मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
2 शमुवेल
1. राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला भोवतालच्या सर्व शत्रूपासून विसावा दिला.
2. एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि परमेश्वराचा पवित्र कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशा साठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”
3. नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.”
4. पण त्यादिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
5. “दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग. “परमेश्वराचा निरोप असा आहे. माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस.
6. इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर काढले मी त्यावेळी कुठल्या ही घरात राहात नव्हतो, मी राहूटीतूनच फिरलो. तेच माझे घर.
7. इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणालाही मी कधीही. माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस? असे विचारले नाही.’
8. “शिवाय दावीदाला हे ही सांग “सर्वशकितमान परमेश्वर असे म्हणतो. तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले आहे. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा नेता केले.
9. तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन.
10. [This verse may not be a part of this translation]
11. [This verse may not be a part of this translation]
12. “तुझे जीवन संपुष्टात आले म्हणजे मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या मुलांपैकीच कोणालातरी राजा करीन.
13. तो माझ्या नावाप्रीत्यर्थ घर (मंदिर) बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन.
14. मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर लोकाकडून मी त्याला शासन घडवीन. तेच माझे चाबूक
15. पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो तेव्हा तुझ्यासमोर मी त्याला दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही.
16. राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे सिंहासन टिकून राहील.”
17. नाथानने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.
18. यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभो, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?
19. मी केवळ तुझा सेवक आहे. (तुझ्या माझ्यावर किती लोभ आहे!) पुढे माझ्या वंशजांबद्दलही तू असाच लोभ दाखवला आहेस. सर्वांशी तुझा व्यवहार नेहमी असाच असतो का?
20. मी आणखी काय बोलणार? प्रभु परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच.
21. तू करणार म्हणालास आणि तुला तसे करायची इच्छा आहे. तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस.
22. माझ्या प्रभो परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही. तुझ्या लीला आम्ही ऐकल्या आहेत म्हणून आम्ही हे जाणतो.
23. “पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. (ती गुलाम होती) तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुकत केलेस. तिला आपली प्रजा मानलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भुत चमत्कार केलेस.
24. तू निरंतर त्यांना स्वत:च्या कवेत घेतलेस. तू त्यांचा देव झालास.
25. “आता तर, परमेश्वर देवा, या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करुन तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करु दे.
26. मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, “सर्वशकितमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.’
27. “सर्वशकितमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस. तू म्हणालास, “मी तुझ्यासाठी घर बांधीन’ म्हणून मी, तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे.
28. प्रभो, परमेश्वरा तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास.
29. आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभो परमेश्वरा तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”
Total 24 अध्याय, Selected धडा 7 / 24
1 राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला भोवतालच्या सर्व शत्रूपासून विसावा दिला. 2 एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि परमेश्वराचा पवित्र कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशा साठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.” 3 नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.” 4 पण त्यादिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला, 5 “दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग. “परमेश्वराचा निरोप असा आहे. माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस. 6 इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर काढले मी त्यावेळी कुठल्या ही घरात राहात नव्हतो, मी राहूटीतूनच फिरलो. तेच माझे घर. 7 इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणालाही मी कधीही. माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस? असे विचारले नाही.’ 8 “शिवाय दावीदाला हे ही सांग “सर्वशकितमान परमेश्वर असे म्हणतो. तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले आहे. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा नेता केले. 9 तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन. 10 [This verse may not be a part of this translation] 11 [This verse may not be a part of this translation] 12 “तुझे जीवन संपुष्टात आले म्हणजे मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या मुलांपैकीच कोणालातरी राजा करीन. 13 तो माझ्या नावाप्रीत्यर्थ घर (मंदिर) बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन. 14 मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर लोकाकडून मी त्याला शासन घडवीन. तेच माझे चाबूक 15 पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो तेव्हा तुझ्यासमोर मी त्याला दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही. 16 राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे सिंहासन टिकून राहील.” 17 नाथानने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले. 18 यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभो, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस? 19 मी केवळ तुझा सेवक आहे. (तुझ्या माझ्यावर किती लोभ आहे!) पुढे माझ्या वंशजांबद्दलही तू असाच लोभ दाखवला आहेस. सर्वांशी तुझा व्यवहार नेहमी असाच असतो का? 20 मी आणखी काय बोलणार? प्रभु परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच. 21 तू करणार म्हणालास आणि तुला तसे करायची इच्छा आहे. तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस. 22 माझ्या प्रभो परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही. तुझ्या लीला आम्ही ऐकल्या आहेत म्हणून आम्ही हे जाणतो. 23 “पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. (ती गुलाम होती) तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुकत केलेस. तिला आपली प्रजा मानलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भुत चमत्कार केलेस. 24 तू निरंतर त्यांना स्वत:च्या कवेत घेतलेस. तू त्यांचा देव झालास. 25 “आता तर, परमेश्वर देवा, या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करुन तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करु दे. 26 मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, “सर्वशकितमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.’ 27 “सर्वशकितमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस. तू म्हणालास, “मी तुझ्यासाठी घर बांधीन’ म्हणून मी, तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे. 28 प्रभो, परमेश्वरा तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास. 29 आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभो परमेश्वरा तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”
Total 24 अध्याय, Selected धडा 7 / 24
×

Alert

×

Marathi Letters Keypad References