मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
फिलेमोना
1. ख्रिस्त येशूकरीता कैदी झालेला पौल, व आपला बंधु तिमथ्य यांजकडून, आमचा प्रिय बंधु व सहकारी फिलेमोन
2. आणि आमची बहीण अफ्फिया, अर्खिप्प, आमचा सहसैनिक, आणि तुझ्या घरात जी मंडळी एकत्र येते, यांना:
3. देव आमचा पिता याजपासून व प्रभु येशू ख्रिस्तापासून कृपा व शाति असो.
4. जेव्हा मी प्रार्थनेत तुझी आठवण करतो, तेव्हा नेहमी मी माझ्या देवाचे उपकार मानतो.
5. कारण तुइया प्रेमाविषयी आणि तुझ्या विश्वासाविषयी, जो विश्वास तू प्रभु येशूवर ठेवतोस त्याविषयी मी ऐकतो, च्या देवाच्या सर्व लोकांसाठी जे प्रेम तुझ्याकडे आहे. त्याविषयी मी ऐकतो,
6. मी अशी प्रार्थना करतो की, ज्या विश्वासाचा सहभागी तू आमच्याबरोबर आहेस, तो विश्वास आमच्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूमधील सर्व चांगल्या गोष्टी त्या सखोलपणे समजण्यासाठी तुला मार्गदर्शन करोत.
7. तुझ्या प्रेमामुळे मला मोठा आनंद आणि समाधान मिळाले आहे. कारण बंधु, तुझ्या प्रयत्नांमुळे देवाच्या लोकांची अंत:करणे संजीवित झाली आहेत.
8. म्हणून, जरी मी तुझा बंधु म्हणून तुला तुझे योग्य कर्तव्य करण्याविषयी आज्ञा करुन सांगण्याचे धैर्य असले, तरी
9. [This verse may not be a part of this translation]
10. मी तुला माझ्या मुलासमान असलेला अनेसिम, ज्याच्याशी मी तुरुंगात असताना पित्याप्रमाणे वागलो, त्याजविषयी कळकळीने विनवितो की,
11. पूर्वी तो तुला निरुपयोगी होता पण आता तो तुलाच नाही तर मलासुद्धा उपयोगी आहे.
12. मी त्याला तुझ्याकडे परत पाठवीत आहे. मी असे म्हणायला हवे की, मी त्याला पाठवीत असताना जणू काय माझे ह्रदयच पाठवित आहे.
13. त्याला येथे माझ्याजवळ ठेवायला मला आवडेल यासाठी की सुवार्तेमुळे मिळालेल्या तुरुंगवासामध्ये त्याने तुझ्या जागी माझी मदत करावी.
14. परंतु तुझ्या संमतीशिवाय मला काहीही करायचे नव्हते. यासाठी की तुझे कोणतेही चांगले कार्य दडपणामुळे होऊ नये तर तुझ्या खुशीने व्हावे.
15. कदाचित त्याला थोड्या काळासाठी तुझ्यापासून दूर घेतले जाणे यासाठी झाले असावे की, तू त्याला कायमचे तुझ्याजवळ घ्यावे.
16. एक गुलाम म्हणून नव्हे, उलट गुलामापेक्षाही चांगला एक भाऊ म्हणून घ्यावे. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो. पण तू त्याच्यावर त्याहीपेक्षा अधिक प्रेम करशील, फक्त एक मनुष्य म्हणूनच नव्हे, तर प्रभूमधील एक बंधु म्हणून.
17. तर जर मग तू मला खरोखर भागीदार समजतोस, तर माझे स्वागत जसे तू केले असतेस तसे त्याचे स्वागत कर.
18. आणि जर त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा काही देणे लागत असेल तर ते माझ्या नावावर लाव.
19. मी, पौल, हे माझ्या स्वत:च्या हातांनी लिहीत आहे: मी याची तुला परतफेड करीन. (मी तुला हे सांगण्याची गरज नाही की, तुझे स्वत:चे जीवन तू मला देणे लागतोस.)
20. होय बंधु, प्रभूमध्ये मला तुझ्यापासून काही फायदा हवा आहे. ख्रिस्तामध्ये माझे अंत:करण उल्हासित कर.
21. तुझ्या आज्ञाधारकपणाविषयी मला खात्री आहे म्हणून मी तुला लिहीत आहे. मला माहीत आहे की, मी सांगत असलेल्या गोष्टीपेक्षा तू अधिक करशील.
22. शिवाय कृपा करुन माझ्या विश्रांती करिता खोली तयार करुन ठेव. कारण माझा विश्वास आहे की, तुमच्या प्रार्यनांचा परीणाम म्हणून मला सुरक्षितरीच्या तुमच्या स्वाधीन करण्यात येईल.
23. येशू ख्रिस्तामध्ये माझ्यासह बंदिवान एपफ्रास
24. तसेच मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक जे माझे सहकाही आहेत, ते सलाम सांगतात.
25. प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.
Total 1 अध्याय
1 ख्रिस्त येशूकरीता कैदी झालेला पौल, व आपला बंधु तिमथ्य यांजकडून, आमचा प्रिय बंधु व सहकारी फिलेमोन 2 आणि आमची बहीण अफ्फिया, अर्खिप्प, आमचा सहसैनिक, आणि तुझ्या घरात जी मंडळी एकत्र येते, यांना: 3 देव आमचा पिता याजपासून व प्रभु येशू ख्रिस्तापासून कृपा व शाति असो. 4 जेव्हा मी प्रार्थनेत तुझी आठवण करतो, तेव्हा नेहमी मी माझ्या देवाचे उपकार मानतो. 5 कारण तुइया प्रेमाविषयी आणि तुझ्या विश्वासाविषयी, जो विश्वास तू प्रभु येशूवर ठेवतोस त्याविषयी मी ऐकतो, च्या देवाच्या सर्व लोकांसाठी जे प्रेम तुझ्याकडे आहे. त्याविषयी मी ऐकतो, 6 मी अशी प्रार्थना करतो की, ज्या विश्वासाचा सहभागी तू आमच्याबरोबर आहेस, तो विश्वास आमच्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूमधील सर्व चांगल्या गोष्टी त्या सखोलपणे समजण्यासाठी तुला मार्गदर्शन करोत. 7 तुझ्या प्रेमामुळे मला मोठा आनंद आणि समाधान मिळाले आहे. कारण बंधु, तुझ्या प्रयत्नांमुळे देवाच्या लोकांची अंत:करणे संजीवित झाली आहेत. 8 म्हणून, जरी मी तुझा बंधु म्हणून तुला तुझे योग्य कर्तव्य करण्याविषयी आज्ञा करुन सांगण्याचे धैर्य असले, तरी 9 [This verse may not be a part of this translation] 10 मी तुला माझ्या मुलासमान असलेला अनेसिम, ज्याच्याशी मी तुरुंगात असताना पित्याप्रमाणे वागलो, त्याजविषयी कळकळीने विनवितो की, 11 पूर्वी तो तुला निरुपयोगी होता पण आता तो तुलाच नाही तर मलासुद्धा उपयोगी आहे. 12 मी त्याला तुझ्याकडे परत पाठवीत आहे. मी असे म्हणायला हवे की, मी त्याला पाठवीत असताना जणू काय माझे ह्रदयच पाठवित आहे. 13 त्याला येथे माझ्याजवळ ठेवायला मला आवडेल यासाठी की सुवार्तेमुळे मिळालेल्या तुरुंगवासामध्ये त्याने तुझ्या जागी माझी मदत करावी. 14 परंतु तुझ्या संमतीशिवाय मला काहीही करायचे नव्हते. यासाठी की तुझे कोणतेही चांगले कार्य दडपणामुळे होऊ नये तर तुझ्या खुशीने व्हावे. 15 कदाचित त्याला थोड्या काळासाठी तुझ्यापासून दूर घेतले जाणे यासाठी झाले असावे की, तू त्याला कायमचे तुझ्याजवळ घ्यावे. 16 एक गुलाम म्हणून नव्हे, उलट गुलामापेक्षाही चांगला एक भाऊ म्हणून घ्यावे. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो. पण तू त्याच्यावर त्याहीपेक्षा अधिक प्रेम करशील, फक्त एक मनुष्य म्हणूनच नव्हे, तर प्रभूमधील एक बंधु म्हणून. 17 तर जर मग तू मला खरोखर भागीदार समजतोस, तर माझे स्वागत जसे तू केले असतेस तसे त्याचे स्वागत कर. 18 आणि जर त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा काही देणे लागत असेल तर ते माझ्या नावावर लाव. 19 मी, पौल, हे माझ्या स्वत:च्या हातांनी लिहीत आहे: मी याची तुला परतफेड करीन. (मी तुला हे सांगण्याची गरज नाही की, तुझे स्वत:चे जीवन तू मला देणे लागतोस.) 20 होय बंधु, प्रभूमध्ये मला तुझ्यापासून काही फायदा हवा आहे. ख्रिस्तामध्ये माझे अंत:करण उल्हासित कर. 21 तुझ्या आज्ञाधारकपणाविषयी मला खात्री आहे म्हणून मी तुला लिहीत आहे. मला माहीत आहे की, मी सांगत असलेल्या गोष्टीपेक्षा तू अधिक करशील. 22 शिवाय कृपा करुन माझ्या विश्रांती करिता खोली तयार करुन ठेव. कारण माझा विश्वास आहे की, तुमच्या प्रार्यनांचा परीणाम म्हणून मला सुरक्षितरीच्या तुमच्या स्वाधीन करण्यात येईल. 23 येशू ख्रिस्तामध्ये माझ्यासह बंदिवान एपफ्रास 24 तसेच मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक जे माझे सहकाही आहेत, ते सलाम सांगतात. 25 प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.
Total 1 अध्याय
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

Marathi Letters Keypad References