4. 4 मग तेज आणून आत ठेव व त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष मंडपात आण व त्यावरील दिवे योग्य ठिकाणी ठेव.
|
5. 5 सोन्याची धूपवेदी मंडपात आण व ती आज्ञापटाच्या कोशापुढे ठेव आणि पवित्र निवास मंडपाच्या दाराचा पडदा लाव.
|
9. 9 अभिषेकाचे तेल घेऊन पवित्र निवास मंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याचे सर्व सामान पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल.
|
13. 13 मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला तेलाने अभिषेक करून पवित्र कर मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील.
|
15. 15 त्याच्या बापाला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; तू त्यांना अभिषेक केल्यावर ते याजक होतील; ते घराणे पिढ्यान्पिढ्या निरंतरचे याजकपण करीत राहील.”
|
17. 17 योग्य वेळी म्हणजे दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवास मंडपाची उभारणी झाली.
|
18. 18 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवास मंडप उभा केला; प्रथम त्याने खुर्च्या (बैठक) बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळया लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले;
|
19. 19 त्यानंतर पवित्र निवास मंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.
|
21. 21 मग मोशेने तो कोश पवित्र निवास मंडपात नेला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून आज्ञापटाचा कोश झाकला; अशा रीतीने त्याने पवित्र कोश सुरक्षित केला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
|
23. 23 मग त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
|
25. 25 नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे ठेवले; परमेश्वरने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
|
29. 29 त्याने पवित्र निवास मंडपाच्या दर्शन मंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे वाहिली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
|
32. 32 ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
|
33. 33 मग त्याने पवित्र निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला; ह्या प्रकारे परमेश्वराने सांगितल्या प्रमाणे मोशेने सर्व काम संपविले.
|
35. 35 दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने पवित्र निवास मंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
|
37. 37 परंतु तो मेघ पवित्र निवास मंडपावर असे पर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाई पर्यंत ते तेथेच थांबत.
|
38. 38 परमेश्वराचा मेघ दिवसा पवित्र निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांना आपल्या प्रवासात तो दिसत असे.
|