मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
इब्री लोकांस
1. भूतकाळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे पुष्कळ वेळा वेगवेगळ्या मार्गांनी बोलला.
2. पण या शेवटच्या दिवसांत तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने हे जगसुद्धा पुत्राकरवीच निर्माण केले.
3. पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला.
4. तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे त्याला मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
5. त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की,“तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.”स्तोत्र.2:7देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की,“मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल.”2शमुवेल 7:14
6. आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो,“देवाचे सर्व देवदूत त्याची उपासना करोत.”अनुवाद 32:43
7. देवदूताविषयी देव असे म्हणतो,“तो त्याच्या देवदूतांना वारा बनवितो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवितो.”स्तोत्र. 104:4
8. पण पुत्राविषयी तो असे म्हणतो,“तुझे सिंहासन, हे देवा, तुझे सिंहासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य न्यायाचे असेल.
9. नीति तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस. म्हणून देवाने तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंदादायी तेलाचा अभिषेक केला आहे.”स्तोत्र. 45:6-7
10. आणि देव असेही म्हणाला, “हे प्रभु, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.
11. ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील.
12. तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.”स्तोत्र. 102:25-27
13. तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही,“तुझ्या वैऱ्याला तुझ्या पायाखाली घालेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.”स्तोत्र. 110:1
14. सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठविले जातात की नाही?
Total 13 अध्याय, Selected धडा 1 / 13
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
1 भूतकाळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे पुष्कळ वेळा वेगवेगळ्या मार्गांनी बोलला. 2 पण या शेवटच्या दिवसांत तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने हे जगसुद्धा पुत्राकरवीच निर्माण केले. 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला.
4 तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे त्याला मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
5 त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की,“तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.”स्तोत्र.2:7देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की,“मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल.”2शमुवेल 7:14 6 आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो,“देवाचे सर्व देवदूत त्याची उपासना करोत.”अनुवाद 32:43 7 देवदूताविषयी देव असे म्हणतो,“तो त्याच्या देवदूतांना वारा बनवितो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवितो.”स्तोत्र. 104:4 8 पण पुत्राविषयी तो असे म्हणतो,“तुझे सिंहासन, हे देवा, तुझे सिंहासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य न्यायाचे असेल. 9 नीति तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस. म्हणून देवाने तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंदादायी तेलाचा अभिषेक केला आहे.”स्तोत्र. 45:6-7 10 आणि देव असेही म्हणाला, “हे प्रभु, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे. 11 ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील. 12 तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.”स्तोत्र. 102:25-27 13 तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही,“तुझ्या वैऱ्याला तुझ्या पायाखाली घालेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.”स्तोत्र. 110:1 14 सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठविले जातात की नाही?
Total 13 अध्याय, Selected धडा 1 / 13
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
×

Alert

×

Marathi Letters Keypad References