मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1 राजे
1. समस्त इस्राएल लोकांवर राजा शलमोनाची सत्ता होती.
2. त्याला शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नावे अशी सामादोकचा मुलगा अजऱ्या हा याजक होता
3. शिशाचे मुलगे अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलूदाचा मुलगा यहोसाफाट हा बखरकार होता.
4. बनाया हा यहोयादाचा मुलगा सेनापती होता. सादोक आणि अब्याथार याजक होते
5. नाथानचा मुलगा अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता. नाथानचा मुलगा जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता.
6. अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता. अब्दाचा मुलगा अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.
7. इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागूतून अन्नधान्य गोळा करुन राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. शलमोनाचे साम्राज्य
8. त्या बारा कारभाऱ्यांची नावे अशी: बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता.
9. माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी.
10. अरुबोथ, सीखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभाही होता.
11. बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची मुलगी टाफाथ ही याची पत्नी.
12. तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेएलच्या खाली बेथ-शानापासून अबेल-महोला पर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलूदाचा मुलगा बाना हा होता.
13. रामोथ-गिलादवर बेन-गेबेर हा प्रमुख होता. गिलादमधील मनश्शेचा मुलगा याईर याची सर्व गावे, बाशानमधील अर्गेब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि दिंडी दखवाजावर पंच धातूचा आगळा असलेली साठ नगरे होती.
14. इद्दोचा मुलगा अहीनादाब महनाईम प्रांतावर होता.
15. नफतालीवर अहीमास होता. त्यानेही शलमोनाची मुलगी बासमथ हिच्याशी लग्न केले होते.
16. हूशयाचा मुलगा बाना हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.
17. पारुहाचा मुलगा यहोशाफाट इस्साखारवर होता.
18. एलाचा मुलगा शिमी बन्यामीनचा कारभारी होता.
19. उरीचा मुलगा गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सिहोन आणि बाशानचा राजा ओग हे या प्रांतात राहात होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.
20. यहूदा आणि इस्राएलमध्ये समुद्रतीरावरील वाळूकणांसरखी अगणित माणसे होती. ती खात, पीत व मजाकरत आनंदाने जगत होती.
21. युफ्राटिस नदीपासून पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत शलमोनाची सत्ता होती. मिसरच्या सीमेला त्याची हद्द भिडली होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.
22. [This verse may not be a part of this translation]
23. [This verse may not be a part of this translation]
24. युफ्राटिस नदीच्या पश्र्चिमेकडील सर्व देशांवर त्याची सत्ता होती. तिफसाहापासून गज्जापर्यंतचा हा प्रदेश होय सर्वत्र शांतता नांदत होती.
25. दान पासून बैरशेबापर्यंत यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहात होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते.
26. रथाच्या चारहजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार घोडेस्वार होते.
27. शिवाय ते बारा कारभारी दर महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते.
28. रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभाशी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी.
29. देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण दिले होते. त्यामुळे त्याला अनेक गोष्टी समजत. त्याची हुषारी कल्पनातीत होती.
30. पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते.
31. पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची मुले हेमान व कल्यकोल व दर्दा यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र दुमदुमत होते.
32. आपल्या आयुष्यात त्याने तीनहजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली.
33. निसगर्विषयीही त्याला ज्ञान होते. लबानोनमधल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्याला ज्ञान होते. प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे.
34. देशादेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार माणसांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.
Total 22 अध्याय, Selected धडा 4 / 22
1 समस्त इस्राएल लोकांवर राजा शलमोनाची सत्ता होती. 2 त्याला शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नावे अशी सामादोकचा मुलगा अजऱ्या हा याजक होता 3 शिशाचे मुलगे अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलूदाचा मुलगा यहोसाफाट हा बखरकार होता. 4 बनाया हा यहोयादाचा मुलगा सेनापती होता. सादोक आणि अब्याथार याजक होते 5 नाथानचा मुलगा अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता. नाथानचा मुलगा जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता. 6 अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता. अब्दाचा मुलगा अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता. 7 इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागूतून अन्नधान्य गोळा करुन राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. शलमोनाचे साम्राज्य 8 त्या बारा कारभाऱ्यांची नावे अशी: बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता. 9 माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी. 10 अरुबोथ, सीखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभाही होता. 11 बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची मुलगी टाफाथ ही याची पत्नी. 12 तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेएलच्या खाली बेथ-शानापासून अबेल-महोला पर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलूदाचा मुलगा बाना हा होता. 13 रामोथ-गिलादवर बेन-गेबेर हा प्रमुख होता. गिलादमधील मनश्शेचा मुलगा याईर याची सर्व गावे, बाशानमधील अर्गेब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि दिंडी दखवाजावर पंच धातूचा आगळा असलेली साठ नगरे होती. 14 इद्दोचा मुलगा अहीनादाब महनाईम प्रांतावर होता. 15 नफतालीवर अहीमास होता. त्यानेही शलमोनाची मुलगी बासमथ हिच्याशी लग्न केले होते. 16 हूशयाचा मुलगा बाना हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता. 17 पारुहाचा मुलगा यहोशाफाट इस्साखारवर होता. 18 एलाचा मुलगा शिमी बन्यामीनचा कारभारी होता. 19 उरीचा मुलगा गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सिहोन आणि बाशानचा राजा ओग हे या प्रांतात राहात होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता. 20 यहूदा आणि इस्राएलमध्ये समुद्रतीरावरील वाळूकणांसरखी अगणित माणसे होती. ती खात, पीत व मजाकरत आनंदाने जगत होती. 21 युफ्राटिस नदीपासून पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत शलमोनाची सत्ता होती. मिसरच्या सीमेला त्याची हद्द भिडली होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत. 22 [This verse may not be a part of this translation] 23 [This verse may not be a part of this translation] 24 युफ्राटिस नदीच्या पश्र्चिमेकडील सर्व देशांवर त्याची सत्ता होती. तिफसाहापासून गज्जापर्यंतचा हा प्रदेश होय सर्वत्र शांतता नांदत होती. 25 दान पासून बैरशेबापर्यंत यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहात होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते. 26 रथाच्या चारहजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार घोडेस्वार होते. 27 शिवाय ते बारा कारभारी दर महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते. 28 रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभाशी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी. 29 देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण दिले होते. त्यामुळे त्याला अनेक गोष्टी समजत. त्याची हुषारी कल्पनातीत होती. 30 पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते. 31 पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची मुले हेमान व कल्यकोल व दर्दा यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र दुमदुमत होते. 32 आपल्या आयुष्यात त्याने तीनहजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली. 33 निसगर्विषयीही त्याला ज्ञान होते. लबानोनमधल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्याला ज्ञान होते. प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे. 34 देशादेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार माणसांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.
Total 22 अध्याय, Selected धडा 4 / 22
×

Alert

×

Marathi Letters Keypad References