मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1 राजे
1. बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बतीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.
2. इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे बेन-हदादने दूतांकरवी निरोप पाठवला.
3. संदेश असा होता, “बेन-हादाचे म्हणणे आहे, ‘तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या बायका आणि मुलेही माझ्या हवाली करावी.”‘
4. यावर इस्राएलच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.”
5. अहाबकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेनहदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस.
6. उद्याच मी माझ्या माणसांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. तुमच्याजवळच्या सर्व मौल्यवान चीजा त्या माणसांच्या हवाली करा. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.”
7. तेव्हा राजा अहाबने आपल्या देशातील सर्व वडीलधाऱ्या माणसांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, बेन - हदाद हा विघ्र आणत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोने - चांदी तसेच माझी बायका मुले मागितली. त्याला मी कबूल झालो. आणि आता त्याला सर्वच हवे आहे.”
8. यावर ती वडीलधारी मंडळी आणि इतर लोक म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान तुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”
9. तेव्हा अहाबने बेन - हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही.” बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.
10. तेव्हा बेन - हदादकडून दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या माणसांना काही राहणार नाही. असे झाले नाही तर देवाने माझे वाटोळे करावे.”
11. अहाब राजाचे त्याला उत्तर गेले. त्यात म्हटले होते. “बेनहदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्ख काळापर्यंत जगतो त्याच्या इतके फुशारुन जाऊ नये.”
12. राजा बेन - हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना चढाईचा व्यूह रचायला सांगितले. त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.
13. त्याच वेळी इकडे एक संदेष्टा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हातून या सैन्याचा पारभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.”
14. अहाबने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील?” तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल.” यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?” “तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.
15. तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते.
16. राजा बेन - हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबने हल्ला चढवला.
17. तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेनहदादच्या माणसांनी त्याला सांगितले.
18. तेव्हा बेनहदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”
19. राजा अहाबच्या तरुणांची तुकडी पुढे होती आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते.
20. प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अराममधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेनहदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला.
21. राजा अहाबने सेनेचे नेतृत्व करुन अरामच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामचा दारुन पारभव झाला.
22. यानंतर तो संदेष्टा राजा अहाबकडे गेला आणि म्हणाला, “अरामचा राजा बेनहदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आखा.”
23. राजा बेन - हदादचे अधिकारी त्याला म्हणाले, “इस्राएलचे देव हे पर्वतराजीतले देव आहेत. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू.
24. आता तुम्ही असे करायला हवे त्या 32 राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा.
25. “जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएलोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.
26. वसंत ऋतुत बेनहदादने अराममधील लोकांना एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला.
27. इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता.
28. एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करवणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.
29. दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकंानी अरामचे एकलक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.”
30. जे बाचवले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेनहदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका खोलीत लपला होता.
31. त्याचे सेवक त्याला म्हणाले, ‘इस्राएलचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण जाडे कपडे घालून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून इस्राएलच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल सुध्दा.”
32. त्या सर्वांनी मग भरडे कपडे घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलच्या राजाकडे आले. त्याला म्हणाले, “तुमचा दास बेनहदाद तुमच्याकडे ‘जीवदान मागत आहे.”‘ अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा भाऊच आहे.”
33. बेनहदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबने बेनहदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेनहदाद तुमचा भाऊच आहे.” अहाबने बेनहदादला “आपल्यासमोर बोलावून घेतले.” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबने त्याला आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.
34. बेनहदाद अहाबला म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुझ्या वडीलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडीलांनी शोमरोन मध्ये बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील” अहाब त्यावर म्हणाला, “या कारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतिचा करार केला. मग राजा अहाबने राजा बेन-हदादला मुक्त केले.
35. एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला सांगितले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले.
36. तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्याला ठार मारले.
37. मग हा पहिला संदेष्टा एका माणसाकडे गेला. त्याला त्याने स्वत:ला “फटका मारायला” सांगितले. त्या माणसाने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले.
38. त्या संदेष्ट्याने मग स्वत:च्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहात बसला.
39. राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्याला म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, “याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा पंचाहत्तर पौंड चांदीचा दंड भरावा लागेल.
40. पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो माणूस पळून गेला.” यावर इस्राएलचा राजा म्हणाला, “त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस.”
41. आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. राजाने त्याला पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले.
42. मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्याला तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.”
43. यानंतर राजा शोमरोनला आपल्या घरी परतला. तो अतिशय चिंताग्रस्त आणि खिन्न झाला होता.

Notes

No Verse Added

Total 22 अध्याय, Selected धडा 20 / 22
1 राजे 20:31
1 बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बतीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले. 2 इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे बेन-हदादने दूतांकरवी निरोप पाठवला. 3 संदेश असा होता, “बेन-हादाचे म्हणणे आहे, ‘तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या बायका आणि मुलेही माझ्या हवाली करावी.”‘ 4 यावर इस्राएलच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.” 5 अहाबकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेनहदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस. 6 उद्याच मी माझ्या माणसांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. तुमच्याजवळच्या सर्व मौल्यवान चीजा त्या माणसांच्या हवाली करा. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.” 7 तेव्हा राजा अहाबने आपल्या देशातील सर्व वडीलधाऱ्या माणसांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, बेन - हदाद हा विघ्र आणत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोने - चांदी तसेच माझी बायका मुले मागितली. त्याला मी कबूल झालो. आणि आता त्याला सर्वच हवे आहे.” 8 यावर ती वडीलधारी मंडळी आणि इतर लोक म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान तुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.” 9 तेव्हा अहाबने बेन - हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही.” बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला. 10 तेव्हा बेन - हदादकडून दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या माणसांना काही राहणार नाही. असे झाले नाही तर देवाने माझे वाटोळे करावे.” 11 अहाब राजाचे त्याला उत्तर गेले. त्यात म्हटले होते. “बेनहदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्ख काळापर्यंत जगतो त्याच्या इतके फुशारुन जाऊ नये.” 12 राजा बेन - हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना चढाईचा व्यूह रचायला सांगितले. त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या. 13 त्याच वेळी इकडे एक संदेष्टा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हातून या सैन्याचा पारभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.” 14 अहाबने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील?” तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल.” यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?” “तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले. 15 तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते. 16 राजा बेन - हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबने हल्ला चढवला. 17 तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेनहदादच्या माणसांनी त्याला सांगितले. 18 तेव्हा बेनहदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.” 19 राजा अहाबच्या तरुणांची तुकडी पुढे होती आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते. 20 प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अराममधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेनहदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला. 21 राजा अहाबने सेनेचे नेतृत्व करुन अरामच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामचा दारुन पारभव झाला. 22 यानंतर तो संदेष्टा राजा अहाबकडे गेला आणि म्हणाला, “अरामचा राजा बेनहदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आखा.” 23 राजा बेन - हदादचे अधिकारी त्याला म्हणाले, “इस्राएलचे देव हे पर्वतराजीतले देव आहेत. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू. 24 आता तुम्ही असे करायला हवे त्या 32 राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा. 25 “जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएलोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली. 26 वसंत ऋतुत बेनहदादने अराममधील लोकांना एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला. 27 इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता. 28 एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करवणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल. 29 दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकंानी अरामचे एकलक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.” 30 जे बाचवले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेनहदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका खोलीत लपला होता. 31 त्याचे सेवक त्याला म्हणाले, ‘इस्राएलचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण जाडे कपडे घालून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून इस्राएलच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल सुध्दा.” 32 त्या सर्वांनी मग भरडे कपडे घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलच्या राजाकडे आले. त्याला म्हणाले, “तुमचा दास बेनहदाद तुमच्याकडे ‘जीवदान मागत आहे.”‘ अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा भाऊच आहे.” 33 बेनहदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबने बेनहदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेनहदाद तुमचा भाऊच आहे.” अहाबने बेनहदादला “आपल्यासमोर बोलावून घेतले.” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबने त्याला आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले. 34 बेनहदाद अहाबला म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुझ्या वडीलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडीलांनी शोमरोन मध्ये बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील” अहाब त्यावर म्हणाला, “या कारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतिचा करार केला. मग राजा अहाबने राजा बेन-हदादला मुक्त केले. 35 एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला सांगितले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले. 36 तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्याला ठार मारले. 37 मग हा पहिला संदेष्टा एका माणसाकडे गेला. त्याला त्याने स्वत:ला “फटका मारायला” सांगितले. त्या माणसाने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले. 38 त्या संदेष्ट्याने मग स्वत:च्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहात बसला. 39 राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्याला म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, “याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा पंचाहत्तर पौंड चांदीचा दंड भरावा लागेल. 40 पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो माणूस पळून गेला.” यावर इस्राएलचा राजा म्हणाला, “त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस.” 41 आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. राजाने त्याला पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले. 42 मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्याला तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.” 43 यानंतर राजा शोमरोनला आपल्या घरी परतला. तो अतिशय चिंताग्रस्त आणि खिन्न झाला होता.
Total 22 अध्याय, Selected धडा 20 / 22
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References