मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
यशया
1. आमोजचा मुलगा यशया याला यहुदा व यरूशलेम यांच्या बद्दल दृष्टान्त झाला.
2. शेवटच्या दिवसात, परमेश्वराचे मंदिर असलेला डोंगर सर्व डोंगरांपेक्षा उंच होईल. तो टेकड्यांपेक्षा उंच उचलला जाईल. सर्व देशांतील लोक तेथे जातील.
3. पुष्कळ लोक तेथे जातील. ते म्हणतील, “आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ या. आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊ या. मग देव, त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील. आणि आपण त्या मार्गाने जाऊ.” देवाच्या शिकवणुकीची सुरूवात, परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरूशलेममधील सीयोनच्या डोंगरात होईल. व तो सर्व जगात पोहोचेल.
4. नंतर सर्व देशांतील लोकांचा न्याय देवच करील. देव माणसा-माणसांतील वाद मिटवील. लोक लढण्यासाठी शस्त्र वापरणार नाहीत. लोक भाल्यांचे कोयते करतील. लोक एकमेकांविरूध्द लढणार नाहीत. इत:पर युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.
5. याकोबच्या वंशजांनो, या आपण परमेश्वराच्या प्रकाशातून चालू या.
6. तुम्हाला हे सांगायचे कारण तुम्ही तुमच्या लोकांपासून दूर गेलात. तुमचे लोक पूर्वेकडील चुकीच्या कल्पनांनी भारावून गेले आहेत. पलिष्ट्यांप्रमाणे ते भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी परकीयांच्या कल्पनांचा स्वीकार केला आहे.
7. दुसरीकडून आणलेल्या सोन्याचांदीने तुमचा देश भरलेला आहे. तुमच्याकडे खूप खजिने आहेत. असंख्य घोडे व रथ आहेत.
8. तुमचा देश लोक पूजत असलेल्या मूर्तीनी भरून गेला आहे. लोकच त्या मूर्ती घडवितात आणि त्यांची पूजा करतात.
9. दिवसेंदिवस लोक वाईट होत चालले आहेत. ते नीच पातळीवर पोहोचले आहेत. देवा, तू नक्कीच त्यांना क्षमा करणार नाहीस. हो ना?
10. येथून चालते व्हा. कडेकपारीमागे धुळीत लपून बसा. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याच्या महान सामर्थ्यापासून लपून राहिले पाहिजे.
11. गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल.
12. परमेश्वराने एक दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी परमेश्वर गर्विष्ठ व फुशारक्या मारणाऱ्या लोकांना शिक्षा करील. मग त्या लोकांचे महत्व कमी होईल.
13. जरी हे लोक लबानोनामधील उंच गंधसरूप्रमाणे वा बाशानमधील मोठ्या एला वृक्षांप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील.
14. हे गर्विष्ठ लोक उतुंग पर्वत उंच टेकड्या व
15. उंच मनोरे आणि उंच भक्कम भिंतीप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील.
16. हे गर्विष्ठ लोक तार्शीशहून येणाऱ्या प्रचंड मालवाहू जहाजांप्रमाणे (ह्या जहाजांत महत्वाचा माल भरलेला असतो.) असले तरीसुध्दा देव त्यांना शिक्षा करील.
17. त्या वेळी गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल. ते माना खाली घालतील व फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा राहील.
18. सर्व मूर्ती (खोटे देव) नाहीशा होतील.
19. लोक कडेकपारीच्या मागे व जमिनीच्या भेगांत लपून बसतील. लोकांना परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचे भय वाटेल. जेव्हा परमेश्वर भूकंप घडवून आणील तेव्हा हे असे घडेल.
20. त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे व चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील.
21. मग परमेश्वराला व त्याच्या सामर्थ्याला भिऊन सर्व कडेकपारीत लपतील. हे सर्व परमेश्वराने घडवून आणलेल्या भूकंपाच्या वेळी घडून येईल.
22. जर तुम्हाला स्वत:चे रक्षण करायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. शेवटी ती माणसेच आहेत म्हणजेच मर्त्य आहेत. म्हणूनच त्यांना देवाप्रमाणे सामर्थ्यवान समजू नका.
Total 66 अध्याय, Selected धडा 2 / 66
1 आमोजचा मुलगा यशया याला यहुदा व यरूशलेम यांच्या बद्दल दृष्टान्त झाला. 2 शेवटच्या दिवसात, परमेश्वराचे मंदिर असलेला डोंगर सर्व डोंगरांपेक्षा उंच होईल. तो टेकड्यांपेक्षा उंच उचलला जाईल. सर्व देशांतील लोक तेथे जातील. 3 पुष्कळ लोक तेथे जातील. ते म्हणतील, “आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ या. आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊ या. मग देव, त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील. आणि आपण त्या मार्गाने जाऊ.” देवाच्या शिकवणुकीची सुरूवात, परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरूशलेममधील सीयोनच्या डोंगरात होईल. व तो सर्व जगात पोहोचेल. 4 नंतर सर्व देशांतील लोकांचा न्याय देवच करील. देव माणसा-माणसांतील वाद मिटवील. लोक लढण्यासाठी शस्त्र वापरणार नाहीत. लोक भाल्यांचे कोयते करतील. लोक एकमेकांविरूध्द लढणार नाहीत. इत:पर युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही. 5 याकोबच्या वंशजांनो, या आपण परमेश्वराच्या प्रकाशातून चालू या. 6 तुम्हाला हे सांगायचे कारण तुम्ही तुमच्या लोकांपासून दूर गेलात. तुमचे लोक पूर्वेकडील चुकीच्या कल्पनांनी भारावून गेले आहेत. पलिष्ट्यांप्रमाणे ते भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी परकीयांच्या कल्पनांचा स्वीकार केला आहे. 7 दुसरीकडून आणलेल्या सोन्याचांदीने तुमचा देश भरलेला आहे. तुमच्याकडे खूप खजिने आहेत. असंख्य घोडे व रथ आहेत. 8 तुमचा देश लोक पूजत असलेल्या मूर्तीनी भरून गेला आहे. लोकच त्या मूर्ती घडवितात आणि त्यांची पूजा करतात. 9 दिवसेंदिवस लोक वाईट होत चालले आहेत. ते नीच पातळीवर पोहोचले आहेत. देवा, तू नक्कीच त्यांना क्षमा करणार नाहीस. हो ना? 10 येथून चालते व्हा. कडेकपारीमागे धुळीत लपून बसा. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याच्या महान सामर्थ्यापासून लपून राहिले पाहिजे. 11 गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल. 12 परमेश्वराने एक दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी परमेश्वर गर्विष्ठ व फुशारक्या मारणाऱ्या लोकांना शिक्षा करील. मग त्या लोकांचे महत्व कमी होईल. 13 जरी हे लोक लबानोनामधील उंच गंधसरूप्रमाणे वा बाशानमधील मोठ्या एला वृक्षांप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील. 14 हे गर्विष्ठ लोक उतुंग पर्वत उंच टेकड्या व 15 उंच मनोरे आणि उंच भक्कम भिंतीप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील. 16 हे गर्विष्ठ लोक तार्शीशहून येणाऱ्या प्रचंड मालवाहू जहाजांप्रमाणे (ह्या जहाजांत महत्वाचा माल भरलेला असतो.) असले तरीसुध्दा देव त्यांना शिक्षा करील. 17 त्या वेळी गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल. ते माना खाली घालतील व फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा राहील. 18 सर्व मूर्ती (खोटे देव) नाहीशा होतील. 19 लोक कडेकपारीच्या मागे व जमिनीच्या भेगांत लपून बसतील. लोकांना परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचे भय वाटेल. जेव्हा परमेश्वर भूकंप घडवून आणील तेव्हा हे असे घडेल. 20 त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे व चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील. 21 मग परमेश्वराला व त्याच्या सामर्थ्याला भिऊन सर्व कडेकपारीत लपतील. हे सर्व परमेश्वराने घडवून आणलेल्या भूकंपाच्या वेळी घडून येईल. 22 जर तुम्हाला स्वत:चे रक्षण करायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. शेवटी ती माणसेच आहेत म्हणजेच मर्त्य आहेत. म्हणूनच त्यांना देवाप्रमाणे सामर्थ्यवान समजू नका.
Total 66 अध्याय, Selected धडा 2 / 66
×

Alert

×

Marathi Letters Keypad References