2. 2 “ईयोब, जर तू खरोखरच शहाणा असशील तर तू पोकळ शब्दांनी उत्तर देणार नाहीस. शहाणा माणूस गरम हवेने इतका भरलेला नसतो.
|
4. 4 ईयोब तुला जर तुझ्या मनाप्रमाणे वागू दिले तर कोणीही माणूस देवाला मान देणार नाही आणि त्याची प्रार्थना करणार नाही.
|
5. 5 तुझ्या बोलण्यावरुन तुझे पाप चांगले कळते. ईयोब तू हुशारीने बोलून तुझे पाप लपवायचा प्रयत्न करीत आहेस.
|
6. 6 तू चुकत आहेस हे सिध्द करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. का? कारण तू तुझ्या तोंडाने जे बोलतोस ते तू चुकात असल्याचे सिध्द करतात. तुझे स्वत:चेच ओठ तुझ्याविरुध्द बोलतात.
|
7. 7 “ईयोब, जन्माला येणारा तू पहिलाच माणूस आहेस असे तुला वाटते का? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
|
10. 10 केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्या बाजूला आहेत.
|
11. 11 देव तुझे सांत्वन करतो पण ते तुला पुरेसे वाटत नाही. देवाचा निरोप आम्ही तुला अगदी हळुवारपणे दिला आहे.
|
16. 16 मनुष्याप्राणी सर्वांत वाईट आहे, तो अशुध्द आणि कुजलेला आहे. तो वाईट गोष्टी पाण्यासारख्या पितो.
|
18. 18 विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगीतल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानांच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगीतल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
|
19. 19 ते त्यांच्या देशात एकटे राहात होते, तिथून दुसऱ्या देशांतील लोक जात नसत. त्यामुळे इतरांनी कुणी त्यांना काही विचित्र कल्पना सांगितल्या नाहीत.
|
20. 20 हे विद्वान लोक म्हणाले, “दुष्ट माणूस जीवनभर यातना भोगतो. क्रूर माणूस मरण येईपर्यंत भीतीने कापत असतो. (क्रूर माणसाचे दिवस भरलेले असतात. तो त्या दिवसांत ही यातना भोगतो.)
|
21. 21 त्याला प्रत्येक आवाजाची भीती वाटते. जेव्हा आपण सुरक्षित आहोत असे त्याला वाटते तेव्हा त्याचा शत्रू त्याच्यावर हल्ला करतो.
|
22. 22 दुष्ट माणूस निराश झालेला असतो. व त्याला अंधारातून सुटका होण्याची आशा नसते. त्याला मारण्यासाठी तलवार टपून बसलेली असते.
|
23. 23 तो इकडे तिकडे भटकत राहातो परंतु त्याचे शरीर गिधाडांचे अन्न असते. आपला मृत्यू अगदी जवळ आला आहे हे त्याला माहीत असते.
|
24. 24 त्याला काळजी आणि यातना भयभीत करतात. एखाद्या राजाप्रमाणे त्याला नष्ट करण्यासाठी त्या त्याच्यावर हल्ला करतात.
|
25. 25 का? कारण दुष्ट मनुष्य देवाची आज्ञा मानायला तयार नसतो. तो त्याच्या मुठी देवासमोर नाचवतो. तो सर्वशक्तिमान देवाचा पराभव करायचा प्रयत्न करतो.
|
29. 29 दुष्ट माणूस फार दिवस श्रीमंत राहू शकत नाही. त्याची संपत्ती खूप दिवस टिकत नाही. त्याची पिके जास्त वाढत नाहीत.
|
30. 30 दुष्ट माणसाची काळोखापासून सुटका नसते. तो त्या झाडासारखा असतो ज्याची पाने रोगामुळे मरतात आणि वारा त्यांना दूर उडवून नेतो.
|
31. 31 निरुपयोगी गोष्टींवर विश्वास ठेवून दुष्ट माणसाने स्वत:चीच फसवणूक करुन घेऊ नये, का? कारण त्याला त्यातून काहीही मिळणार नाही.
|
32. 32 आयुष्य संपायच्या आधीच दुष्ट माणूस म्हातारा आणि शुष्क झालेला असेल. तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फंादीसारखा असेल.
|
33. 33 दुष्ट माणूस द्राक्ष न पिकता गळून गेलेल्या द्राक्षाच्या वेलीसारखा असेल. तो फूल गळून गेलेल्या जैतून झाडाप्रमाणे असेल.
|
34. 34 का? कारण ज्यांच्या जवळ देव नसतो त्यांच्याजवळ काहीही नसते. जे लोक पैशावर प्रेम करतात त्यांची घरे आगीत भस्मसात होतात.
|
35. 35 दुष्ट माणसे सतत दुष्टपणा करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी योजना आखत असतात. ते लोकांना फसविण्यासाठी योजना तयार करतात.”
|