4. तो दिवस काळाकुटृ झाला असता, देवाला त्याचे विस्मरण झाले असते, त्या दिवशी उजेड पडला नसता तर फार बरे झाले असते.
|
5. तो दिवस मृत्यूसारखा काळा होवो. ढगही त्या दिवशी लपले असते आणि काळ्या ढगांनी प्रकाशाला घाबरवले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.
|
6. अंधाराने त्या रात्रीला ठेवून घ्यावे. दिनदर्शिकेतून ती रात्र नष्ट होवो. तिचा अंर्तभाव कुठल्याही महिन्यात होऊ नये.
|
8. जादुगाराने शापवाणी उच्चारावी आणि माझ्या जन्मदिवसाला शापावे. ते लिव्याथानाला चेतविण्यास सदैव तत्पर असतात.
|
9. त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत. त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही न येवो. सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही न दिसोत.
|
10. का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही. ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
|
13. मी जर जन्मत:च मेलो असतो तर आता मी अगदी शांत असतो. पूर्वी होऊन गेलेल्या राजेलोकांच्यात आणि विद्वानांच्यामध्ये मी झोपी गेलो असतो आणि विश्रींती घेतली असती तर किती बरे झाले असते.
|
15. ज्या राजांनी आपली थडगी वा घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच माझेही दफन झाले असते तर बरे झाले असते.
|
16. मी जन्मत:च मेलेले आणि जमिनीत पुरले गेलेले मूल का झालो नाही? दिवसाच्या प्रकाशाचा किरणही न पाहिलेले मूल मी असतो तर बरे झाले असते.
|
17. वाईट लोक थडग्यात गेल्यानंतरच त्रास देण्याचे थांबवितात. आणि जे लोक दमलेले असतात त्यांना थडग्यात विश्रांती मिळते.
|
19. थडग्यात, स्मशानात अनेक प्रकारचे लोक असतात, लहान थोर सर्व तेथे असतात, गुलामांचीही तेथे आपल्या मालकापासून सुटका होते.
|
24. जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही! माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.
|
25. काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत धास्ती वाटत होती. आणि तेच घडले. जे भयानक घडणार आहे अशी भीती वाटत होती तेच माझ्या बाबतीत घडले.
|