1. त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणे: प्रांताधिपती नहेम्या. हा हखल्याचा मुलगा. सिदकीय,
2. सराया, अजऱ्या, यिर्मया,
3. पश्हूर, अमऱ्या, मल्खीया,
4. हत्तश, शबन्या, मल्लूख,
5. हारिम, मरेमोथ, ओबद्या,
6. दानीएल, गिन्नथोन, बारुख,
7. मशुल्लाम, अबीया, मियामीन,
8. माज्या, बिल्गई, आणि शमया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.
9. आणि लेव्यांची पुढीलप्रमाणे: अजन्याचा मुलगा येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नइ, कदमीएल,
10. आणि त्यांचे भाऊ:शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हनान,
11. मीखा, रहोब, हशव्या,
12. जक्कूर, शेरेब्या, शबन्या,
13. होदीया, बानी, बनीनू.
14. आपल्या नावाची मोहोर उठवणाऱ्यांमधले लोकांचे नेते हे: परोश, पहथ-मवाब, एलाम, जातू, बानि,
15. बुन्नी, अजगाद, बेबाई,
16. अदोनीया, बिग्वइ, आदीन,
17. आटेर, ह्ज्कीया, अज्जूर,
18. होदीया, हाशूम, बेसाई,
19. हारीफ, अनाथोथ, नोबाई,
20. मप्पीयाश, मशुल्लाम, हेजीर,
21. मशेजबेल, सादोक, यद्दूवा,
22. पलठ्या, हानान, अनया,
23. होशेया, हनन्या, हशशूब.
24. हल्लोहेश, पिल्हा शोबेक,
25. रहूम, हश्बना, मासेया,
26. अहीया, हनान, अनान,
27. मल्लख, हारिम आणि बाना.
28. [This verse may not be a part of this translation]
29. [This verse may not be a part of this translation]
30. “आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या मुलींची लग्ने होऊ देणार नाही तसेच त्यांच्या मुली आमच्या मुलांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो.
31. “शब्बाथ दिवशी आम्ही काम करणार नाही. शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. दर सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीक ठेवू. तिची मशागत करणार नाही. तसेच त्या वर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु.
32. “मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळायची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून एकतृतीयांश शेकेल आम्ही दरवर्षी देऊ.
33. मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या धान्यार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, नवचंद्रदिनी आणि नैमित्तिक सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या शुध्दीकरणासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च हे सर्व खर्च या पैशातून भागतील.
34. “दरवर्षी नेमलेल्या वेळी मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून आम्ही सर्वांनी याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी लाकूड आणायचे आहे. नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपल्याला हे करायलाच हवे.
35. “आमच्या शेतातले पहिले पीक आणि फळझाडांची पहिली फळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणायची आमची जबाबदारी आहे हे आम्ही कबूल करतो.
36. “नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही पुढील गोष्टीही करु: आमचा पहिला पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे पहिले पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू.
37. “तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पुढील गोष्टी आणू: पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहार, नवीन काढलेला द्राक्षारस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण ते सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग घेतात.
38. लेवी या धान्याचा स्वीकार करतील तेव्हा अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवींनी ते धान्या देवाच्या, मंदिरात आणावे व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावे.
39. इस्राएल लोक आणि लेवी यांनी धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते. “देवाच्या मंदिराची आम्ही नीट जपवणूक करु असे आम्ही वचन देतो.”