मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
ईयोब
1. मग तेमानीच्या अलीफजने उत्तर दिले:
2. “देवाला आपल्या मदतीची गरज आहे का? नाही. अतिशय विद्वान माणसाचा सुध्दा देवाला फारसा उपयोग नाही.
3. तुमचे योग्य तऱ्हेने जगणे देवाला काही मदत करते का? नाही. तुम्ही त्या सर्वशक्तिमान देवाचे अनुसरण केलेत तर त्यातून त्याला काही मिळते का? नाही.
4. “ईयोब, देवाने तुला दोषी ठरवून शिक्षा का द्यावी? तू त्याला भितोस तू त्याची भक्ती करतोस म्हणून?
5. “नाही. तो तसे करतो कारण तू खूप पाप केले आहेस. ईयोब, तू पाप करणे कधीच थांबवले नाहीस.
6. कदाचित् तू तुझ्या भावाला काही पैसे दिले असशील आणि त्याने ते परत करावे म्हणून त्याच्याकडून एखादी वस्तू गहाण ठेवून घेतली असशील. कदाचित् तू गरीबाकडून त्याची वस्त्रे पैशासाठी गहाण ठेवून घेतली असशील. तसे करण्याला कदाचित् काही सबळ कारणही नसेल.
7. तू कदाचित् थकलेल्या आणि भुकेल्या लोकांना पाणी आणि अन्न दिले नसशील.
8. ईयोब, तुझ्याकडे पुष्कळ शेतजमीत आहे आणि लोक तुला मान देतात.
9. पण कदाचित् तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, ईयोब, तू कदाचित पोरक्या मुलांची फसवणूक केली असशील.
10. म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटांनी तू घाबरुन जात आहेस.
11. म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चहुबाजूंनी वेढला आहेस.
12. “देव स्वर्गाच्या सर्वात उंच भागात राहतो. तारे किती उंचावर आहेत ते बघ. देव सर्वात उंच ताऱ्यांमधून खाली वाकून बघतो,
13. पण ईयोब, तू कदाचित् म्हणशील देवाला काय समजते? देव काळ्याकुटृ ढाांतून आपल्याकडे बघून निवाडा करु शकतो का?
14. आकाशाच्या किनाऱ्यावरुन चालताना त्याने आपल्याला बघू नये म्हणून दाट ढग त्याला आपल्यापासून लपवतात.
15. “ईयोब, दुष्ट लोक पूर्वी ज्या जुन्या वाटेवरुन चालत गेले त्याच वाटेवरुन आज तू चालतो आहेस.
16. त्या दुष्टांना मरणघाटिका जवळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला. ते पुरात वाहून गेले.
17. त्या लोकांनी देवाला सांगितले, ‘आम्हाला एकटे सोड तो सर्वशक्तिमान देव आम्हाला काहीही करु शकत नाही.’
18. आणि देवानेच त्याची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. नाही मी दुष्टांच्या उपदेशाचे पालन करु शकत नाही.
19. चांगले लोक दुष्टांचे निर्दालन झालेले पाहतील आणि संतोष पावतील. भोळे लोक वाईट लोकांना हसतात.
20. “खरोखरच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.’
21. “ईयोब, तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.
22. त्यांच्या वचनांचा स्विकार कर. तो काय म्हणतो त्याकडे नीट लक्ष दे.
23. ईयोब, तू सर्वशक्तिमान देवाकडे परत ये म्हणजे तुझी स्थिती पूर्ववत् होईल. परंतु तू तुझ्या घरातून वाईट गोष्टींचे उच्चाटन केले पाहिजेस.
24. तू तुझ्या जवळ असलेल्या सोन्याला मातीमोल मानले पाहिजेस. तू तुझ्या सर्वात चांगल्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत दिली पाहिजेस.
25. सर्वशक्तिमान देवच तुझे सोने असू दे. त्यालाच तुझा चांदीचा ढीग समज.
26. नंतर तू सर्वशक्तिमान देवाला अनुभवू शकशील. तू त्याच्याकडे बघू शकशील.
27. तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि ज्या गोष्टी करण्याचे तू वचन दिले होतेस त्या गोष्टी तू करशील.
28. तू जर काही करायचे ठरवलेस तर तू त्यात यशस्वी होशील. आणि तुझा भविष्यकाळ खरोखरच उज्ज्वल असेल.
29. देव अहंकारी लोकांना मान खाली घालायला लावतो. परंतु विनम्र लोकांना तो मदत करतो.
30. नंतर तू चुका करणाऱ्या लोकांना मदत करु शकशील. तू देवाजवळ प्रार्थना केलीस तर तो त्या लोकांना क्षमा करेल. का? कारण तू अतिशय पवित्र असशील.”
Total 42 अध्याय, Selected धडा 22 / 42
1 मग तेमानीच्या अलीफजने उत्तर दिले: 2 “देवाला आपल्या मदतीची गरज आहे का? नाही. अतिशय विद्वान माणसाचा सुध्दा देवाला फारसा उपयोग नाही. 3 तुमचे योग्य तऱ्हेने जगणे देवाला काही मदत करते का? नाही. तुम्ही त्या सर्वशक्तिमान देवाचे अनुसरण केलेत तर त्यातून त्याला काही मिळते का? नाही. 4 “ईयोब, देवाने तुला दोषी ठरवून शिक्षा का द्यावी? तू त्याला भितोस तू त्याची भक्ती करतोस म्हणून? 5 “नाही. तो तसे करतो कारण तू खूप पाप केले आहेस. ईयोब, तू पाप करणे कधीच थांबवले नाहीस. 6 कदाचित् तू तुझ्या भावाला काही पैसे दिले असशील आणि त्याने ते परत करावे म्हणून त्याच्याकडून एखादी वस्तू गहाण ठेवून घेतली असशील. कदाचित् तू गरीबाकडून त्याची वस्त्रे पैशासाठी गहाण ठेवून घेतली असशील. तसे करण्याला कदाचित् काही सबळ कारणही नसेल. 7 तू कदाचित् थकलेल्या आणि भुकेल्या लोकांना पाणी आणि अन्न दिले नसशील. 8 ईयोब, तुझ्याकडे पुष्कळ शेतजमीत आहे आणि लोक तुला मान देतात. 9 पण कदाचित् तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, ईयोब, तू कदाचित पोरक्या मुलांची फसवणूक केली असशील. 10 म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटांनी तू घाबरुन जात आहेस. 11 म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चहुबाजूंनी वेढला आहेस. 12 “देव स्वर्गाच्या सर्वात उंच भागात राहतो. तारे किती उंचावर आहेत ते बघ. देव सर्वात उंच ताऱ्यांमधून खाली वाकून बघतो, 13 पण ईयोब, तू कदाचित् म्हणशील देवाला काय समजते? देव काळ्याकुटृ ढाांतून आपल्याकडे बघून निवाडा करु शकतो का? 14 आकाशाच्या किनाऱ्यावरुन चालताना त्याने आपल्याला बघू नये म्हणून दाट ढग त्याला आपल्यापासून लपवतात. 15 “ईयोब, दुष्ट लोक पूर्वी ज्या जुन्या वाटेवरुन चालत गेले त्याच वाटेवरुन आज तू चालतो आहेस. 16 त्या दुष्टांना मरणघाटिका जवळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला. ते पुरात वाहून गेले. 17 त्या लोकांनी देवाला सांगितले, ‘आम्हाला एकटे सोड तो सर्वशक्तिमान देव आम्हाला काहीही करु शकत नाही.’ 18 आणि देवानेच त्याची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. नाही मी दुष्टांच्या उपदेशाचे पालन करु शकत नाही. 19 चांगले लोक दुष्टांचे निर्दालन झालेले पाहतील आणि संतोष पावतील. भोळे लोक वाईट लोकांना हसतात. 20 “खरोखरच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.’ 21 “ईयोब, तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील. 22 त्यांच्या वचनांचा स्विकार कर. तो काय म्हणतो त्याकडे नीट लक्ष दे. 23 ईयोब, तू सर्वशक्तिमान देवाकडे परत ये म्हणजे तुझी स्थिती पूर्ववत् होईल. परंतु तू तुझ्या घरातून वाईट गोष्टींचे उच्चाटन केले पाहिजेस. 24 तू तुझ्या जवळ असलेल्या सोन्याला मातीमोल मानले पाहिजेस. तू तुझ्या सर्वात चांगल्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत दिली पाहिजेस. 25 सर्वशक्तिमान देवच तुझे सोने असू दे. त्यालाच तुझा चांदीचा ढीग समज. 26 नंतर तू सर्वशक्तिमान देवाला अनुभवू शकशील. तू त्याच्याकडे बघू शकशील. 27 तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि ज्या गोष्टी करण्याचे तू वचन दिले होतेस त्या गोष्टी तू करशील. 28 तू जर काही करायचे ठरवलेस तर तू त्यात यशस्वी होशील. आणि तुझा भविष्यकाळ खरोखरच उज्ज्वल असेल. 29 देव अहंकारी लोकांना मान खाली घालायला लावतो. परंतु विनम्र लोकांना तो मदत करतो. 30 नंतर तू चुका करणाऱ्या लोकांना मदत करु शकशील. तू देवाजवळ प्रार्थना केलीस तर तो त्या लोकांना क्षमा करेल. का? कारण तू अतिशय पवित्र असशील.”
Total 42 अध्याय, Selected धडा 22 / 42
×

Alert

×

Marathi Letters Keypad References