मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
यहेज्केल
1. मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
2. “मानवपुत्रा, माझ्यावतीने बोल. ‘मी पुढील गोष्टी सांगतो’ असे सांग. “ओरडून सांग “तो भयंकर दिवस येत आहे.”
3. तो दिवस नजीक आहे. हो! परमेश्वराचा न्यायाचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांची न्यायनिवाडा करण्याची वेळ असेल.
4. मिसरविरुद्ध तलवार उठेल. मिसरच्या पतनाच्या वेळी कुश देशातील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. बाबेलचे सैन्य मिसरच्या लोकांना कैदी करुन नेईल. मिसरचा पाया उखडला जाईल.
5. “खूप लोकांनी मिसरबरोबर शांतता करार केला. पण ते सर्व म्हणजे कुशी पूटी लूदी, अरेबिया येथील लोक, मिश्र जाती, कूबी आणि इस्राएल लोक यांचा नाश होईल.
6. परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मिसरला मदत करणारे आपटतील, त्यांच्या सत्तेचा तोरा उतरेल. मिग्दोलपासून सवेनेपर्यंतचे मिसरचे लोक युद्धात मारले जातील.” परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला,
7. मिसर नाश झालेल्या देशांच्या मालिकेत जाऊन बसेल. मिसर त्या ओसाड देशांपैकी एक होईल.
8. मी मिसरमध्ये आग लावीन आणि मिसरच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. मगच त्यांना कळेल की मी परमेश्वर आहे.
9. “त्याच वेळी, मी बाहेर दूत पाठवीन ते जहाजातून कूशला वाईट बातमी सांगण्यासाठी जातील. आता कूशला सुरक्षित वाटते. पण मिसरच्या शिक्षेच्या वेळी कूशमधील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. ती वेळ येत आहे!
10. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की “मिसरच्या लोकांचा नाश करण्यासाठी मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरचा उपयोग करीन.
11. सर्व राष्ट्रामध्ये, नबुखद्नेस्सर व त्याचे लोक भयंकर आहेत आणि मिसरचा नाश करण्यासाठी मी त्यांना आणीन. ते मिसरविरुद्ध तलवारी उपसतील. ती भूमी प्रेतांनी भरुन टाकतील.
12. मी नाईल नदीला कोरडी करीन आणि ती जागा दुष्टांना विकीन. मी, परमेश्वर, सांगतो की “परक्यांकरवी मी ती भूमी ओसाड करीन.”
13. परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मी मिसरमधील मूर्तींचा सुध्दा नाश करीन. मी नोफातील पुतळे त्यापासून दूर करीन. ह्यापुढे मिसरमध्ये कोणीही नेता नसेल. मी मिसरमध्ये भीतीचे साम्राज्य निर्माण करीन.
14. मी पथ्रोसला ओसाड करीन. सोअनास आग लावीन मी नोला शिक्षा करीन.
15. मिसरचा गड जो सीन त्यावर मी माझा संपूर्ण राग काढीन. मी नोच्या लोकांचा नाश करीन.
16. मी मिसरला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील. सैनिक नो शहरात घुसतील आणि नोफाला रोज नव्या नव्या अडचणी येतील.
17. आवेन व पी बेसेथ येथील तरुण युद्धात मारले जातील आणि स्त्रियांना धरुन नेतील.
18. ज्या दिवशी मी मिसरचे नियंत्रण मोडीन, तो दिवस तहपन्हेसचा काळा दिवस असेल. मिसरच्या उन्मत्त सत्तेचा अंत होईल. मिसरला ढग झाकेल आणि त्याच्या मुलींना कैद करुन नेले जाईल.
19. अशा रीतीने, मी मिसरला शिक्षा केल्यावर, त्यांना मी परमेश्वर आहे, हे पटेल.”
20. परागंदा काळातील अकराव्या वर्षांच्यां पहिल्या महिन्याच्या (एप्रिलच्या) सातव्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला,
21. “मानवपुत्रा, मिसरच्या राजाचा फारोचा हात (सत्ता) मी मोडला आहे. त्याला कोणीही मलमपट्टी करणार नाही व औषधही लावणार नाही. तो बरा होणार नाही. त्यांच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती येणार नाही.”
22. परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “मी मिसरचा राजा फारो याच्याविरुद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला, मोडीन. मी त्याला त्याच्या हातातून तलवार टाकायला भाग पाडीन.
23. मी मिसरच्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत विखरुन टाकीन.
24. मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन. मी माझी तलवार त्याच्या हाती देईन. पण मी फारोचे हात तोडीन. मग तो मरणयातना भोगणाऱ्या माणसाप्रमाणे आक्रोश करील.
25. मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन, पण फारोचे हात तोडून टाकीन. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. “मी माझी तलवार बाबेलच्या राजाला देईन. तो ती मिसरवर उपसेल.
26. मी मिसरी लोकांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकेल म्हणजे त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळेल.”
Total 48 अध्याय, Selected धडा 30 / 48
1 मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, माझ्यावतीने बोल. ‘मी पुढील गोष्टी सांगतो’ असे सांग. “ओरडून सांग “तो भयंकर दिवस येत आहे.” 3 तो दिवस नजीक आहे. हो! परमेश्वराचा न्यायाचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांची न्यायनिवाडा करण्याची वेळ असेल. 4 मिसरविरुद्ध तलवार उठेल. मिसरच्या पतनाच्या वेळी कुश देशातील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. बाबेलचे सैन्य मिसरच्या लोकांना कैदी करुन नेईल. मिसरचा पाया उखडला जाईल. 5 “खूप लोकांनी मिसरबरोबर शांतता करार केला. पण ते सर्व म्हणजे कुशी पूटी लूदी, अरेबिया येथील लोक, मिश्र जाती, कूबी आणि इस्राएल लोक यांचा नाश होईल. 6 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मिसरला मदत करणारे आपटतील, त्यांच्या सत्तेचा तोरा उतरेल. मिग्दोलपासून सवेनेपर्यंतचे मिसरचे लोक युद्धात मारले जातील.” परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, 7 मिसर नाश झालेल्या देशांच्या मालिकेत जाऊन बसेल. मिसर त्या ओसाड देशांपैकी एक होईल. 8 मी मिसरमध्ये आग लावीन आणि मिसरच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. मगच त्यांना कळेल की मी परमेश्वर आहे. 9 “त्याच वेळी, मी बाहेर दूत पाठवीन ते जहाजातून कूशला वाईट बातमी सांगण्यासाठी जातील. आता कूशला सुरक्षित वाटते. पण मिसरच्या शिक्षेच्या वेळी कूशमधील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. ती वेळ येत आहे! 10 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की “मिसरच्या लोकांचा नाश करण्यासाठी मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरचा उपयोग करीन. 11 सर्व राष्ट्रामध्ये, नबुखद्नेस्सर व त्याचे लोक भयंकर आहेत आणि मिसरचा नाश करण्यासाठी मी त्यांना आणीन. ते मिसरविरुद्ध तलवारी उपसतील. ती भूमी प्रेतांनी भरुन टाकतील. 12 मी नाईल नदीला कोरडी करीन आणि ती जागा दुष्टांना विकीन. मी, परमेश्वर, सांगतो की “परक्यांकरवी मी ती भूमी ओसाड करीन.” 13 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मी मिसरमधील मूर्तींचा सुध्दा नाश करीन. मी नोफातील पुतळे त्यापासून दूर करीन. ह्यापुढे मिसरमध्ये कोणीही नेता नसेल. मी मिसरमध्ये भीतीचे साम्राज्य निर्माण करीन. 14 मी पथ्रोसला ओसाड करीन. सोअनास आग लावीन मी नोला शिक्षा करीन. 15 मिसरचा गड जो सीन त्यावर मी माझा संपूर्ण राग काढीन. मी नोच्या लोकांचा नाश करीन. 16 मी मिसरला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील. सैनिक नो शहरात घुसतील आणि नोफाला रोज नव्या नव्या अडचणी येतील. 17 आवेन व पी बेसेथ येथील तरुण युद्धात मारले जातील आणि स्त्रियांना धरुन नेतील. 18 ज्या दिवशी मी मिसरचे नियंत्रण मोडीन, तो दिवस तहपन्हेसचा काळा दिवस असेल. मिसरच्या उन्मत्त सत्तेचा अंत होईल. मिसरला ढग झाकेल आणि त्याच्या मुलींना कैद करुन नेले जाईल. 19 अशा रीतीने, मी मिसरला शिक्षा केल्यावर, त्यांना मी परमेश्वर आहे, हे पटेल.” 20 परागंदा काळातील अकराव्या वर्षांच्यां पहिल्या महिन्याच्या (एप्रिलच्या) सातव्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, 21 “मानवपुत्रा, मिसरच्या राजाचा फारोचा हात (सत्ता) मी मोडला आहे. त्याला कोणीही मलमपट्टी करणार नाही व औषधही लावणार नाही. तो बरा होणार नाही. त्यांच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती येणार नाही.” 22 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “मी मिसरचा राजा फारो याच्याविरुद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला, मोडीन. मी त्याला त्याच्या हातातून तलवार टाकायला भाग पाडीन. 23 मी मिसरच्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत विखरुन टाकीन. 24 मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन. मी माझी तलवार त्याच्या हाती देईन. पण मी फारोचे हात तोडीन. मग तो मरणयातना भोगणाऱ्या माणसाप्रमाणे आक्रोश करील. 25 मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन, पण फारोचे हात तोडून टाकीन. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. “मी माझी तलवार बाबेलच्या राजाला देईन. तो ती मिसरवर उपसेल. 26 मी मिसरी लोकांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकेल म्हणजे त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळेल.”
Total 48 अध्याय, Selected धडा 30 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References