपत्ती घेतील. तुम्ही ज्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट केलेत त्या गोष्टी ते लोक घेतील.
11. तुम्ही आयुष्याच्या शेवटी कष्टी व्हाल. तुमचे शरीर आणि मन सर्व काही नाश पावेल.
12. (12-13) नंतर तुम्ही म्हणाल, “मी माझ्या आई - वडिलांचे का ऐकले नाही? मी शिस्त पाळायला नकार दिला. मी सुधारायला नकार दिला.
13.
14. आता शेवटी मला दिसते की माझे आयुष्य वाया गेले आहे. आणि सगळ्या लोकांना माझी लाज दिसते आहे.”
15. (15-16) तुझ्या विहिरीतून वाहणारे पाणीच फक्त पी. आणि तुझे पाणी रस्त्यावर वाहून जाऊ देऊ नकोस. तू फक्त तुझ्या बायको बरोबरच लैगिक संबंध ठेवायला हवेस. तुझ्या घराबाहेरच्या मुलांचा बाप होऊ नकोस.
16.
17. तुझी मुले फक्त तुझीच असायला हवीत. घराबाहेरच्या इतर लोकांबरोबर त्यांची भागीदारी असायला नको.
18. म्हणून तुझ्या बायकोबरोबर सुखी राहा. तरुणपणी जिच्याबरोबर लग्न केलेस तिलाच उपभोग.
19. ती सुंदर हरिणीसारखी आहे. गोजिरवाण्या हरिणाच्या पाडसासारखी आहे. तिचे प्रेम तुझे समाधान करो. तू तिच्या प्रेमात बंदीवान हो.
20. दुसऱ्याच्या बायकोकडून तू असा बंदीवान होऊ नकोस. तुला दुसऱ्याच्या बायकोच्या प्रेमाची गरज नाही.
21. तू जे काही करतोस ते परमेश्वराला स्पष्ट दिसते तू कुठे जातोस ते परमेश्वर बघतो.
22. दुष्ट माणसाची पापे त्याला जाळ्यात पकडतील त्याची पापे दोरीप्रमाणे त्याला पकडतील.
23. तो दुष्ट माणूस मरेल कारण त्याने शिस्त नाकारली. तो स्वत: च्या मूर्खपणामुळेच अडकला जाईल.

Notes

No Verse Added

Total 31 अध्याय, Selected धडा 5 / 31
नीतिसूत्रे 5:25
1 मुला, माझ्या शहाणपणाच्या शिकवणुकीकडे लक्ष दे. माझ्या समजूत निर्माण करणाऱ्या शब्दाकडे लक्ष दे. 2 नंतर तुला जगण्याचा योग्य मार्ग कळेल. तुझे शब्द तू शहाणा आहेस हे दाखवून देतील. 3 दुसन्या माणसाची बायको खूप मोहक असेल. तीच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द खूप गोड व आकर्षक असतील. 4 पण शेवटी त्यामुळे कटुता व दु:खच मिळेल. ते दु:ख विषापेक्षाही कडवट असले. आणि तलवारीपेक्षी धारदार असेल. 5 तिचे पाय मृत्यूलाच जाऊन भिडतात. ती तुला सरळ कबरेत नेईल. 6 तिच्या मागे जाऊ नकोस. तिने योग्य मार्ग सोडला आहे आणि ते तिला माहीत नाही. काळजीपूर्वक राहा. जीवनाचा योग्य मार्ग आचर. 7 मुलांनो, आता माझे ऐका. मी जे सांगतो ते विसरु नका. 8 जी स्त्री व्यभिचार करते तिच्यापासून दूर राहा. तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नका. 9 जर तुम्ही गेलात तर तुम्ही लोकांच्या मनातल्या तुमच्या विषयीच्या आदराला मुकाल. तुमचा गेलेला मान दुसरे लोक घेतील. शेवटी तुम्ही तुमच्या जीवनाला मुकाल. दुष्ट लोक ते तुमच्यापासून हिरावून घेतील. 10 तुम्हाला माहीत नसलेले लोक तुमची संपत्ती संपत्ती घेतील. तुम्ही ज्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट केलेत त्या गोष्टी ते लोक घेतील. 11 तुम्ही आयुष्याच्या शेवटी कष्टी व्हाल. तुमचे शरीर आणि मन सर्व काही नाश पावेल. 12 (12-13) नंतर तुम्ही म्हणाल, “मी माझ्या आई - वडिलांचे का ऐकले नाही? मी शिस्त पाळायला नकार दिला. मी सुधारायला नकार दिला. 13 14 आता शेवटी मला दिसते की माझे आयुष्य वाया गेले आहे. आणि सगळ्या लोकांना माझी लाज दिसते आहे.” 15 (15-16) तुझ्या विहिरीतून वाहणारे पाणीच फक्त पी. आणि तुझे पाणी रस्त्यावर वाहून जाऊ देऊ नकोस. तू फक्त तुझ्या बायको बरोबरच लैगिक संबंध ठेवायला हवेस. तुझ्या घराबाहेरच्या मुलांचा बाप होऊ नकोस. 16 17 तुझी मुले फक्त तुझीच असायला हवीत. घराबाहेरच्या इतर लोकांबरोबर त्यांची भागीदारी असायला नको. 18 म्हणून तुझ्या बायकोबरोबर सुखी राहा. तरुणपणी जिच्याबरोबर लग्न केलेस तिलाच उपभोग. 19 ती सुंदर हरिणीसारखी आहे. गोजिरवाण्या हरिणाच्या पाडसासारखी आहे. तिचे प्रेम तुझे समाधान करो. तू तिच्या प्रेमात बंदीवान हो. 20 दुसऱ्याच्या बायकोकडून तू असा बंदीवान होऊ नकोस. तुला दुसऱ्याच्या बायकोच्या प्रेमाची गरज नाही. 21 तू जे काही करतोस ते परमेश्वराला स्पष्ट दिसते तू कुठे जातोस ते परमेश्वर बघतो. 22 दुष्ट माणसाची पापे त्याला जाळ्यात पकडतील त्याची पापे दोरीप्रमाणे त्याला पकडतील. 23 तो दुष्ट माणूस मरेल कारण त्याने शिस्त नाकारली. तो स्वत: च्या मूर्खपणामुळेच अडकला जाईल.
Total 31 अध्याय, Selected धडा 5 / 31
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References