मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
होशेय
1. इस्राएल बहरलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे आहे. त्याला परमेश्वराकडून पुष्कळ गोष्टी मिळत गेल्या पण त्याने दैवांच्या मानासाठी खूपखूप वेद्या बांधल्या. त्याची भूमी अधिकाधिक चांगली होत गेली, तेव्हा त्याने अधिक चांगले स्तंभ दैवतांच्या मानासाठी उभे केले.
2. इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराला फसविण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांनी त्यांचा अपराध कबूल केलाच पाहिजे. परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडेल. तो त्यांच्या स्मारक स्तंभांचा नाश करील.
3. आता इस्राएल लोक म्हणतात, “आम्हाला राजा नाही आम्ही परमेश्वराला मानत नाही. त्याचा राजा आमच्यासाठी काही करू शकत नाही.”
4. ते वचने देतात पण ते फक्त खोटो बोलत असतात. ते आपला शब्द पाळत नाहीत. ते दुसऱ्या देशांबरोबर करार करतात. परमेश्वराला ते करार आवडत नाहीत. न्यायाधीश नांगरलेल्या शेतात वाढणाऱ्या विषारी तणाप्रमाणे आहेत
5. शोमरोनमधील लोक बेथ:आवेन येथील वासरांची पूजा करतात. ते लोक अक्षरश:रडतील. ते याजकही खरोखरी रडतील. का? कारण त्यांची सुंदर मूर्ती नाहीशी झाली. ती दूर नेली गेली.
6. ती मूर्ती अशशूरच्या महान राजाला भेट म्हणून नेली गेली तो, एफ्राईमची लज्जास्पद मूर्ती ठेवील. इस्राएलला आपल्या मूर्तीची लाज वाटेल.
7. शोमरोनच्या दैवतांचा नाश केला जाईल पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाच्या तुकड्याप्रमाणे त्यांची दशा होईल.
8. इस्राएलाने पाप केले आणि उच्चस्थाने बांधली. आवेन मधील उच्चस्थानांचा नाश केला जाईल त्यांच्या वेदीवर काटेकुटे व तण वाढतील मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाका” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर पडा.”
9. इस्राएल, गिबाच्या काळापासून तू पाप केले आहेस ते लोक तेथे पाप करीतच राहिले. गिबातील ते दुष्ट युध्दात खरोखरी पकडले जातील.
10. मी त्यांना शिक्षा करण्यासाठी येईन सैन्ये त्यांच्या विरोधात गोळा होतील. ती इस्राएलींच्या दोन्ही पापाबंद्दल त्यांना शिक्षा करतील.
11. एफ्राईम शिकविलेल्या तरुन कालवडीप्रमाणे आहे. तिला खळ्यातील धान्यावरुन चालायला आवडते. मी तिच्या गळ्यात चांगले जोखड अडकवीन. एफ्राईमला दोराने बांधीन मग यहूदा नांगरणी करील याकोब स्वत: ढेकळे फोडील.
12. जर तुम्ही चांगुलपणा पेरलात, तर तुम्हाला खऱ्या प्रेमाचे पीक मिळेल तुमचे शेंत नांगरा तुम्हाला परमेश्वरासह पीक मिळेल. तो येईल आणि पावसाप्रमाणे तुमच्यावर चांगुलपणाचा वर्षाव करायला लावील.
13. पण तुम्ही पाप पेरले, म्हणून तुम्हाला अडचणींचे पीक मिळाले तुम्हाला तुमच्या खोटेपणाचे फळ मिळाले. का? कारण तुम्ही तुमच्या शक्तीवर आणि तुमच्या सैनिकांवर विश्वास ठेवला.
14. म्हणून तुमच्या सैन्याला रणशिंग ऐकू येईल तुमच्या सर्व गढ्यांचा नाश होईल. तो नाश, शल्मनाने जसा बेथ-आर्बेलचा नाश केला, तसा असेल त्या यूध्दाच्या वेळी, आया मलांबरोबर ठार मारल्या गेल्या.
15. आणि हे सर्व तुझ्याबाबतीत बेथेल येथे घडेल. का? कारण तुम्ही खूप पापे केली. तो दिवस उजाडताच इस्राएलच्या राजाचा संपूर्ण नाश होईल.
Total 14 अध्याय, Selected धडा 10 / 14
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
1 इस्राएल बहरलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे आहे. त्याला परमेश्वराकडून पुष्कळ गोष्टी मिळत गेल्या पण त्याने दैवांच्या मानासाठी खूपखूप वेद्या बांधल्या. त्याची भूमी अधिकाधिक चांगली होत गेली, तेव्हा त्याने अधिक चांगले स्तंभ दैवतांच्या मानासाठी उभे केले. 2 इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराला फसविण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांनी त्यांचा अपराध कबूल केलाच पाहिजे. परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडेल. तो त्यांच्या स्मारक स्तंभांचा नाश करील. 3 आता इस्राएल लोक म्हणतात, “आम्हाला राजा नाही आम्ही परमेश्वराला मानत नाही. त्याचा राजा आमच्यासाठी काही करू शकत नाही.” 4 ते वचने देतात पण ते फक्त खोटो बोलत असतात. ते आपला शब्द पाळत नाहीत. ते दुसऱ्या देशांबरोबर करार करतात. परमेश्वराला ते करार आवडत नाहीत. न्यायाधीश नांगरलेल्या शेतात वाढणाऱ्या विषारी तणाप्रमाणे आहेत 5 शोमरोनमधील लोक बेथ:आवेन येथील वासरांची पूजा करतात. ते लोक अक्षरश:रडतील. ते याजकही खरोखरी रडतील. का? कारण त्यांची सुंदर मूर्ती नाहीशी झाली. ती दूर नेली गेली. 6 ती मूर्ती अशशूरच्या महान राजाला भेट म्हणून नेली गेली तो, एफ्राईमची लज्जास्पद मूर्ती ठेवील. इस्राएलला आपल्या मूर्तीची लाज वाटेल. 7 शोमरोनच्या दैवतांचा नाश केला जाईल पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाच्या तुकड्याप्रमाणे त्यांची दशा होईल. 8 इस्राएलाने पाप केले आणि उच्चस्थाने बांधली. आवेन मधील उच्चस्थानांचा नाश केला जाईल त्यांच्या वेदीवर काटेकुटे व तण वाढतील मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाका” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर पडा.” 9 इस्राएल, गिबाच्या काळापासून तू पाप केले आहेस ते लोक तेथे पाप करीतच राहिले. गिबातील ते दुष्ट युध्दात खरोखरी पकडले जातील. 10 मी त्यांना शिक्षा करण्यासाठी येईन सैन्ये त्यांच्या विरोधात गोळा होतील. ती इस्राएलींच्या दोन्ही पापाबंद्दल त्यांना शिक्षा करतील. 11 एफ्राईम शिकविलेल्या तरुन कालवडीप्रमाणे आहे. तिला खळ्यातील धान्यावरुन चालायला आवडते. मी तिच्या गळ्यात चांगले जोखड अडकवीन. एफ्राईमला दोराने बांधीन मग यहूदा नांगरणी करील याकोब स्वत: ढेकळे फोडील. 12 जर तुम्ही चांगुलपणा पेरलात, तर तुम्हाला खऱ्या प्रेमाचे पीक मिळेल तुमचे शेंत नांगरा तुम्हाला परमेश्वरासह पीक मिळेल. तो येईल आणि पावसाप्रमाणे तुमच्यावर चांगुलपणाचा वर्षाव करायला लावील. 13 पण तुम्ही पाप पेरले, म्हणून तुम्हाला अडचणींचे पीक मिळाले तुम्हाला तुमच्या खोटेपणाचे फळ मिळाले. का? कारण तुम्ही तुमच्या शक्तीवर आणि तुमच्या सैनिकांवर विश्वास ठेवला. 14 म्हणून तुमच्या सैन्याला रणशिंग ऐकू येईल तुमच्या सर्व गढ्यांचा नाश होईल. तो नाश, शल्मनाने जसा बेथ-आर्बेलचा नाश केला, तसा असेल त्या यूध्दाच्या वेळी, आया मलांबरोबर ठार मारल्या गेल्या. 15 आणि हे सर्व तुझ्याबाबतीत बेथेल येथे घडेल. का? कारण तुम्ही खूप पापे केली. तो दिवस उजाडताच इस्राएलच्या राजाचा संपूर्ण नाश होईल.
Total 14 अध्याय, Selected धडा 10 / 14
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
×

Alert

×

Marathi Letters Keypad References